ETV Bharat / state

तेलंगाणातील एजंटनं दिला जर्मनचा फेक व्हिसा; प्रवाशी अडकला मुंबई विमानतळावर - Telanagana Man Booked For Fake Visa - TELANAGANA MAN BOOKED FOR FAKE VISA

Telanagana Man Booked For Fake Visa : तेलंगाणामधून ओमानला जाणाऱ्या प्रवाशानं फेक व्हिसावर प्रवास करण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालं. या प्रवाशाला मुंबई विमानतळावर पकडण्यात आलं. त्याच्यावर सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Telanagana Man Booked For Fake Visa
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 10, 2024, 9:12 AM IST

Updated : Apr 10, 2024, 10:50 AM IST

मुंबई Telanagana Man Booked For Fake Visa : तेलंगाणातील एजंटनं जर्मन देशाचा फेक व्हिसा दिल्यानं प्रवाशी मुंबई विमानतळावर अडकला आहे. फेक व्हिसा प्रकरणी या प्रवाशावर मुंबई विमानतळ प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमादी राजन्ना असं फेक व्हिसा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे. त्यानं तेलंगाणा राज्यातील साईतेज रामाअगडू या एजंटकडून व्हिसा काढला होता. इमादी राजन्ना याला युरोपमध्ये स्थायिक व्हायचे होतं. मात्र फेक व्हिसाप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानं तो मुंबईत विमानतळावर अडकला आहे.

बोगस व्हीजाप्रकरणी गुन्हा दाखल : मंगळवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास बोगस व्हिसाप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवासी रजन्ना किशतायह इम्मादी असं या प्रवाशाचं नाव असून त्याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 420, 465, 468 471 आणि पासपोर्ट अधिनियम कलम 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा उघडकीस आला गुन्हा : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ इथल्या स्नेहा पुरी यांनी तक्रार दाखल केली आहे. स्नेहा पुरी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी आठ वाजता कर्तव्यासाठी इमिग्रेशन निर्गमन कक्ष छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे स्नेहा पुरी कार्यरत होत्या. त्यावेळी त्यांना इमिग्रेशन काउंटर क्रमांक 13 वर कर्तव्यासाठी पाठवण्यात आलं होतं. यावेळी त्या वेगवेगळ्या एअरलाईनच्या विमानानं वेगवेगळ्या देशात जाणाऱ्या प्रवाशांची तपासणी करत होत्या. 8 एप्रिल दुपारी साडेबारा वाजता प्रवाशी इमादी राजन्ना हा इमिग्रेशन तपासणीसाठी तक्रारदार यांच्या काउंटरवर आला. त्यानं त्याच्याकडील भारतीय पासपोर्ट आणि बोर्डिंग पास इमिग्रेशन तपासणीसाठी सादर केला. हा प्रवासी विमान क्रमांक डब्ल्यू वाय 204 या विमानानं मस्कत (ओमान) येथे निघाला होता.

जर्मन राजदूताकडं केली पडताळणी : प्रवाशाच्या भारतीय पासपोर्टची तपासणी केली असता त्याच्या पासपोर्टमधील पान क्रमांक दहावर जर्मन देशाचा व्हिसा असल्याचं आढळून आलं. या व्हिसाची तक्रारदार यांनी तपासणी केली असता व्हिसाच्या सत्यतेबाबत शंका आल्यामुळे तक्रारदार स्नेहा पुरी यांनी प्रवाशाची अधिक चौकशी करत विंग इन्चार्ज इंद्रजीत तिरपुडे यांच्याकडं त्याला हजर केलं. विंग इन्चार्ज इंद्रजीत तिरपुडे आणि ड्युटी ऑफिसर कैलास सिंग पैवारा यांनी प्रवाशाच्या पासपोर्टमधील जर्मन व्हीजाची यु व्ही लॅम्प खाली तपासणी केली असता व्हीजामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. यावरुन प्रवाशाच्या पासपोर्टमधील जर्मन देशाचा व्हिसा बनावट आहे, असं स्पष्ट झालं. त्यामुळे विंग इन्चार्ज इंद्रजीत तिरपुडे यांनी याबाबत विमानतळ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर पासपोर्टमधील व्हिसाच्या कॉपीज तपासणीसाठी ई-मेल द्वारे मुंबईतील जर्मन कौन्सिलेट कार्यालय येथे पाठवण्यात आल्या. यावेळी त्यांनी संबंधित प्रवाशाच्या पासपोर्टमधील व्हिसाच्या कॉपीजची तपासणी केली असता व्हिसा बोगस असल्याबाबत ई-मेल द्वारे कळवण्यात आलं.

तेलंगाणातील एजंटनं दिला व्हीजा मिळवून : विंग इन्चार्ज इंद्रजीत तिरपुडे आणि ड्युटी ऑफिसर कैलाससिंग पैवारा यांनी संबंधित प्रवाशाकडं व्हिसाबाबत चौकशी केली. यावेळी त्यानं युरोप देशात स्थलांतरित व्हायचं होतं. त्यामुळे त्यानं युरोप देशाचा व्हिसा मिळवण्यासाठी तेलंगणा येथील जगत्या जिल्ह्यातील कोलवाई गावात राहणारा साईतेज रामाअगडू या एजंटनं व्हिसा मिळवून दिला होता, अशी माहिती दिली.

हेही वाचा :

  1. बनावट व्हिसा असल्यानं सर्बियाच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यानं केलं हद्दपार, पंजाबी तरुणाविरोधात मुंबईत गुन्हा दाखल
  2. एमडी ड्रग्स तस्करी प्रकरण: अंगाडियाला मुंबई पोलिसांकडून अटक - MD drug smuggling
  3. सीएला क्रिकेट सामना खेळणं पडलं महागात; डेबिट, क्रेडिट कार्डवरुन भामट्यानं केली लाखोची खरेदी - Fraud With CA In Mumbai

Last Updated : Apr 10, 2024, 10:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.