पुणे Pune Minor Girl Rape : शहरात अल्पवयीन मुलीसोबत बलात्काराची घटना समोर आलीय. तसंच तिला शरीर विक्री व्यवसाय करण्यासाठी भाग पाडल्याचीही माहिती समोर आलीय. हा सगळा प्रकार मागील ऑक्टोबर 2023 पासून सुरू होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पोक्सोसह इतर कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणात एका दाम्पत्यावर गुन्हा दाखल असून, एका महिला आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. तर दुसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
लॉजमध्ये ठेवलं डांबून : पुण्यातील के. के. मॉलजवळ एका लॉजमध्ये एका मुलीला डांबून ठेवल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी पीडित मुलीची सुटका केली. ज्या लॉजवर हा प्रकार घडलाय, त्या सर्व लॉज मालकांची देखील चौकशी पोलीस करणार आहेत.
30 हजार रुपये घेतले उसने : याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलीचे वडील आजारी होते. त्यामुळं पीडित मुलीनं आरोपी दाम्पत्याकडून उपचारासाठी 30 हजार रुपये उसने घेतले होते. मात्र, काही कारणामुळं पीडित मुलीला ते पैसे परत देता येत नसल्यानं आरोपींनी 17 वर्षीय मुलीला ताब्यात घेतलं. त्यानंतर तिला एका लॉजवर नेत 15 दिवस डांबून ठेवलं.
जीवे मारण्याची दिली धमकी : लॉजवर डांबून ठेवण्यात आलेल्या मुलीवर आरोपीनं वारंवार बलात्कार केला. यावरच न थांबता या दाम्पत्यानं तिला जीवे मारण्याची धमकी देत, तिला जबरदस्तीनं शरीरविक्री व्यवसाय करायला सांगितला. तसंच त्यातून मिळणारे पैस हे आरोपीनं वसूल केले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा -