ETV Bharat / state

ठाण्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली; नरेश म्हस्के यांच्या रॅलीत गुंडांची मारामारी - Gangster fight Naresh Mhaske Rally - GANGSTER FIGHT NARESH MHASKE RALLY

Gangster fight at Naresh Mhaske Rally : ठाण्यात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक रॅलीत गुंड सिद्धू अभंगे आणि अजय पासी यांच्यात मारामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळं ठाण्यात कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचं दिसून येत आहे.

Gangster fight at Naresh Maske Rally
नरेश मस्के यांच्या रॅलीत गुंडांची मारामारी (मनोज देवकर)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 3, 2024, 4:19 PM IST

नरेश मस्के यांच्या रॅलीत गुंडांची मारामारी (मनोज देवकर)

ठाणे Gangster fight at Naresh Mhaske Rally : गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. नवे पोलीस आयुक्त आल्यानंतर मारामारीची प्रकरणं कमी झाल्याचं दिसत नाहीय. त्यामुळं गुंडांच्या पाठीमागं राजकीय ताकद असल्यानं मारामारीच्या घटनात वाढ होताना दिसतेय. आज महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीत दोन गुंड एकमेकांना भिडल्याचं समोर आलं आहे.

सिद्धू अभंगे आणि अजय पासी यांच्यात हाणामारी : ठाण्यात लोकसभेच्या उमेदवारीसाठी आज सकाळी महायुतीचा मोठा मेळावा झाला. या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही ठाण्यातील गुंड सिद्धू अभंगे आणि अजय पासी यांच्यात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. अशा धक्कादायक घटना यापूर्वीही ठाण्यात पाहायला मिळाल्या आहेत. त्यामुळं ठाण्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. व्हिडिओमध्ये मारामारीदरम्यान पोलिसांचा फौजफाटाही तैनात होता. आगामी लोकसभा निवडणुकीच्या काळातही असे, प्रकार रोखले पाहिजे, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावलेल्या मेळाव्यात असे प्रकार घडत असतील तर, ठाणेकर सुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोण आहे सिद्धू अभंगे : सिद्धू अभंगे हा शिंदे गटातील पदाधिकारी आहे. खंडणी उकळणे, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीररीत्या हत्यार बाळगणे, सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवणे, हाणामारीचे प्रकार करणे, असे गुन्हे त्याच्याविरोधात दाखल आहेत. ठाण्यातील कोपरी, चितळसर, वर्तकनगर अशा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्याविरुद्ध पोलिसांकडे अनेक तक्रारी आल्या आहेत.

भाजपामध्ये नाराजी नाट्य : ठाणे मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे गट) नरेश म्हस्के यांना महायुतीनं उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघासाठी भाजपाचा आग्रह होता, मात्र ही जागा राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आलं. मात्र नरेश म्हस्के यांना उमेदवारी मिळताच भाजपामध्ये खळबळ नाराजी नाट्य दिसून आलं. संजीव नाईक यांना उमेदवारी न मिळाल्यानं नाईक यांच्या समर्थकांनी राजीनामे दिले. त्यामुळं ठाण्यात भाजपा-शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली. त्यानंतर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी या प्रकरणाची तातडीनं दखल घेतली.

हे वाचलंत का :

  1. सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर झालं क्रॅश; थरार कॅमेऱ्यात कैद - Helicopter Crash In Mahad
  2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भावनिक साद, म्हणाले 'उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत' - Pm Modi On Uddhav Thackeray
  3. ठाण्यातील 'या' 'मनसे' नेत्याविरोधात पाच कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप; सराफाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल - Avinash Jadhav

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.