ETV Bharat / state

Ramdas Athawale PC : नव्या मित्रांमुळे जुन्या मित्रांना विसरू नका, रामदास आठवलेंचा भाजपाला खोचक टोला - Shirdi Lok Sabha Constituciency

Ramdas Athawale PC : नव्या मित्रांमुळे जुन्या मित्रांना विसरू नका, असा खोचक टोला आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपाला लगावला आहे. आरपीआयला किमान दोन जागा तरी मिळायला पाहिजेत. त्यामुळे शिर्डी आणि सोलापूर या दोन जागांसाठी आपण प्रयत्नशील असल्याचं देखील रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं आहे. ते सांगलीमध्ये आज (18 मार्च) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

Ramdas Athawale PC
रामदास आठवलेंचा भाजपाला खोचक टोला
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 18, 2024, 9:27 PM IST

रामदास आठवले भाजपाला टोला लगावताना

सांगली Ramdas Athawale PC : पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री रामदास आठवले म्हणाले की, "काँग्रेस युग संपले नाही. ते लवकर सत्तेत येण्याची परिस्थिती राहिली नाही. राहुल गांधीच्या भारत जोडो न्याय यात्रेमुळे फारसं यश काँग्रेसला आता मिळणार नाही. अगदी दक्षिण राज्यात देखील मिळणार नाही. एनडीए आघाडीला 400 पार जागा मिळतील. ज्यामध्ये 370 पेक्षा जास्त जागा भाजपाला मिळणार. उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये आरपीआयची ताकत असूनही एकही उमेदवार उभा केला नाही. आरपीआयला डावलून चालणार नाही. मतदार कमी जरी असला तरी निर्णायक आहे. त्यामुळे दुर्लक्ष होऊ नये."

प्रकाश आंबेडकरांबद्दल काय म्हणाले आठवले? : शिर्डीमधून आपण स्वतः आणि सोलापूर मधून राजा सरवदे, हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. आरपीआयला जागा न मिळाल्यास मोठी नाराजी पसरण्याची शक्यता आहे. जागा मिळणे हा आमचा हक्क आहे. जनता देखील आम्हाला विचारत आहे, असंही आठवले यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं. ते पुढे म्हणाले की, मुंबई येथे राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप झाला. यावेळी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर समारोपाला हजर राहिले असले तरी महाविकास आघाडीमध्ये आंबेडकर जातील, असं वाटत नाही. महाविकास आघाडी त्यांना घेणारही नाही. त्याच बरोबर प्रकाश आंबेडकर जर नरेंद्र मोदींच्या विरोधात असतील तर मी नरेंद्र मोदींच्या बाजूने भक्कमपणे उभा आहे, असं देखील मंत्री आठवले यांनी स्पष्ट केलं आहे.

खासदार अनंत हेगडेंच्या त्या वक्तव्याचा नोंदविला निषेध : कर्नाटकचे भाजपा खासदार अनंत हेगडे यांनी संविधानाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा मंत्री रामदास आठवले यांनी निषेध नोंदवला आहे. ते म्हणाले, संविधान कोणीही संपवू शकत नाही; मात्र हेगडे वारंवार विपर्यास्त विधान करतात. त्यामुळे त्यांचा आम्ही निषेध करतो आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी देखील भाजपाकडे करणार असल्याचं आठवले यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा :

  1. Seat sharing of Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं ठरेना, वाचा कुणाला पाहिजे कोणती जागा, कसा सुटणार तिढा
  2. ECI : लोकसभा निवडणुकीपूर्वी 'बीएमसी' आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पदावरुन हटवलं, नेमकं काय आहे प्रकरण?
  3. Hardik Pandya : रोहित शर्माचं संघात कोणतं स्थान? हार्दिक पंड्यानं थेटच सांगितलं....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.