ETV Bharat / state

एनसीबीची मोठी कारवाई! ड्रग्ज तस्कराला सायन सर्कलहून अटक; 10 कोटींचं 5 किलो एमडी ड्रग्ज जप्त - Drug Smuggler Arrested - DRUG SMUGGLER ARRESTED

Drug Smuggler Arrested : एका ड्रग्ज तस्कराला अटक करण्यात एनसीबी पथकाला यश आलं आहे. एम एस शेख असं आरोपी तस्कराचं नाव असून त्याच्याकडून 10 कोटींचं 5 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. एनसीबी मुंबईचे अतिरिक्त संचालक अमित घवाटे यांनी ही माहिती दिली.

Drug Smuggler Arrested
ड्रग्ज तस्कराला अटक (ETV Bharat Reporter)
author img

By AFP

Published : Jul 19, 2024, 4:47 PM IST

Updated : Jul 19, 2024, 8:07 PM IST

मुंबई Drug Smuggler Arrested : नार्कोटिक कंट्रोल ब्युरोनं (एनसीबी) मुंबईतील सायन सर्कल येथून दहा कोटींचं पाच किलो एमडी ड्रग्स जप्त केलं आहे. एम एस शेख या अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आरोपीला सायन सर्कल येथून अटक देखील करण्यात आली असल्याची माहिती एनसीबी मुंबईचे अतिरिक्त संचालक अमित घवाटे यांनी दिली आहे.

5 किलो मेफेड्रोन जप्त : NCB मुंबईनं अचूक कारवाई करत 5 किलो मेफेड्रोन म्हणजेच एमडी जप्त केलं आहे. मेफेड्रोन अमली पदार्थाच्या आंतरराज्य अवैध तस्करीमध्ये सामील असलेल्या नेटवर्कच्या विश्वासार्ह गुप्त माहितीच्या आधारे आणि अवैध अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी NCB मुंबईने अंधेरी येथील रहिवासी एम एस शेख याला सापळा रचून पकडण्यासाठी सायन सर्कलजवळ पाळत ठेवली आहे. आंतरराज्य तस्कर असलेल्या एम एस शेख याला NCBच्या व्यापक प्रयत्नांमुळे अटक करण्यात यश आलं आहे आणि त्याच्याकडून दहा कोटी रुपयांचं 5 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आलं. हे अमली पदार्थ हैदराबाद येथून आणले गेले होते आणि आरोपीनं हे ड्रग्ज मुंबई परिसरात वितरीत करण्यासाठी आणलं होतं, असं तपासात निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

आरोपीला अखेर लॉजमधून अटक : अलीकडेच एनसीबी मुंबईनं ड्रग्ज सिंडिकेटचा महत्त्वाचा सदस्य सुफियान खानला अटक केली होती. प्रदीर्घ ट्रेसिंग ऑपरेशननंतर एनसीबी मुंबईनं त्याला अटक केली. 26 जून रोजी एनसीबी मुंबईनं 31.5 किलो मेफेड्रोन जप्त केल्यापासून तो सतत लपण्याचे ठिकाण आणि फोन नंबर बदलत होता आणि लपला होता. त्याला सोमवार 15 जुलै रोजी वाशी येथील एका लॉजमधून अटक करण्यात आली असून सध्या तो एनसीबीच्या ताब्यात आहे. तो ड्रग्ज सिंडिकेटचा महत्त्वाचा सदस्य असून शिवडी येथून काम करतो. अनेक पोलीस प्रकरणात देखील या आरोपीचा सहभाग उघडकीस आलं आहे.

हेही वाचा :

  1. ड्रग्जविरोधात सरकार अ‍ॅक्शन मोडवर, पाच महिन्यात केला ४ हजार कोटींचा माल जप्त, ६ पोलीस बडतर्फ - State Government Action On Drug
  2. ३२७ कोटीचं एमडी ड्रग्ज जप्त, मुख्य सूत्रधार सलीम डोळाचं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कनेक्शन उघड - 327 crores MD drug seized
  3. मुंबई पोलिसांची जोधपूरमध्ये ड्रग्ज कारखान्यावर धाड, 100 कोटींहून अधिक किमतीचं ड्रग्ज जप्त - Drugs Factory Busts In Jodhpur

Last Updated : Jul 19, 2024, 8:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.