सांगली Fake currency notes factory busted : सांगली पोलिसांना गस्त दरम्यान बनावट नोटा विक्री करताना अहद शेख याला पकडण्यात आलं होतं. त्यानंतर त्याच्याकडून बनावट नोटांची छपाई करून विक्री करण्यात येत असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर शहर पोलिसांनी मिरज शहरातल्या शेख याच्या घरावर छापा टाकत बनावट नोटांची छपाई करणाऱ्या मशीनसह 50 रुपयांच्या 1 लाख 90 हजारांच्या बनावट नोटा असा 3 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शेख याच्याकडून 50 रुपयांच्या बनावट नोटा छापून विक्री करण्यात आल्या. याची व्याप्ती मोठी असल्यानं आंतरराज्य कनेक्शन असल्याची शक्यता सांगली पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
झटपट श्रीमंतीसाठी अवलंबला 'हा' मार्ग : अनेकवेळा डिजिटल फ्रॉड करण्यासाठी नवनवीन शक्कल लढवल्याच्या घटना आपल्या कानावर येतात. त्यामुळे आता त्यापेक्षाही पुढे जाऊन चक्क आपली स्वतंत्र अवैध बँक किंबहुना अमाप पैसा विना परिश्रम छापण्याचे विचार समाजात वाढत आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आजच्या काळात झटपट श्रीमंत होण्याची इच्छा आणि झगमग राहणीमानाच्या हव्यासापोटी तरुण पिढी आणि काही गुन्हेगार बनावट चलन छापण्याच्या मार्गाकडे वळत आहेत. अशातच बुलढाण्यात चक्क बनावट नोटा छापण्याची मशीन पोलिसांनी जप्त केल्यानंतर सर्वजण अवाक् झाले. आता सांगली जिल्ह्यात अगदीच छोट्याशा जागेत असे उद्योग करताना एकजण सापडल्यानं पोलिसांचं काम वाढलं आहे.
बुलढाण्यात बनावट नोटा छापण्याची मशीन : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात 2023 साली एका व्यक्तीकडे बनावट नोटा छापण्याच्या मशीन्स आढळून आल्याने एकच खळबळ माजली होती. शहरातील कुख्यात जग्गू डॉन याने शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्यानंतर त्याने बनावट नोटा छापण्याचं मशीन आणल्याची गोपनीय माहिती मलकापूर पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे जग्गू डॉनच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात मशीन मिळाल्या नाहीत. दिवसेंदिवस अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस येत असल्यानं पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
हेही वाचा :
- नितेश राणेंचे आदित्य ठाकरेंना चॅलेंज...मग मुंबईतील महायुतीच्या आमदारांचं काय? - Lok Sabha Election Result 2024
- नरेंद्र मोदी यांची भारताच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा निवड, राष्ट्रपतींकडून शिक्कामोर्तब, शपथविधीचंही दिलं निमंत्रण - PM Narendra Modi Oath Ceremony
- कीर्तिकर यांच्या ऐवजी आम्हाला जागा मिळाली असती तर,...; कीर्तिकरांच्या पराभवावर काय म्हणाले नाना पटोले? - Congress Party