ETV Bharat / state

दिग्विजय सिंह यांचा आरएसएसबरोबर का आहे वाद? स्पष्टपणे सांगितलं, "त्यांचा माईंड गेम..." - DIGVIJAYA SINGH ON RSS

Digvijaya Singh visited Sai Temple : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हे साईमंदिरात दर्शन घेण्याकरिता बुधवारी शिर्डी येथे दाखल झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर (RSS) टीका केली. न्यायालयात दाखल केलेल्या विविध याचिकांवरही त्यांनी यावेळी भाष्य केलं.

Digvijaya Singh visited Sai Temple in Shirdi after filing petition in High Court regarding Rajgad Lok Sabha elections
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 18, 2024, 7:58 AM IST

Updated : Jul 18, 2024, 8:09 AM IST

शिर्डी Digvijaya Singh visited Sai Temple : मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हे दरवर्षी न चुकता आषाढी एकादशीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येतात. यंदा त्यांनी पंढरपूरबरोबरच शिर्डी येथील मंदिरात दर्शन घेतलं. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

दिग्विजय सिंह साईचरणी नतमस्तक (ETV Bharat Reporter)

नेमकं काय म्हणाले दिग्विजय सिंह? : दिग्विजय सिंह म्हणाले की, "आरएसएस माईंड गेम खेळत आहे. लोकांच्या डोक्यात आणि मनात त्यांची विचारधारा घालण्याचा प्रयत्न करत आहे. ते धर्माच्या नावावर लोकांमध्ये द्वेष पसरवित आहेत. त्यामुळं माझा आरएसएसबरोबर वाद आहे. हा देश सर्वांचा असून देशाच्या प्रगतीसाठी सर्व धर्माच्या लोकांनी योगदान दिलंय. त्यामुळं आरएसएसनं द्वेष पसरवणं बंद करायला हवं. लोकांच्या घरात जाऊन खोट्याचं खरं करण्याचं काम आरएसएसकडून केलं जातंय."

काँग्रेसकडून सातत्यानं संविधान धोक्यात येत असल्याचा दावा केला जातो. त्यावर दिग्विजय सिंह यांनी भाजपाच्या काही खासदारांकडेच बोट दाखविलं. "भाजपाच्या काही खासदारांनी सांगितलं होतं की, संविधान बदलण्यासाठी खासदारांचा 400 चा आकडा ओलांडायचा आहे. त्यामुळंच आम्ही संविधानाचा मुद्दा उपस्थित केलाय," असंही दिग्विजय सिंह यांनी स्पष्ट केलं.

आषाढी एकादशी निमित्तानं दरवर्षी न चुकता पंढरपुरात जावून विठ्ठलाचे दर्शन घेतोय. माझी अनेक वर्षांपासून इच्छा आहे की, मी वारकऱ्यांसारखे पायी चालत जावून विठ्ठलाचं दर्शन घ्यावं. पुढच्या वर्षी आषाढी एकादशीला मी आळंदीवरून पंढरपूरला पायी जाणार आहे. पायी चालत जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेणार आहे- दिग्विजय सिंह

दिग्विजय सिंह यांनी मध्य प्रदेशमधील राजगड लोकसभा निवडणुकीसंदर्भात मध्यप्रदेश उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. निवडणूक आयोगाला विचारलेल्या शंका आणि प्रश्नांना कुठलंही उत्तर दिलं नाही. त्यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचं त्यांनी सांगितलं.

आम्हाला नक्की न्याय मिळणार : पुढं ते म्हणाले की, "कोण जिंकलं कोण हरलं? या विरोधात मी न्यायालयात गेलेलो नाही. आपण कोणाला मतदान करावं याचा प्रत्येक नागरिकाला हक्क आहे. पण आपण केलेलं मतदान नेमकं कुणाच्या पारड्यात गेलं? याची माहिती मिळायला हवी. यासाठी मी न्यायालयात गेलोय." "तसंच आम्हाला नक्की न्याय मिळणार," असा विश्वासही दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केला.

  • दिग्विजय सिंह यांनी बुधवारी (17 जुलै) शिर्डीत येऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. साईबाबांच्या दर्शनानंतर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सिंह यांचा शाल, साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला. यावेळी सचिन चौघुले, सुरेश आरणे यांच्यासह मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. Digvijaya Singh News: माजी सरसंघचालक गोळवलकरांविरोधात वादग्रस्त ट्विट, दिग्विजय सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल
  2. Bajrang Dal Ban : बजरंग दलावरून कॉंग्रेसचा यू-टर्न; सत्तेत आल्यावर बंदी घालणार नाही - दिग्विजय सिंह
  3. Video भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेते दिग्विजय सिंहांचा भन्नाट डान्स.. गाण्यावर थिरकले काँग्रेसचे नेते.. पहा व्हिडीओ

Last Updated : Jul 18, 2024, 8:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.