ETV Bharat / state

मतदानादिवशी मुंबईत दिवसभर काय-काय घडलं? निवडणूक आयोगानं दिली महत्त्वाची माहिती - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : शहरातील हिरानंदानी भागात ईव्हीएम मशीन (EVM Machines) बंद पडल्यामुळं दोन तासांपासून मतदान खोळंबलं होतं. त्यानंतर बंद पडलेली ईव्हीएम मशीन बदलण्यात आली. नंतर त्या ठिकाणी सुरळीतपणे मतदान पार पडलं. सहा वाजेपर्यंत जे मतदार तिथे असतील त्या सर्वांना मतदानाची संधी उपलब्ध करुन देण्यात आल्याची महिती, निवडणूक अधिकारी सोनाली मुळे (Election Officer Sonali Mule) यांनी दिली.

EVM Machines
ईव्हीएम (MH DESK)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 20, 2024, 8:58 PM IST

Updated : May 20, 2024, 9:14 PM IST

प्रतिक्रिया देताना निवडणूक अधिकारी सोनाली मुळे (Mumbai Reporter)

मुंबई Lok Sabha Election 2024 : सकाळपासून हिरानंदानी येथील बुथ क्रमांक 27 वर गर्दी असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, या ठिकाणी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तेथील ईव्हीएम (EVM Machines) बंद पडली होती. ती मशीन दुरुस्त करण्यासाठी इंजिनीयर येईपर्यंत काही वेळ लागला होता. त्यामुळं गर्दी वाढली होती. मात्र, त्यानंतर मशीनची तपासणी केल्यानंतर त्यांनी ईव्हीएम मशीन बदलली आणि त्या ठिकाणी सुरळीतपणे मतदान पार पडलं. त्यामुळं तिथे कोणतीही समस्या राहिली नसल्याची माहिती, उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे (Election Officer Sonali Mule) यांनी दिली.

सर्वांना मतदानाची संधी उपलब्ध : मुंबईतील सहा मतदारसंघात आज लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात मतदान पार पडलं. हिरानंदानी येथे निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आली. सहा वाजेपर्यंत जे मतदार तिथे असतील त्या सर्वांना मतदानाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली. तसेच त्याबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, याची ग्वाही निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली होती.

पुन्हा सुरळीत मतदान : मतदारांना शक्य तेवढ्या सुविधा पुरवण्याचा आम्ही प्रयत्न केला असून आम्हाला सहकार्य करावं असं आवाहन सोनाली मुळे यांनी केलं होतं. मुंबईच्या काही भागात ईव्हीएम बंद पडल्यानं मतदारांना तीन-चार तासांपासून मतदान केंद्राच्या बाहेर रांगेत उभं राहवं लागलं. तर अनेक ठिकाणी संथ गतीनं मतदान होत असल्याचं चित्र दिसून आलं. पवई हिरानंदानी येथील ईव्हीएम निवडणूक अधिकाऱ्यांनी बदलल्यानंतर तेथील मतदान पुन्हा सुरळीत पार पडलं.

हेही वाचा -

  1. मुख्यमंत्र्यांनी अपघातग्रस्तांना केली मदत; रस्त्यावर उतरून जखमींना पाठवलं रुग्णालयात - CM Shinde Helped Injured
  2. भिवंडीचे भाजपा उमेदवार कपिल पाटील यांचा अरेरावीचा व्हिडिओ व्हायरल - Lok Sabha election phase 5 voting
  3. मतदान सुरळीत होण्यासाठी मतदारांना मदत करा, आदित्य ठाकरेंची निवडणूक आयोगाच्या नियोजनावर व्यक्त केली नाराजी - Lok Sabha Election 2024

Last Updated : May 20, 2024, 9:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.