ETV Bharat / state

हरहुन्नरी कलावंत हरपला; ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन - Vijay Kadam Passed Away

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 10, 2024, 10:42 AM IST

Updated : Aug 10, 2024, 2:51 PM IST

Vijay Kadam Passed Away : ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं आज सकाळी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर दुपारी दोन वाजता ओशिवरा इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विजय कदम यांच्या पश्चात त्यांची पत्नी पद्मश्री, मुलगा गंधार असा परिवार आहे.

Vijay Kadam Passed Away
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

मुंबई Vijay Kadam Passed Away : सुप्रसिद्ध मराठी अभिनेते विजय कदम यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. अभिनेते विजय कदम हे मागील काही दिवसांपासून कर्करोगानं ग्रस्त होते. नुकतेच ते कर्करोगातून बरे झाल्यानंतर पुन्हा कर्करोगानं उचल खाल्ली. त्यातच त्यांचं आज सकाळी निधन झालं. विजय कदम यांना आज सकाळी अ‍ॅसिडीटीचा त्रास जाणवत होता. त्यानंतर त्यांचं निधन झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तियांनी दिली. विजय कदम यांच्या पार्थिवावर अंधेरीतील ओशिवरा इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती ज्येष्ठ अभिनेते जयंत वाडकर यांनी ईटीव्ही भारतला दिली.

ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी ईटीव्ही भारतला दिलेली प्रतिक्रिया (ETV Bharat)

हरहुन्नरी अभिनेता काळाच्या पडद्याआड गेल्यानं बसला धक्का : ''विजय कदम यांचं काम मी 1983 सालापासून पाहत आलो आहे. 'टूरटूर' नाटकात आम्ही एकत्र काम केलं होतं. त्यानंतरही अनेक कलाकृतींमध्ये आम्ही एकत्र काम केलं. ते अतिशय हुशार आणि हरहुन्नरी कलावंत होते. रंगभूमीवर आणि स्क्रीनवर रिअ‍ॅक्शन कशी द्यायची, हे मला विजय कदम यांनी शिकवलं. रंगभूमीवर आणि कॅमेऱ्यासमोर रिअ‍ॅक्शन देण्यातला जो सूक्ष्म फरक असतो, तो त्यांनी मला समजवून सांगितला. मदतीसाठी ते कधीही एका पायावर तयार असायचे. त्यांनी सर्वांना कायम खूप मदत केली. विजय कदम यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला," अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेता आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली.

ज्येष्ठ अभिनेते पुरुषोत्तम बेर्डे यांनी ईटीव्ही भारतला दिलेली प्रतिक्रिया (ETV Bharat)

पुरुषोत्तम बेर्डे - विजय कदम या जोडगोळीनं घातला धुमाकूळ : कदम कुटुंबीयांच्या निकटवर्तियांपैकी एक असलेल्या लेखक-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांना विजय कदम यांच्या आजाराविषयी ठाऊक होतं. विजय कदम यांच्या निधनाने आपण एक जिवलग मित्र आणि कुशल कलाकार गमावल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिग्दर्शित केलेलं 'खंडोबाचं लगीन' या कलाकृतीतून 1979 साली पुरुषोत्तम बेर्डे आणि विजय कदम यांचा एकत्रित नाट्य प्रवास सुरू झाला. "आधी एकांकिका असलेली 'टूरटूर' आम्ही व्यावसायिक नाटक म्हणून रंगभूमीवर आणली. तेव्हा विजय कदम त्यात प्रमुख भूमिकेत होता. या नाटकाचे अनेक 'हाऊसफुल्ल' प्रयोग आम्ही एकत्र केले. त्यानंतर दादा कोंडके यांनी अजरामर केलेलं 'विच्छा माझी पुरी करा' हे वगनाट्य मी विजयला बरोबर घेऊन केलं. तो अफलातून अभिनेता होता. त्याच्या कुवतीला साजेसी भूमिका मी चित्रपटात देऊ शकलो नाही, याची खंत कायम राहील. माझ्या 'क्लोज एन्काउंटर' पुस्तकावर आधारित कलाकृतीत वच्छा किंवा बाळूची व्यक्तिरेखा विजय साकारणार होता. पण हे घडायचं नव्हतं. माझ्या टूरटूर, अलविरा डाकू आदी काही नाटकं पुस्तकरुपात यायची होती. 'टूरटूर' ची अर्पणपत्रिका मी विजय कदमच्या नावे केली होती. चार दिवसापूर्वी त्याची पत्नी पद्मश्रीला मी विजयच्या तब्येतीविषयी चौकशी करण्यासाठी कॉल केला होता. पण त्याआधीपासूनच मन अनामिक भीतीनं थरथरत होतं." या शब्दांत पुरुषोत्तम बेर्डे यांनी आपल्या मित्राविषयीच्या भावना व्यक्त केल्या. आधी एकांकिका आणि नंतर व्यावसायिक नाटक म्हणून देश-विदेशात गाजलेल्या 'टूरटूर' या नाटकातून बेर्डे आणि कदम ही लेखक, दिग्दर्शक - अभिनेता जोडगोळी एकत्र आली आणि त्यांनी धुमाकूळ घातला. 'ईटीव्ही मराठी'वर दीर्घकाळ चाललेल्या 'टूरटूर' या मालिकालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

अष्टपैलू अभिनेता हरपला याचं दु:ख : आनंदी आनंद, हळद रुसली कुंकू हसलं, आम्ही दोघं राजा राणी, तेरे मेरे सपने, देखणी बायको नाम्याची, रेवती, भेट तुझी माझी सारखे अनेक चित्रपट विच्छा माझी पुरी करा, आम्ही आलो रे सारखी नाटकं आणि होळी रे होळी सारख्या अनेक मालिकांमधून विजय कदम यांचा बहारदार अभिनय रसिकांना अनुभवता आला. 'खुमखुमी' या त्यांच्या 'सबकुछ विजय कदम' विनोदी कार्यक्रमाने देश-विदेशात बहार उडवून दिली. त्यांची पत्नी पद्मश्री कदम (पूर्वाश्रमीची जोशी) यांनीही काही काळ अभिनेत्री म्हणून कलासृष्टीला उत्तम योगदान दिलं. अभिनेत्री पल्लवी जोशी (अग्निहोत्री), अभिनेता मास्टर अलंकार हे विजय कदम यांचे अनुक्रमे मेहुणी आणि मेहुणे तर पल्लवी यांचे पती दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे विजय कदम यांचे साडू. विजय कदम हे आपल्या सर्व नातेवाईक तसंच हजारो चाहत्यांना दुःखसागरात लोटून अज्ञाताच्या प्रवासाला निघून गेले आहेत.

हेही वाचा :

  1. Ravindra Mahajani Passed Away : 'झुंज' संपली, मराठी चित्रपटसृष्टीचा 'देवता' काळाच्या पडद्याआड; अभिनेते रवींद्र महाजनींचा बंद घरात आढळला मृतदेह
  2. मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड!
  3. Actor Milind Safai passes away ज्येष्ठ अभिनेते मिलिंद सफई यांचं निधन; मराठी मालिकांसह चित्रपटांमध्ये पाडली होती छाप

Last Updated : Aug 10, 2024, 2:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.