नागपूर Ganeshpeth Bus Depo Bomb : नागपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या गणेशपेठ बस आगाराच्या वर्कशॉपमध्ये उभ्या असलेल्या एका बसमध्ये बुधवारी (7 फेब्रुवारी) बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आल्यानं खळबळ उडाली होती. (Nagpur Bomb News) गडचिरोली आगाराची ही बस होती. ती १ फेब्रुवारीला नागपूरला आली होती. तेव्हापासून ती नादुरुस्त असल्यानं आगाराच्या वर्कशॉपमध्ये उभी होती.
बॉम्ब शोधक पथकाची घटनास्थळी धाव : बुधवारी दुपारी बसचे मेकॅनिक बसची तपासणी करण्याकरिता बसमध्ये गेले असता त्यांना चालक सीटजवळ बॉम्ब सदृश वस्तू आढळून आली. त्यांनी लगेच या संदर्भातील माहिती गणेशपेठ बस आगार व्यवस्थापकांना दिली. यानंतर त्यांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बॉम्बशोधक नाशक पथकाच्या मदतीनं केलेल्या तपासणीत संशयास्पद वस्तू ही बॉम्बसदृश्य असल्याचं दिसून आलं. बॉम्बशोधक आणि नाशक पथकानं बॉम्बसदृश वस्तूला तपासणी करण्यासाठी सुराबर्डीच्या सेंटरला नेलं. त्याठिकाणी या वस्तूची तपासणी करण्यात आलीय. त्यानंतरच ती वस्तू बॉम्ब नसल्याचा खुलासा झालाय.
बॉम्ब नसल्याचा खुलासा : १ फेब्रुवारी रोजी बस गडचिरोली आगारातून नागपूर गणेशपेठ आगारात आली होती. त्यानंतर ती नादुरुस्त असल्यानं वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी पाठवण्यात आली. ४ फेब्रुवारीला ही बस नागपूरच्या सावनेर येथे पाठवण्यात आली होती. आज परत ही बस काटोल येथे पाठवण्यात आली होती. १ ते ७ फेब्रुवारी दरम्यान बस नागपूर आगाराच्या ताब्यात आहे. बसने सावनेर आणि काटोलचा प्रवासही केला होता. मात्र, या बसमधील 'ती' वस्तू बॉम्ब नसल्याची माहिती आता समोर आलीय.
हेही वाचा: