ETV Bharat / state

शॉपिंग सेंटरच्या स्वच्छतागृहात महिला वकिलाचा विनयभंग, जिवे मारण्याचाही प्रयत्न; आरोपीला अटक - Woman Molesting In Mumbai

Woman Molesting In Mumbai : दक्षिण मुंबईतील एका शॉपिंग सेंटरच्या स्वच्छतागृहात 35 वर्षीय महिला वकिलाला मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आलीय.

Woman Molesting In Mumbai
शॉपिंग सेंटरच्या स्वच्छतागृहात महिला वकिलाचा विनयभंग, जिवे मारण्याचाही प्रयत्न; आरोपीला अटक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 20, 2024, 9:20 AM IST

Updated : Apr 20, 2024, 3:14 PM IST

मुंबई Woman Molesting In Mumbai : दक्षिण मुंबईतील एका शॉपिंग सेंटरच्या स्वच्छतागृहात एका 35 वर्षीय महिला वकिलाचा विनयभंग आणि तिच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका आरोपीला अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी शुक्रवारी दिली. पीडितेचं कार्यालय असलेल्या लोकमान्य टिळक मार्गावरील अशोका शॉपिंग सेंटरमध्ये ही घटना घडल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं.

कुठं घडली घटना : पोलिसांनी सांगितलं की, सकाळी ती (महिला वकील) शॉपिंग सेंटरच्या टॉयलेटमध्ये गेली. तेव्हा 21 वर्षीय तरुणाला तिनं आतमध्ये पाहिलं, तेव्हा तिनं त्याला निघून जाण्यास सांगितलं. नंतर आरोपीनं तो निघून जात असल्याचा बहाणा केला, त्यानंतर ती टॉयलेटमध्ये गेली. मात्र जेव्हा ती बाहेर आली, तेव्हा तिला तो माणूस दारात उभा असल्याचं दिसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

आरोपीला अटक : तिनं मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर आरोपीनं तिचा विनयभंग केला आणि तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पीडिता कसं तरी तिथून जीव वाचवून पळून जाण्यात यशस्वी झाली. याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यातून माहिती मिळाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली असून त्याचं नाव रमाशंकर गौतम उर्फ ​​संदीप पांडे असं आहे.

आरोपीला ठोठावली पोलीस कोठडी : आरोपी जवळच्या कार्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, चुकीच्या पद्धतीनं प्रतिबंध, प्राणघातक हल्ला आणि इतर गुन्हे दाखल केल्याचं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता आरोपीला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन तडाखे यांनी दिलीय.

हेही वाचा :

  1. पत्नीचा फोन नंबर पतीनं सोशल माध्यमांवर केला शेअर; 'कॉल गर्ल हवी असल्यास फोन करण्याचं आवाहन, गुन्हा दाखल - Bengaluru Crime
  2. ग्रीन कार्डच्या हव्यासापोटी मित्रांबरोबर अदला-बदली करण्याची बळजबरी, अमेरिकेहून परत येताच महिलेची पतीविरोधात तक्रार - Meerut Wife Swapping Case
  3. शाळेत खराब केळी मिळाल्याचा जाब विचारल्यानं मुख्याध्यापिकेनं 8 वर्षीय विद्यार्थ्याला वर्गात बोलावलं अन् केलं भयंकर कृत्य - Buldana crime news

Last Updated : Apr 20, 2024, 3:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.