ETV Bharat / state

तहसीलदार कार्यालयातून चोरली ईव्हीएम मशीन; पाहा सीसीटीव्ही - ईव्हीएम मशीन

EVM Machine Stolen : पुणे येथील पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीन चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

EVM Machine
ईव्हीएम मशीन चोरी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 6, 2024, 2:25 PM IST

तहसीलदार कार्यालयातून ईव्हीएम मशीन चोरताना सीसीटीव्ही

पुणे EVM Machine Stolen : देशात यावर्षी लोकसभा निवडणूक होणार असून सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरू असताना, पुण्यातील सासवड येथील तहसीलदार कार्यालयातून तीन अज्ञात व्यक्तींनी ईव्हीएम मशीनची चोरी केल्याची घटना घडलीय. सासवड पोलिसांनी ही माहिती दिली. तर ईव्हीएम चोरी करतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

पोलिसांकडून गुन्हा दाखल : या प्रकरणी सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून पथक नेमून आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांकडून या अज्ञात चोरांना पकडण्यासाठी विविध ठिकाणी पथके पाठवण्यात आली आहेत. सासवड पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाकीची ईव्हीएम मशीन सुरक्षित : सासवड तहसील कार्यालय येथे 40 ईव्हीएम ठेवण्यात आली आहेत. त्या मशिन्सपैकी एकच डेमो युनिट अज्ञात चोरट्यांनी चोरलं असून बाकीची मशिन सुरक्षित आहेत. आमची टीम आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिलीय. तर पुढील तपास पोलीस करत आहेत.

मतदारांसाठी रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन : भारतीय निवडणूक आयोगाने देशातल्या स्थलांतरित मतदारांसाठी रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (RVM) चा नमुना विकसित केला (Remote EVM for Domestic Migrant Voters) आहे. जाद्वारे एकाच बूथवरून 72 मतदारसंघात दूरस्थ मतदान कररता येते. आयोगाने गुरुवारी रिमोट व्होटिंगवर संकल्पना नोट तयार केली असून, अंमलबजावणीबाबत मते मागवली आहेत. त्याची अंमलबजावणी करताना येणाऱ्या कायदेशीर, प्रशासकीय आणि तांत्रिक आव्हानांवर राजकीय पक्षांची मतंही मागवली होती. निवडणूक आयोगाने 16 जानेवारी, 2023 रोजी सर्व 8 मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आणि 57 पक्षांसाठी RVM चं प्रात्यक्षिक नियोजित केलं आहे आणि त्यासाठीचं आमंत्रण लॉटला देण्यात आलं आहे.

हेही वाचा -

ईव्हीएम हॅकिंगच्या व्हायरल व्हिडिओमुळे ठाण्यात खळबळ; हॅकरसह एकावर गुन्हा दाखल

हिमाचल विधानसभा निवडणूक संपताच खासगी वाहनात सापडले ईव्हीएम मशीन

'ईव्हीएम मशीन घोटाळा हा आरोप ठरलेलाच', पण बिहारमध्ये विजय निश्चित - चंद्रकांत पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.