ETV Bharat / state

बंटी बबलीचा प्रताप; घर मालकाला डावलून भाडेकरुंना घरं देऊन लावला लाखोचा चुना - Thane Crime News

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 5, 2024, 2:09 PM IST

Thane Crime News : भाडेकरुंना हेव्ही डिपॉझिटवर घरं देण्याच्या नावानं बंटी आणि बबलीनं चुना लावला. या प्रकरणी ठाण्यातील मनपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane Crime News
मनपाडा पोलीस ठाणे (Reporter)

ठाणे Thane Crime News : भाडेकरुंना हेव्ही डिपॉझिटवर हायप्रोफाईल वस्तीत घरं देण्याच्या बहाण्यानं बंटी बबलीच्या जोडीनं भाडेकरुंना लाखो रुपयांचा चुना लावला. विशेष म्हणजे घरांच्या मूळ मालकाला डावलून या आरोपी जोडीनं परस्पर घरं देऊन ऑनलाईन घरांचं अ‍ॅग्रीमेंट करुन घरं घेणाऱ्या गरजूंसह घर मालकांची 30 लाख 47 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करुन पोलीस पथकानं या बंटी बबलीचा शोध सुरू केला आहे. मोहमद मुबारक हुसेन आणि गायत्री तुकाराम बोडके उर्फ लावण्या चौहान असं लाखोंचा चुना लावून फरार झालेल्या बंटी बबलीचं नाव आहे.

हायप्रोफाईल वस्तीत परस्पर भाड्यानं दिली घरं : मुंबई विक्रोळी भागात तक्रारदार तुषार जगदीश अहिरे यांनी याबाबत तक्रार दाखल केला. त्यांच्यासह सहा जणांना डोंबिवली पूर्वेतील निळजे भागातील पलावा सिटी या हायप्रोफाईल वस्तीत भाड्यानं घरांच्या शोधात होते. घरांचा शोध घेत असताना आरोपी बंटी आणि बबलीची सप्टेंबर 2023 मध्ये तक्रारदार तुषार जगदीश अहिरेसह सहा जणांशी ओळख झाली. या ओळखीतून या सहा जणांना निळजे येथील पलावा सिटी भागातील घरं दाखवून ही घरं हेव्ही डिपॉझिटवर देत असल्याची त्यांनी थाप मारली. आरोपी बंटी बबलीनं या सहा जणांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर 3 सप्टेंबर 2023 ते 30 जून 2024 पर्यत हेव्ही डिपॉझिटच्या नावानं 30 लाख 47 हजार रुपये आरोपींनी आपल्या बँक खात्यात वळते केले.

घरं देण्यास केलं ऑनलाईन घरांचं एग्रीमेंट : खळबळजनक बाब म्हणजे घराच्या मूळ मालकांना याबाबत काहीच माहिती दिली नाही. आरोपी बंटी बबलीनं हेव्ही डिपॉझिटवर घरं देण्यास ऑनलाईन घरांचं अ‍ॅग्रीमेंट केलं. यासाठी तक्रारदार तुषार जगदीश अहिरे यांच्याकडून 5 लाख 50 हजार, बबन देशमुख यांच्याकडून 6 लाख 12 हजार, वर्गीस मोंडल यांच्याकडून 5 लाख, जितेंद्र वरई यांच्याकडून 2 लाख , वीरेंद्रनाथ शिवशंकर सिंह यांच्याकडून 5 लाख 10 हजार, दीप्ती शहा यांच्याकडून 3 लाख 25 हजार, राहुल गायकवाड यांच्याकडून 3 लाख 50 हजार अशी एकूण 30 लाख 47 हजार रुपये ऑनलाईन रक्कम आपल्या बँक खात्यात वळती केले. विशेष म्हणजे फसवणूक झालेल्या गरजू भाडेकरूंना घरं राहण्यास दिली.

असा झाला फसवणुकीचा प्रकार उघड : या घटनेची घर मालकांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हेव्ही डिपॉझिटवर घरं घेणाऱ्या भाडेकरूकडं घरं रिकामी करा किंवा ठरलेली रक्कम द्या, असा तगादा लावला. मात्र तक्रारदार भाडेकरुंनी हेव्ही डिपॉझिटवर ऑनलाईन घरांचं अ‍ॅग्रीमेंट केल्याचं मालकांना दाखवल्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार समोर आला. त्यानंतर तक्रारदार तुषार अहिरेसह फसवणूक झालेल्या सहा जणांनी 30 जून रोजी मानपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा बंटी बबलीच्या विरोधात दाखल केला. या संदर्भात तपास अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक के. डी. गांगुर्डे यांनी सांगितलं की, "दोन्ही आरोपी विरोधात भादंवि कलम 420, 34 प्रमाणं गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या आधारे दोन्ही आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत," असं त्यांनी सांगितलं. मात्र गुन्हा दाखल होऊन चार दिवस होऊनही दोन्ही आरोपी अध्यापही फरार असल्यानं या गुन्ह्याचा तपास दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडं वर्ग करणार असल्याची माहिती सूत्रानं दिली आहे.

हेही वाचा :

  1. मॅट्रिमोनी ॲपवर विश्वास ठेवत असाल तर सावधान! भामट्याने लग्नाचं आमिष दाखवून घातला ६० लाखांचा गंडा - Thane Crime News
  2. विप्रो कंपनीच्या कर्मचाऱ्याला फोनवरून बोलावत रस्त्यातच चाकू भोसकून हत्या; नेमकं काय घडलं? - Thane crime News
  3. देवाच्या गाभाऱ्यातच पुजाऱ्याचे चिमुकली सोबत अश्लील चाळे, मुंबईच्या गोरेगाव येथील संतापजनक घटना - Thane Crime News

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.