ETV Bharat / state

विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या भिंतींना तडे! दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरु - Vitthal Temple - VITTHAL TEMPLE

Vitthal Temple : पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचं व जीर्णोद्वाराचं काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून सुरु आहे. यादरम्यान मंदिराच्या भिंतींना तडे गेल्याची बाब समोर आलीय.

विठ्ठल मंदिराचं संवर्धन करताना मंदिराच्या भिंतीना तडे गेल्याची बाब समोर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 6, 2024, 1:05 PM IST

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर

पंढरपूर Vitthal Temple : येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचं व जीर्णोद्वाराचं काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून सुरु आहे. त्यात श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्याचं संवर्धन आषाढी यात्रा 2024 पूर्वी करण्याचं प्रस्तावित आहे. तथापि, गाभाऱ्यातील संवर्धनाचं काम करताना मुर्तीचं संरक्षण करण्याच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजना करुन सुरु करण्यात आलं होतं. 18 मार्च पासून गर्भगृहातील ग्रॅनाईट काढण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली होती. त्यासाठी विठ्ठलाच्या मूर्तीला बुलेट फ्रुफ काचही बसवण्यात आली होती.

मंदिराच्या संवर्धनाचं काम सुरु : मंदिराचं मूळ रुप कायम ठेवून जतन व संवर्धनाचं काम करण्यात येत असून, मंदिरात लावण्यात आलेल्या चांदीचं कामही नव्यानं करण्यात येणार असून, मंदिरातील सर्व चांदी काढून दुरुस्ती करुन पुन्हा बसवण्यात येणार आहे. आधीची चांदी काढून ती वितळवून आवश्यकतेनुसार भर टाकण्यात येणार आहे. मंदिरातील जुनी चांदी काढली असता मंदिराच्या भिंतींना तडे गेल्याची बाब समोर आली. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औचेकर यांनी ही माहिती दिलीय.

बाराव्या शतकात मंदिर बांधल्याची इतिहासात नोंद : पंढरपूरचे मूळ श्री विठ्ठल मंदिर बाराव्या शतकात बांधलं गेलं असून शके अकराशे अकरा म्हणजे सण 1189 मधील कोरुलेखावरुन अशी माहिती मिळते की, राजा बिल्लम यादव महाजन देवाचे भक्तगण आणि मुद्रहस्त विठ्ठल सर्वांनी एक लहान देऊळ 1111 मध्ये बांधलं असा संदर्भही 'श्री विठ्ठल एक महासमन्वयक लेखक' - रा. चिं. ढेरे यांच्या पुस्तकातून आढळून येतो. मंदिर संवर्धन करण्यासाठी वारंवार मंदिराच्या भिंतींना वेगवेगळे लेप देण्यात आले होते ते लेप देत असताना काही ठिकाणी चांदीच्या पत्र्याचे लेप देण्यात आले होते. चांदीच्या पत्र्याचे लेप देत असताना खिळे भिंतीमध्ये मारले होते. आता ते सर्व साहित्य काढल्यास त्या मंदिर मूळ रुपात दिसत असतानाच मंदिरातील काही भिंतींना तडे गेल्याची बाब समोर आलीय. मात्र या सर्व गोष्टी मंदिराचं संवर्धन करत असताना दुरुस्त केल्या जाणार असल्याची माहिती मंदिर समितीच्या वतीनं देण्यात आलीय.

विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद : पुरातत्व विभागाच्या वतीनं हे काम सुरु असल्यामुळं 15 मार्चपासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आलं असून सकाळी 11 वाजेपर्यंत मुखदर्शन मात्र सुरु ठेवण्यात आलंय. पदस्पर्श करण्यासाठी तसंच विठू-रखमाईच्या चरणी फूल, तुळशीमाळ आदी अर्पण करण्यासाठी वारकरी, भाविकांना मूर्तीपर्यंत जाता येत नाही. याचा परिणाम मंदिर परिसरातील व्यवसायावर झालाय.

हेही वाचा :

  1. Diwali Padwa 2023 : दिवाळी पाडव्यानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात मोसंबीची आरास
  2. Caution from Vitthal Rukmini Temple : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून खबरदारी, भाविकांना मास्कचे वाटप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.