ETV Bharat / state

पत्नीला कर्करोग, डोक्यावर कर्जाचा डोंगर, उपचारात पैसे संपले; अखेर पत्नीला मारून पतीनं केली आत्महत्या, मुलगी थोडक्यात वाचली - Husband Wife Suicide Case

Husband Wife Suicide Case : पत्नीला झालेला रक्ताचा कर्करोग आणि उपचारासाठी डोक्यावर चढलेला कर्जाचा डोंगर यामुळे केरळच्या एका पतीने नागपुरात आल्यावर पत्नीला ठार मारलं. तसेच त्यानं पोटच्या 12 वर्षीय मुलीलाही ठार मारण्यचा प्रयत्न केला; परंतु ती थोडक्यात बचावली. ही घटना नागपुरातील जरिपटका पोलीस ठाणे हद्दीत काल घडली.

Husband Wife Suicide Case
दाम्पत्यानं जीवन संपविलं (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 5, 2024, 9:31 PM IST

नागपूर Husband Wife Suicide Case : पत्नीच्या उपचारासाठी केरळ राज्यातून नागपूरला आलेल्या एका दाम्पत्यानं आत्महत्या केली. तसेच त्यांच्या १२ वर्षीय मुलीलासुद्धा ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाणे हद्दीतील विजयश्री नगर नारा परिसरात घडलेली आहे. या घटनेमध्ये दाम्पत्याचा मृत्यू झाला असून मुलगी मात्र, थोडक्यात बचावली. तिच्यावर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय (मेयो) येथे उपचार सुरू आहेत.

उपचारासाठी आठवड्याला व्हायचा हजारोंचा खर्च : नागपुरातील जरीपटका भागात आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याची नावे रीजू विजयन उर्फ विजय नायर (४५) आणि प्रिया रीजू नायर (३४) अशी आहेत. आत्महत्या प्रकरणाचा जरीपटका पोलीस तपास करत आहेत. प्रिया रीजू नायर यांना रक्ताच्या कर्करोगाने ग्रासले होते. रीजू नायर यांनी प्रिया नायर यांच्यावर केरळ येथील रुग्णालयात उपचार केले; मात्र उपचारात फारसा फायदा होत नसल्यामुळं रीजू नायर हे पत्नी प्रिया आणि मुलगी वैष्णवीला घेऊन नागपूर शहरात आले. दोन महिन्यांपासून ते नागपूरमध्ये मुक्कामी होते. नागपुरातील एका खासगी पण महागड्या रुग्णालयात उपचार सुरू होते. दर आठवड्यात हजारो रुपयांचा खर्च उपचारात होत असल्यानं रीजू नायर आर्थिक विवंचनेत सापडले होते.

उपचारामुळे चढला कर्जाचा डोंगर : पत्नीच्या उपचारात जवळचे सर्व जमा पैसे संपल्यानंतर डोक्यावर कर्जाचा डोंगर तयार झाला होता. त्यामुळेच रीजू नायर यांनी पत्नीला ठार मारलं आणि मुलीला ठार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांनी स्वतःही आत्महत्या केली; परंतु रीजु नायर यांची १२ वर्षीय मुलगी थोडक्यात बचावली आहे.

मुलीने उलटी केल्याने थोडक्यात बचावली : रीजू नायर यांनी पत्नी प्रियाला ठार मारले. त्यानंतर स्वत:ची १२ वर्षीय मुलगी वैष्णवीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळात तिला उलट्या सुरू झाल्या. त्यामुळे ती थोडक्यात बचावली आहे. सध्या तिच्यावर नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आधारकार्डवर कोल्हापूरचा पत्ता : जरीपटका पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना तिथे मृतक रीजू नायर आणि प्रिया नायर यांचे आधारकार्ड मिळून आले आहे. त्यावर प्रिया यांच्या आधारकार्डवर कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेवाडी येथील निवासी पत्ता नोंद आहे.

हेही वाचा :

  1. नेते निवडणुकीत मश्गुल असताना रोज 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, चार महिन्यात 838 बळाराजांनी संपविली जीवनयात्रा - Farmers Suicide in Maharashtra
  2. बड्या नेत्यानं आईसह मुलीवर झाडल्या गोळ्या; स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या - Barnala Murder
  3. धक्कादायक! कोयना एक्स्प्रेसनं तीन महिलांना चिरडलं; अपघात की आत्महत्या, याबाबत उलट सुलट चर्चा - Koyna Express Accident

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.