ठाणे FIR Against EX DGP Sanjay Pande : महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह 7 जणांवर ठाण्याच्या ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार संजय मिश्रीमल पुनमिया यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात 2016 साली दाखल गुन्ह्याच्या तपास आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा धमकीसह अन्य व्यावसायिकांकडून पैसे उकळल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सादर धमकावण्याचा प्रकार मे 2021 ते 30 जून 2024 या कालावधित ठाणे आणि मुंबईच्या विविध ठिकाणी घडला. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्यावसायिक संजय पुनामियांनी केली तक्रार : तक्रारदार संजय मिश्रीमल पुनमिया (58 रा मारिन ड्राइव्ह सी फेस मुंबई ) हे व्यावसायिक आहेत. ठाण्याच्या ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल 201/2016 या गुन्ह्याचा बेकायदेशीर तपास सुरु करुन तक्रारदार पुनमिया यांच्यासह अनेक व्यावसायिकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या देऊन त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप त्यांनी केला. शासनाचं खोटं पत्र तयार करून स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर असल्याचं भासवून कोर्टाचीही दिशाभूल केल्या प्रकरणी तक्रारदार संजय पुनमिया यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक संजय पांडे, वकील शेखर जगताप, सेवानिवृत्त एसीपी सरदार पाटील, श्यामसुंदर अग्रवाल, शुभम अग्रवाल, शरद अग्रवाल आदींची नावं आहेत. त्यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात सोमवारी 12 वाजताच्या सुमारास ईमेलद्वारे ही तक्रार केली आहे. पोलीस ठाण्याला ईमेल तक्रार दाखल झाल्यानंतर ठाणेनगर पोलिसांनी सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एन. आर. शिर्के करत आहेत. या गुन्ह्यात अद्यापपर्यंत कुणालाही अटक झालेली नसल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
हेही वाचा :