पुणे Anil Deshmukh : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी केली असून राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. राज्यात लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपलं मत व्यक्त केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील नवनिर्वाचित खासदार आणि आमदारांची आज बैठक बोलावली, यावेळी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख या बैठकीला आले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.
विधानसभेनंतर महाविकास आघाडीचं सरकार येणार : यावेळी बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, "लोकसभेच्या निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 10 पैकी 8 जागा निवडून आल्या आहेत. पुढील तीन महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. ही निवडणूक राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि मित्र पक्ष मिळून लढविणार असून राज्यात या निवडणुकीत 100 टक्के महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचं चित्र संपूर्ण राज्यात आहे." तसंच पुढील तीन महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे आणि आजच्या बैठकीत येणाऱ्या विधानसभा बाबत बैठक आयोजित करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
पुढील काळात काय होत ते बघा : अजित पवार यांच्या पक्षाचे अनेक आमदार संपर्कात असल्याचं सांगितलं जातंय, याबाबत देशमुख यांना विचारलं असता ते म्हणाले, ज्या पद्धतीचा निकाल लोकसभा निवडणुकीत लागला आहे, ते पाहता जे आमदार सोडून गेले होते त्यांच्यात चुळबूळ सुरु असून अनेकजण हे संपर्क करत आहेत. पुढील काळात काय होतंय हे बघुया असंही यावेळी देशमुख म्हणाले.
हेही वाचा :
- अजित पवार आले म्हणून लंगोट तरी वाचली, उशिरा आले असते तर...; अमोल मिटकरींचं रामदास कदमांना प्रत्युत्तर - Amol Mitkari On Ramdas Kadam
- आमदार अपात्र ठरले तर त्यांचं मतदान विधान परिषद निवडणुकीत ग्राह्य की बाद? काय सांगते घटना? - Vidhan Parishad Election 2024
- लोकसभेतील पराभवानंतरही पंकजा मुंडेंना मिळणार मोठी जबाबदारी; देवेंद्र फडणवीसांची खेळी? - Pankaja Munde Rajya Sabha