बुलडाणा Removed 60 Larvae From Woman Eye : शेतात काम करताना डोळ्यात माती गेल्यानंतर महिलेला डोळा दुखण्याचा त्रास होत होता. यावेळी महिलेनं नेत्रतज्ज्ञांकडं धाव घेत होत असलेल्या त्रासाबद्दल तपासणी केली. यावेळी या मजूर महिलेच्या डोळ्यात चक्क अळ्या झाल्याचं नेत्रतज्ज्ञांना दिसून आलं. त्यांनी तत्काळ या महिलेच्या डोळ्यातील अळ्या काढण्याचा निर्णय घेतला. या महिलेच्या डोळ्यात तब्बल 60 जिवंत अळ्या आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली. ज्योती गायकवाड असं या डोळ्यातून या अळ्या काढण्यात आलेल्या रुग्णाचं नाव आहे. चिखली इथले नेत्रतज्ज्ञ डॉ स्वप्नील मोरवाल यांनी या महिलेच्या डोळ्यातून अळ्या काढून या महिलेचा डोळा वाचवला आहे. अन्यथा महिलेचा डोळा निकामी होण्याची शक्यता होती. विशेष म्हणजे या महिलेच्या उपचाराचं कोणतंही शुल्क डॉ स्वप्नील मोरवाल यांनी घेतलं नाही.
शेतात मजुरी करताना डोळ्याला लागली होती माती : मोलमजुरी करणाऱ्या ज्योती गायकवाड या महिला शेतात काम करताना अचानक त्यांच्या डोळ्याला एक महिन्यापूर्वी मातीचं ढेकूळ लागलं. तेव्हापासून त्यांना डोळे दुखण्याचा त्रास होत होता. सुरुवातीला त्यांनी याकडं दुर्लक्ष केलं. मात्र त्रास जास्त वाढल्यावर या ज्योती गायकवाड यांनी डॉ स्वप्नील मोरवाल यांच्याकडं जाऊन डोळे तपासले. तेव्हा त्यांच्या डोळ्यात अळ्या झाल्याचं डॉक्टरांना समजलं. डॉक्टरांनी तत्काळ त्या अळ्या काढण्याचं ठरवलं. अन्यथा डोला निकामी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
डोळ्यातून तब्बल 60 जिवंत अळ्या काढल्या बाहेर : चिखली तालुक्यातील मालगणी इथल्या ज्योती गायकवाड या महिलेला डोळे दुखण्याचा त्रास होत असल्यानं त्यांनी डॉ स्वप्नील मोरवाल यांच्याकडं धाव घेतली. यावेळी या महिलेच्या डोळ्यात अळ्या झाल्याचं निदान त्यांनी केलं. या महिलेच्या डोळ्यातून तत्काळ अळ्या काढण्यात येणं गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अन्यथा डोळा निकामी होण्याची दाट शक्यता होती. ज्योती गायकवाड यांना ही बाब समजताच त्यांनी तत्काळ उपचारास प्रतिसाद दिला. त्यामुळे डॉ स्वप्नील मोरवाल यांनी या महिलेच्या डोळ्यातून तब्बल 60 जिवंत अळ्या बाहेर काढल्या. या अळ्या काढण्यासाठी तब्बल 2 तास लागले. एकेक अळी बाहेर काढत असताना डॉक्टरांच्याही नाकी नऊ आले. डॉ स्वप्नील मोरवाल यांनी ज्योती गायकवाड यांच्या डोळ्यातून तब्बल 60 अळ्या बाहेर काढल्यानं त्यांचा डोळा निकामी होण्यापासून वाचला आहे. अळ्या बाहेर काढल्यानं आता ज्योती गायकवाड यांना कोणताही त्रास जाणवत नाही. त्यांचा डोळा सुखरुप आहे, असं त्यांनी ईटीव्ही भारत प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं.
डॉक्टरांनी घेतली नाही कोणतीही फी : ग्रामीण भागातील महिला असून देखील त्यांनी कोणताही घरगुती इलाज न करता त्या थेट नेत्रतज्ज्ञ डॉक्टरांकडं आल्या. त्यामुळे ज्योती गायकवाड यांचा डोळा निकामी होण्यापासून वाचला. याप्रकणात कोणतीही दिरंगाई किंवा चूक ही महिलेच्या जीवावर बेतू शकली असती. त्यामुळे प्रत्येकानं घरगुती ईलाजात वेळ न घालवता थेट डॉक्टरांकडं जाणं किती गरजेचं आहे, हे यावरून दिसून येते. जर कोणाला डोळ्यासंबंधीत त्रास असल्यास घरगुती इलाज न करता डॉक्टरांकडं जाऊनच डोळ्यांची तपासणी करावी, असं आवाहन डॉ स्वप्नील मोरवाल यांनी केलं आहे.
हेही वाचा :
- Eyes Care Tips : तुमचा फोन किंवा लॅपटॉप वापरताना तुमच्या डोळ्यात त्रास होत असेल तर या पद्धतींचा अवलंब करा, तुम्हाला मिळेल आराम
- Eye Infection : पूर्व विदर्भात डोळ्यांच्या संसर्गाने लोक हैराण; अशी घ्या डोळ्यांची काळजी
- Eye Flu Symptoms : पावसाळ्यात डोळ्यांच्या फ्लूचा वाढतोय धोका, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय