ETV Bharat / state

खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार अमोल कीर्तिकर यांना ईडीचं दुसऱ्यांदा समन्स - ED notice to Amol Kirtikar - ED NOTICE TO AMOL KIRTIKAR

ED notice to Amol Kirtikar : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना खिचडी घोटाळा प्रकरणी (Khichdi scam case) आज शुक्रवार (दि. 29 मार्च) रोजी ईडी कार्यालयाने पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स पाठवलं आहे. येत्या (दि. 8 एप्रिल) रोजी त्यांना चौकशीसाठी बोलावलं आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 29, 2024, 7:30 PM IST

मुंबई : ED notice to Amol Kirtikar : खिचडी घोटाळ्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना ईडीने दुसऱ्यांदा समन्स पाठवलं आहे. त्यांना आता (दि. 8 एप्रिल)रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अमोल कीर्तिकर यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभेचं तिकीट जाहीर झालं आहे. त्यानंतर ईडीने पहिलं समन्स पाठवलं होतं. मात्र, कीर्तिकर चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यानंतर कीर्तिकर यांना दुसऱ्यांदा समन्स पाठवण्यात आलं आहे.

पहिल्या समन्सवेळी कीर्तिकर यांची गैरहजेरी : ठाकरे यांच्या शिवसेनेचे लोकसभा उमेदवार अमोल कीर्तिकर यांना खिचडी घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने दुसरं समन्स पाठवलं आहे. (ED summons to T Amol Kirtikar) या समन्समध्ये अमोल कीर्तिकर यांना (दि. 8 एप्रिल) रोजी खिचडी प्रकरणात चौकशीकामी ईडी कार्यालयात हजर रहाण्यास सांगण्यात आलं आहे. पहिल्या समन्सवेळी कीर्तिकर यांच्या वकीलांनी ईडी कार्यालयात हजर राहून अमोल कीर्तिकर हे पूर्व नियोजित कामामुळे ईडी कार्यालयात हजर राहू शकत नसल्याचा अर्ज देऊन त्यांना वेळ देण्यात यावा असा विनंती अर्ज केला होता.

ठाकरेंच्या शिवसेनेतील या लोकांना आलं समन्स : (Khichdi scam case) खिचडी घोटाळ्यात ईडीने (ED) या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण, मनपा अधिकारी आणि निकटवर्तीयांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलय. दरम्यान ईडीने सूरज चव्हाण यांची 88.51 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती. ज्यात मुंबईतील निवासी सदनिका आणि रत्नागिरीतील शेतजमिनीचा समावेश होता. या घोटाळ्यात ईडीकडून शिवसेना (ठाकरे) गटाचे नेते संजय राऊत यांचे धाकटे बंधू संदीप राऊत यांचा जबाबही नोंदवला गेला आहे. संदीप राऊत यांनाही निधी मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे. सह्याद्री रिफ्रेशमेंटने बीएमसीकडून मिळालेल्या पेमेंटचा काही भाग संजय राऊत यांच्या कुटुंबातील सदस्यांसह, त्यांचे भाऊ संदीप राऊत यांच्या खात्यात वळता केल्याचा आरोप आहे.

हेही वाचा :

1 ऐन निवडणुकीच्या काळात आयकर विभागाची कॉंग्रेसला नोटीस; ठोठावला 1700 कोटींचा दंड - Income Tax Notice Congress

2 कोल्हापुरातून संजय मंडलिकांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर; व्यक्त केला विजयाचा विश्वास - Sanjay Mandlik

3 "प्रसिद्ध नट तर घ्यायचा"; जयंत पाटलांचा मुख्यमंत्री शिंदेंना सल्ला - Jayant Patil On Govinda

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.