जळगाव Khadse neglected by BJP : आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपा प्रवेशाबद्दल पुन्हा एकदा निर्वाणीचं वक्तव्य केलं आहे. पुढील काही दिवस भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची पक्षप्रवेशाबद्दल वाट बघणार, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतून उत्साहाने काम करणार असा एक प्रकारे इशाराच एकनाथ खडसे यांनी भाजपाला दिला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून एकनाथ खडसे यांचा भाजपा पक्षप्रवेश रखडला आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे.
भाजपामध्ये प्रवेश : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी एप्रिल 2024 मध्ये भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली होती. त्यावेळी काही फोटोही काढण्यात आले. यावेळी जे. पी. नड्डा यांच्याकडे भाजपामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर जवळपास एकनाथ खडसे यांचा भाजपा पक्षप्रवेश निश्चित समजला जात होता. मात्र लोकसभा निवडणूक झाल्यानंतरही त्यांचा पक्षप्रवेश झाला नाही. एकनाथ खडसे उर्फ थाभाऊंनी आज जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे पत्रकार परिषदे घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप प्रवेशाबाबत अनिश्चितता व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, भारतीय जनता पार्टीमध्ये जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश झालेला आहे. परंतु त्या गुप्त प्रवेशाला काही लोकांनी विरोध केलेला दिसतो आहे. म्हणून तो जाहीर झालेला नाही. जे. पी. नड्डा, विनोद तावडे आणि रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश झालेला आहे. पण मला वाटतं की, अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीत राहणे योग्य नाही.
अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार : भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्यासाठी त्यांची इच्छा होती. परंतु अद्याप पक्षाकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही. नाथाभाऊंनी सांगितलं की, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा शरद पवार साहेबांकडे दिला आहे. परंतु पवार साहेबांनी तो स्वीकारलेला नाही. त्यामुळे ते अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांनी यावेळी सांगितलं की, भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याची त्यांची इच्छा होती. परंतु काही अडचणींमुळे आणि पक्षाकडून मिळालेल्या प्रतिसादाच्या अभावामुळे त्यांना आता पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याचा विचार करावा लागतो आहे. आजच्या पत्रकार परिषदेत नाथाभाऊंनी आणखी असंही सांगितलं की, भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रवेशाची तयारी झाली होती. मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला होता, आणि यावेळी फोटोही काढले गेले. मात्र, पक्षातील काही लोकांच्या विरोधामुळे हा प्रवेश जाहीर झालेला नाही. नाथाभाऊंनी स्पष्ट केलं की, ते काही दिवस आणखी भाजपाकडून प्रतिसादाची वाट पाहतील. पण जर त्यांना उत्तर मिळालं नाही, तर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत येऊन काम करतील. नाथाभाऊंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून, त्यांच्या पुढील पावलाकडे सर्वांचे लक्ष आहे. तसंच भाजपाकडून त्यांची आजही उपेक्षा होत असल्याचं स्पष्ट होत आहे.
भारतीय जनता पक्षाची वाट पाहीन : मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरद गटाचा सदस्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) सदस्यपदाचा राजीनामा मी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे दिला होता. मात्र, त्यांनी तो राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही. त्यामुळे मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) आमदार आहे.शरद पवारांनी मला आमदारकीचा राजीनामा देण्यास मनाई केली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मी आणखी काही दिवस भारतीय जनता पक्षाची वाट पाहीन. अन्यथा मी माझा मूळ पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) पुन्हा जॉईन करेन आणि कामाला सुरुवात करेन. भाजपात प्रवेश करावा असं माझं मत पूर्वीपासून होतं. त्यासाठी काही कारणेही होती. त्या संदर्भात मी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे चर्चाही केली होती. माझ्या अडचणी होत्या, त्यामुळे भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा, असं असं वाटलं होतं. मात्र, आता मला विचार करावा लागेल, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला आहे.
हेही जुने संदर्भ वाचा...