ETV Bharat / state

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सावडाव धरणाचं काम पाडलं बंद; मशिनरी, डंपर काढले बाहेर, 'हे' आहे कारण - Savadav Dam issue

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 17, 2024, 8:02 PM IST

Savadav Dam Issue : सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोंडाघाट मृद आणि जलसंधारण विभागाचे उपविभागीय कार्यालयाकडून कणकवली तालुक्यातील सावडाव धरणाचं काम शेतकऱ्यांना जमीन भूसंपादनाचा मोबदला न देताच केवळ संयुक्त मोजणीची नोटीस देत केलं. आज धरण परिसरात संबंधित ठेकेदाराकडून प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आलं. अखेर स्थानिक शेतकऱ्यांनी याला विरोध करत काम बंद पाडले.

Savgao Dharan Project Issue
प्रकल्पग्रस्त शेतकरी (Reporter)
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बाजू उचलून धरताना शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी (Reporter)

सिंधुदुर्ग Savadav Dam Issue : कणकवली तालुक्यातील सावडाव धरण परिसरात वडीलोपार्जित असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर ठेकेदाराने दांडगाईनं काम चालू केलं आहे. अखेर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी गुरुवारी थेट धरण परिसरात जाऊन ठेकेदाराला जाब विचारत काम बंद पाडलं. तसंच मशिनरी, डंपर धरण परिसरातून बाहेर काढायला भाग पाडले. या शेतकऱ्यांच्या आंदोलनात शिवसेना उबाठा पक्षाचे तालुकाध्यक्ष कन्हैया पारकर आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेत शेतकऱ्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला.

यामुळे शेतकऱ्यांनी छेडलं आंदोलन : प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सावडाव धरण २ चे उ‌द्घाटन झाल्यावर एक महिन्यांच्या आत प्रत्येक प्रकल्पग्रस्तास त्यांच्या भूसंपादित जमिनीतील झाडे, बांधकाम, विहीर, जमिनीतील इतर बाबींचा तसंच जमिनीचा किती, कधी आणि कोणत्या प्रकारे मोबदला मिळणार याबाबत लेखी स्वरुपात पत्र देण्याचं आश्वासन दिलं होतं; परंतु, त्या आश्वासनाची पूर्तता न करताच धरणाचं काम सुरू करण्यात आलं आहे. ठेकेदाराला हाताशी धरून फोंडाघाट मृद व जलसंधारण विभागाचे अधिकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण आणि घुसखोरी करून परस्पर धरणाचं काम करत आहेत, असा आरोप करत सावडाव येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी धरण परिसरात जाऊन आंदोलन छेडले.

आमचा धरणाला विरोध नाही – प्रकल्पग्रस्त शेतकरी : शेतकऱ्यांना किती आणि केव्हा मोबदला मिळणार याबाबत कोणतीही माहिती शासनाकडून देण्यात आलेली नाही. केवळ संयुक्त मोजणी करण्याबाबत नोटीसा देण्यात आल्या. मात्र, येथील नुकसान भरपाई काय मिळणार कोणत्या स्वरूपात मिळणार? याबाबत लेखी दिलेले नाही. ठेकेदाराला हाताशी धरून अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला.

शिवसेना उबाठा पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार – कन्हैया पारकर : यावेळी शिवसेना उबाठा पक्षाकडून या शेतकऱ्यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यात आला. आमचा धरणाला विरोध नसून मूळ शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाने पूर्ण कराव्यात. शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला न देता जमिनीमध्ये धरणाचे जे काम चालू असून ते चुकीच्या पध्दतीने चालू आहे. त्याचे मूल्यांकन न करताच झाडे आणि जमीन उदध्वस्त करण्याचे काम केलं जात आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पुढील काळात आम्ही शेवटपर्यंत राहणार आहोत. अधिकारी आणि ठेकेदाराने धरणाचे काम करत शेतकऱ्यांची फसवणूक केली. केवळ या ठेकेदारीतून पैसे खाण्यासाठी केलेला प्रकार आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचे समाधान होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांनी दिला. यावेळी शिवसेना महिला आघाडीप्रमुख नीलम पालव-सावंत, राजू राठोड, दिव्या साळगांवकर, माधवी दळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तर सावडाव धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये वैभव सावंत, नयना सावंत, विष्णू झगडे, आनंद नरसाळे, विद्याधर वारंग, संभाजी तेली, बाळकृष्ण चव्हाण, संदीप खांदारे, सतीश मोरे आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी ठेकेदाराचे धरले पाय : सावडाव धरणाचे कामबंद पाडण्यासाठी शेतकऱ्यांनी धरण परिसराच आंदोलन छेडले. शेतकऱ्यांनी ठेकेदाराच्या प्रतिनिधीला आमचा मोबदला मिळाला नसल्याने काम बंद करा, अशी विनंती केली. परंतु, ठेकेदार मानत नसल्याने शेतकऱ्यांनी गांधीगिरी करत ठेकेदाराचे चक्क पाय धरले.

हेही वाचा:

  1. शिरुर लोकसभेच्या ईव्हीएम स्ट्रॉंग रुमच्या सीसीटीव्हीची स्क्रिन 24 तास बंद? जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले... - Lok Sabha Election
  2. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा जातीची गोळाबेरीज; कोणत्या मतदारसंघात कोणत्या जातीचं वर्चस्व? - Caste Equations In Mumbai
  3. "निवडून आल्यावर विरोधात राहीन, पण जातीयवादी शक्तींबरोबर जाणार नाही", हितेंद्र ठाकूर यांचा निर्णय - Hitendra Thakur Determination

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.