ETV Bharat / state

धैर्यशील मोहिते पाटलांच्या हातात 'तुतारी'; भाजपाला मोठा धक्का, कसंय माढ्याचं समीकरण? - Dhairyasheel Mohite Patil joins NCP - DHAIRYASHEEL MOHITE PATIL JOINS NCP

Dhairyasheel Mohite Patil : सोलापूरमधील अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर भाजपाचे धैर्यशील मोहिते पाटील यांचा आज (14 एप्रिल) शरद पवार गटात प्रवेश झाला आहे. त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माढा लोकसभेची उमेदवारी दिली जाणार आहे.

Dhairyasheel Mohite Patil
धैर्यशील मोहिते पाटील
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 14, 2024, 6:54 PM IST

Updated : Apr 14, 2024, 7:09 PM IST

सोलापूर Dhairyasheel Mohite Patil : अकलूजच्या मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावरती शरद पवार गटाची तुतारी वाजली. धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलाय. त्यांना माढा लोकसभेची उमेदवारी मिळणार आहे. या संदर्भात राजकीय चर्चा करण्यासाठी शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज येथे पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. मोहिते पाटील यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश झाल्याने शरद पवार गटाला सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठी ताकद मिळणार असून त्याचे मोठे राजकीय परिणाम येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

'या' कारणानं मोहिते पाटील गट होता नाराज : माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून भाजपा आणि मोहिते पाटील गट यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून दुरावा निर्माण झाला होता. भाजपानं उमेदवारीची दुसरी यादी जाहीर करत असतानाच माढामध्ये विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी घोषित केली होती. तेव्हापासून मोहिते पाटील गट नाराज होता. माढा लोकसभेसाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली होती; मात्र, भाजपाच्यावतीनं त्या मागणीचा फारसा गांभीर्याने विचार केला गेला नाही, अशी चर्चा आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवारी बदलण्याची मागणी मोहिते पाटील समर्थकांकडून सातत्यानं करण्यात येत होती. अखेर धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि शरद पवार गटात प्रवेश केलाय.

मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्यात भाजपा अपयशी : माढा लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच सातत्याने उमेदवारीवरून मोहिते पाटील गट आणि भाजपा यांच्यामध्ये दुरावा झाल्याचे दिसून येत होतं. मागील काही दिवसांपूर्वीच भाजपावरती दबाव टाकण्याच्या दृष्टीनं मोहिते पाटील यांच्या अकलूज येथील बंगल्यावरती मोहिते पाटील समर्थकांचा कार्यकर्ता मेळावा पार पडला होता. त्या मेळाव्याला शेकापचे आमदार जयंत पाटील, बाबासाहेब देशमुख यांची उपस्थिती होती. मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे तातडीनं अकलूज येथे दाखल झाले होते; मात्र, मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्यात भाजपाला यश आलेले दिसून येत नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनीही अकलूज येथे मोहिते पाटील यांची भेट घेतली होती. मात्र, ही भेट वैयक्तिक कारणासाठी असल्याचे कोल्हे यांनी सांगितलं होतं.

मोहिते पाटलांमुळं शरद पवार गटाला फायदा? : अकलूजमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. शरद पवार यांनी मोहिते पाटील यांची भेट घेत मोठी राजकीय खेळी खेळली असल्याचं दिसून आलं. पश्चिम महाराष्ट्रातील मोठे राजकीय प्रस्थ म्हणून मोहिते पाटील यांच्याकडं पाहिलं जातं. मोहिते पाटील हे शरद पवार गटामध्ये दाखल झाल्यानं शरद पवार गटाला सोलापूर जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठी ताकद मिळणार आहे. मोहिते पाटील यांच्या भेटीचा फायदा शरद पवार यांना बारामती मतदारसंघांमध्येही होणार असल्याची चर्चा आहे.

माढा लोकसभेत 'या' दोघांमध्ये होणार लढत : धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेतल्यानं माढा लोकसभेची निवडणूक ही रंगतदार होणार आहे. यामध्ये भाजपाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये ही लढत होणार आहे.

हेही वाचा :

  1. प्रचारात मग्न नेते मंडळींची दीक्षाभूमीवर मांदियाळी; पाहा व्हिडिओ - Dr Ambedkar Jayanti 2024
  2. सलमान खान गोळीबार प्रकरणाची अनमोल बिश्नोईनं स्विकारली जबाबदारी; पोस्ट शेयर करत दिला इशारा - Salman Khan Firing Incident
  3. उर्फी जावेदनं घातला 100 किलो वजनाचा गाऊन, व्हिडिओ व्हायरल - urfi jawed wearing 100 kg gown

Last Updated : Apr 14, 2024, 7:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.