ETV Bharat / state

'एकनाथ शिंदे म्हणतील देवेंद्र फडणवीस यांना करा मुख्यमंत्री'; चंद्रकांत पाटलांनी कशामुळे व्यक्त केला विश्वास - CHANDRAKANT PATIL ON EKNATH SHINDE

भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर मोठं भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे म्हणतील देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा, असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं.

Chandrakant Patil On Eknath Shinde
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 27, 2024, 1:16 PM IST

पुणे : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूक 2024 चा निकाल लागून चार दिवस झाले, तरी महायुतीकडून मुख्यमंत्री कोण याचं काही निश्चित होत नाही. भारतीय जनता पक्षाकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी राज्यभर कार्यकर्त्यांकडून प्रार्थना-आरत्या सुरू झाल्या आहेत. महायुतीकडून मुख्यमंत्री कोण याबाबत भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता, त्यांनी मोठं भाष्य केलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या भाष्यानं मात्र सगळ्यांचे डोळे विस्फारले गेले आहेत.

Chandrakant Patil On Eknath Shinde
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी होम हवन (Reporter)

एकनाथ शिंदे म्हणतील, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा : चंद्रकांत पाटील म्हणाले की, "भगवंताचं अधिष्ठान प्रत्येक विषयात पाहिजे आणि आता 137 आमदार आमच्या बरोबर आहेत. 2019 मध्ये अचानक पायउतार झाल्यानं आता भारतीय जनता पक्षातील सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावे, अशी आहे. ही इच्छा आम्ही परमेश्र्वराकडं देखील जाहीर व्यक्त करत आहोत. एकनाथ शिंदे हे देखील खूप मोठ्या मनाचे असून ते देखील निर्णय घेतील. एकनाथ शिंदे हेच म्हणतील की, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा, असा मला विश्वास आहे."

विधानसभा निवडणुकीत भाजपाला दैदिप्यमान यश : विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपाला देणारे देवेंद्र फडणवीस यांनी दैदिप्यमान यश मिळवून दिलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी, यासाठी आज पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सारसबागेतील श्री सिद्धिविनायक मंदिरात होमहवन आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी भाजपा पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांकडून 'देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून परत या,' अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री पदाबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

एकनाथ शिंदे यांच्याशी जवळचं नातं : "माझं आणि एकनाथ शिंदे यांचं खूपच जवळचं नातं असून ते कश्यावर काय रियॅक्ट होतात ते मला माहीत आहे. परमेश्वराची प्रार्थना ही सगळ्यांसाठी श्रध्देचा विषय असतो. आम्ही राज्याच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी, यासाठी आज पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सारसबागेतील श्री सिद्धिविनायक मंदिरात गणेश यज्ञ, होमहवन आणि महाआरतीचं आयोजन केलं," असं यावेळी पाटील म्हणाले.

संध्याकाळपर्यंत नाव होईल निश्चित : मुख्यमंत्री पदाच्या नावावर कधीपर्यंत शिक्कामोर्तब होईल, याबाबत पाटील यांना विचारलं. यावेळी त्यांनी, आज संध्याकाळपर्यंत स्पष्ठ होईल. कोणत्याही फॉर्म्युल्याबाबत चर्चा झालेली नाही. अशी चर्चा तुमच्याच माध्यमातून आमच्या समोर येत आहे. पार्लमेंट्री बोर्ड जे काही निर्णय घेईल ते सगळ्यांना मान्य करावं लागणार आहे. आमचा आमच्या नेत्यांवर पूर्ण विश्वास आहे, असं यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. दिल्ली ठरवेल तोच मुख्यमंत्री होणार; चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
  2. भाजपाचा मुख्यमंत्री ठरल्यास आम्ही एकमुखाने देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊ- चंद्रकांत पाटील
  3. चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप; थेट देवेंद्र फडणवीसांकडं तक्रार - Chandrakant Patil

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.