ETV Bharat / state

तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आराखडा अभिप्रायाची मुदत वाढवा; अंबादास दानवेंची मागणी - Ambadas Danve On Education Plans

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 1, 2024, 7:43 PM IST

Ambadas Danve On Education Plans : राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 मसूदा (Education Plans) परिषदेच्या संकेतस्थळावर 23 मेपासून जनतेसाठी खुला करण्यात आलाय. त्यासंदर्भातील अभिप्राय नोंदविण्यासाठी 3 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आराखड्याच्या अभिप्रायसाठी मुदत वाढ द्यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलीय.

Ambadas Danve
अंबादास दानवे (ETV BHARAT HM DESK)

मुंबई Ambadas Danve On Education Plans : राज्यातील तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक गुणवत्ता वाढीसाठी शालेय शिक्षण विभागाकडून राज्याचा शैक्षणिक आराखड्याचा मसुदा ( Deadline For Education Plan Feedback) तयार करण्यात आला आहे. सदर आराखड्यातील त्रुटींवर काम करण्यासाठी आणि परिपूर्ण आराखडा तयार करण्यासाठी या आरखड्यावर अभिप्राय नोंदवण्याकरीता मुदत वाढ द्यावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांकडं पत्राद्वारे केलीय.

राज्याचा शैक्षणिक आराखड्याचा मसुदा तयार : राज्यातील तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक गुणवत्ता वाढीसाठी शालेय शिक्षण विभागाकडून राज्याचा शैक्षणिक आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. मात्र विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण विभाग आणि मुंबई विभाग या विभागातील शिक्षक, पालक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करणं आवश्यक आहे. त्यामुळं सदर आराखड्यातील त्रुटींवर अधिक चांगलं काम करता येईल आणि एक परिपूर्ण आराखडा तयार करण्यास मदत होईल. याबाबतची वस्तूस्थिती पाहता शैक्षणिक विभागानं नागरिकांना अभिप्राय देण्यास दिलेला कालावधी कमी असल्याचं विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं म्हणणं आहे.

पत्राद्वारे मुदतवाढीची मागणी : यासंदर्भात राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांना पत्र पाठवून दानवे यांनी मुदतवाढीची मागणी केलीय. शैक्षणिक विभागाने दिनांक ३ जून, २०२४ पर्यंत अभिप्राय सादर करण्यास दिलेला आहे. मात्र आराखड्यातील त्रुटी दूर करुन परिपूर्ण आराखडा तयार करण्याच्या दृष्टीनं या कालावधीला दिनांक १५ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केलीय.

हेही वाचा -

  1. राज्यातील प्रकल्प परराज्यात का जात आहेत? सरकारची उदासीनता की आणखी काय? - Chhatrapati sambhajinagar project
  2. डोंबिवली घटनेवरुन अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'सरकार कारवाई नाही उलट धंदा..." - Dombivli fire Incident
  3. महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प परराज्यात, अंबादास दानवेंकडून सरकारवर आरोप - Ambadas Danve

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.