ETV Bharat / state

"पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दिले दोन पत्ते; मदत करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा" - Vijay Kumbhar on Pooja Khedkar

Vijay Kumbhar on Pooja Khedkar वादग्रस्त परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्र काढलं आहे. मात्र हे दिव्यांग प्रमाणपत्र देताना गैरप्रकार करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिलं आहे.

Vijay Kumbhar on Pooja Khedkar
पूजा खेडकर विजय कुंभार (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 26, 2024, 7:33 PM IST

पुणे Vijay Kumbhar on Pooja Khedkar : परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या बाबतीत नवनवीन खुलाशांना पेव फुटत आहे. आता पूजा खेडकर यांना देण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या बाबत यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांची पाठराखण करण्याचं धोरण प्रशासनानं स्वीकारलं आहे, असा आरोप विजय कुंभार यांनी केला. पूजा खेडकर यांना मदत करणाऱ्या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, असं पत्र सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना दिलं आहे.

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या संदर्भात सुरवातीपासून सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार हे लढा देत आहेत. पूजा खेडकरशी निगडीत अनेक प्रकरणं त्यांनी समोर आणले आहेत. आता पूजा खेडकर यांच्या प्रकरणात पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून त्यांना देण्यात आलेल्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्राबाबत जे गुन्हेगार असतील, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, असं पत्र त्यांनी लिहिलं आहे.

एकाच दिवशी दोन रुग्णालयात अर्ज : या पत्रात कुंभार यांनी म्हटलं आहे की, पूजा खेडकर यांनी एकाच दिवशी म्हणजे २३ ऑगस्ट २०२३ रोजी दोन अर्ज केले. एक यशवंतराव चव्हाण रुग्णालय आणि दुसरा औंध जिल्हा रुग्णालयाकडं दाखल केला आहे. या दोन्ही ठिकाणी त्यांनी पुराव्यादाखल आपला वास्तव्याचा पत्ता वेगवेगळा दिला आहे. औंध रुग्णालयाकडं अर्ज करताना औंधचा पत्ता दिला, तर यशवंतराव चव्हाण रुग्णालयाकडं तळवडे या गावाचा पत्ता दिला असल्याचं समोर आलं आहे. औंध रुग्णालयात त्यांनी आधार कार्ड जोडलं होतं. तर यशवंतराव चव्हाण रुग्णालयाकडं राशन कार्ड जोडलं आहे. एकाच कारणासाठी दोन वेगवेगळे अर्ज वेगवेगळ्या ठिकाणी करणं, इथंच त्यांची गुन्हा करण्याची प्रवृत्ती दिसून आली आहे. अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ओळखीचा परता म्हणून फोटो आयडी जोडावा लागतो. तो जोडलेला नसतानाही त्यांना ते प्रमाणपत्र कसं देण्यात आलं ? असा सवाल यावेळी कुंभार यांनी केला आहे.

यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी पूजा खेडकर यांनी रेशन कार्ड पुरावा म्हणून जोडला होता. त्यात त्यांचं वय ३ वर्ष असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. ही बाब दुर्लक्षित का केली, असं असताना आता अधिकारी म्हणत आहेत, आम्ही आधार कार्ड पाहिलं असं असेल, तर मग आधार कार्ड आणि रेशन कार्ड यावरील पत्त्यामध्ये फरक आहे. हे अधिकाऱ्याऱ्यांनी पाहिलं का नाही? अर्जात दिलेल्या पुराव्या व्यतिरिक्त पुरावा अधिकाऱ्यांनी ग्राह्य का धरला? असा आरोपही त्यांनी केला आहे.

अधिकाऱ्यांनी का लक्ष दिलं नाही: "पूजा खेडकर यांनी औंध रुग्णालयात केलेल्या अर्जात आपल्यावर ससून आणि बीजे मेडिकल कॉलेजमध्ये उपचार चालू असल्याचं म्हटले आहे. तर यशवंतराव चव्हाण रुग्णालयाकडं केलेल्या अर्जात यशवंत चव्हाण रुग्णालयातच उपचार केलं असल्याचं म्हटलं आहे. आपल्या रुग्णालयात उपचार झालेले नाहीत, ही बाब अधिकाऱ्यांनी का लक्षात घेतली नाही? असं असून पूजा खेडकर यानी २०१८ आणि २०२० साली अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातून अपंगत्वाचं सर्टिफिकेट घेतल्याचा अहवाल आपल्याकडं0 आला आहे. परंतु औंध आणि यशवंतराव चव्हाण रुग्णालयाकडं केलेल्या अर्जामध्ये त्यांनी आपल्याकडं आधीच सर्टिफिकेट नसल्याचं म्हटलेलं आहे. ही तफावत फार मोठी आहे आणि हा गंभीर गुन्हा आहे. याचा तपास करण्यात यावा असं," देखील यावेळी कुंभार यांनी पत्रात म्हटलं आहे.

हेही वाचा

  1. पूजा खेडकर पोहोचल्याच नाही मसुरीला; विजय कुंभार यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र, 'ही' केली मागणी - Vijay Kumbhar on Pooja Khedkar
  2. आई-वडिलांचा घटस्फोट; तरीही पूजा खेडकर नॉन क्रिमीलेअरसाठी अपात्र - सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार - Pooja Khedkar Case
  3. 'ती' चूक भोवली, जामीन फेटाळल्यानंतर मनोरमा खेडकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी - Manorama Khedkar

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.