मुंबई Bhagat Singh Koshyari :आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी यापूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राज्यपाल असताना त्यांच्या संस्थेला किती देणग्या मिळाल्या? अशी विचारणा राजभवनाकडं केली होती. परंतु, राजभवनानं याबाबत त्यांच्याकडं कुठलीच माहिती नसल्याचं सांगितलं होतं. असं असतांना आता अनिल गलगली यांना एक निनावी पत्र मिळाल्या दावा केल्यानं राज्यात खळबळ उडालीय. त्या पत्राबाबत महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ईटीव्ही भारतला एक्सक्ल्यूझिव्ह प्रतिक्रिया दिली. माजी राज्यपाल कोश्यारी म्हणाले, "मी समाजासाठी काम करत आहे. माध्यम आणि आरटीआय कार्यकर्ते अशा दोघांविरोधात कोर्टात जाणार आहे. अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करणार आहे. मी त्यांना तसे कुणालाही सोडणार नाही."
15 कोटींची देणगी : आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मिळालेल्या निनावी पत्रात दावा करण्यात आलाय की, भगतसिंग कोश्यारी राज्यपाल असताना त्यांच्या शिक्षण संस्थेनं अनंत अंबानींकडून 15 कोटी रुपयांची देणगी घेतली. यानंतर अनिल गलगली यांनी हे निनावी पत्र राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पाठवून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केलीय. अनिल गलगली यांनी यापूर्वी सुद्धा माहिती अधिकाराच्या अखत्यारित राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कार्यकाळात त्यांच्या संस्थेनं किती देणग्या जमा केल्या याबाबत माहिती मागवली होती. परंतु, त्यांना कुठलीच माहिती दिली गेली नाही. म्हणूनच या निनावी पत्रानंतर या प्रकरणाची चौकशी झाली तर सत्य बाहेर येईल, अशी मागणी गलगली यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याकडे केलीय.
कुठे, कुठे व कशा पद्धतीच्या देणग्या : पत्राबाबत बोलताना अनिल गलगली यांनी म्हटलंय की, "भगतसिंग कोश्यारीसारख्या राज्यपाल पदावर बसलेल्या माणसानं आपल्या पदाचा गैरवापर करुन उत्तराखंड मधील एका शाळेच्या नावानं भरपूर माया जमा केली. ज्या शाळेत 100 मुलं सुद्धा शिकत नाहीत अशा शाळांकरीता मोठ्या प्रमाणात देणग्या गोळा केल्या. या मिळालेल्या पैशातून दीपेन्दरसिंग कोश्यारी जे राज्यपाल कोश्यारी यांचे पुतणे आहेत त्यांच्यासाठी शाळेच्या आसपास मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करुन त्या जागेवर रिसोर्ट चालू केलंय. उद्योगपती अनंत अंबानी यांच्याकडून 15 कोटी रुपये या शाळेसाठी घेतले आहेत. शेर सिंग कार्की, सरस्वती विहार, कनालीछीना, चामू, डिगरा मुवानी, पिथौरागढ तसंच उत्तराखंड देवस्थळी या सर्वांच्या नावाने कोश्यारी यांनी भरपूर संपत्ती गोळा केली. तसंच 2019 पूर्वी या संस्थांना किती देणग्या मिळाल्या आणि 2019 ते 2023 या कालावधीत किती देणग्या मिळाल्या याची तुलनाही सहज करता येऊ शकेल." मात्र, गलगली यांचे आरोप हे भगतसिंह कोश्यारी यांनी फेटाळून लावले आहेत.
हेही वाचा :