ETV Bharat / state

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली विकसित भारताच्या 9 प्राधान्यक्रमांची माहिती - Nirmala Sitharaman budjet news

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 23, 2024, 12:26 PM IST

Updated : Jul 23, 2024, 12:33 PM IST

Nirmala Sitharaman budjet news : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तिसऱ्यांदा आरुढ झालेल्या मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. लोकसभेतील अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान त्यांनी विकसित भारतासाठी मोदी सरकारच्या 9 प्राधान्यक्रम देखील सांगितले आहेत.

Nirmala Sitharaman
अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Etv Bharat)

नवी दिल्ली - Nirmala Sitharaman budjet news : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विकसित भारताच्या 9 प्राधान्यक्रमांची माहिती दिली. सीतारामन यांनी मंगळवारी मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्या म्हणाल्या की, "भारतातील जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक तिसऱ्यांदा विजयी करुन पुन्हा निवडून दिलं आहे. जनतेचा पाठिंबा, विश्वास आणि आमच्या धोरणांवरील विश्वासाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत."

लोकसभेतील अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान, अर्थमंत्री सीतारामन यांनी विकसित भारतासाठी मोदी सरकारच्या 9 प्राधान्यक्रम देखील सांगितले आहेत. यामध्ये कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि लवचिकता, रोजगार आणि कौशल्ये, सर्वसमावेशक मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्याय, उत्पादन आणि सेवा, शहरी विकास, ऊर्जा संवर्धन, पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्ण संशोधन आणि विकास, नवीन पिढीतील सुधारणा यांचा समावेश आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, "अंतरिम अर्थसंकल्पात नमूद केल्याप्रमाणे, आपल्याला चार वेगवेगळ्या जाती गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी, आम्ही सर्व प्रमुख पिकांसाठी उच्च किमान आधारभूत किमती जाहीर केल्या आहेत. किमान 50% किमतीच्या मार्जिनचे वचन पूर्ण केलं आहे." त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. राष्ट्रपती कार्यालयानं सोशल मीडिया X वर या बैठकीची माहिती दिली. ते म्हणाले की, केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन, वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी आणि वित्त मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. राष्ट्रपतींनी अर्थमंत्र्यांचे अभिनंदन केलं. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हे दुसरे संसद अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -

  1. केंद्रीय अर्थसंकल्प 2024; सरकारला पाठिंबा दिल्याचा गिफ्ट; अर्थसंकल्पातून बिहारला मोठं गिफ्ट, रस्ते बांधणीसाठी 26 हजार कोटींचा निधी - Union Budget 2024
  2. अर्थमंत्री निर्मला सीतारामन रेड टॅबलेट घेऊन संसदेत दाखल, पाहा फोटो - Union budget 2024
  3. निर्मला सीतारामन इतिहास रचणार! सातव्यांदा सादर करणार 'अर्थसंकल्प' - interesting facts of budget

Last Updated : Jul 23, 2024, 12:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.