ETV Bharat / state

महायुतीत मंत्रिपदासाठी इच्छुकांची मनधरणी करणं हे देवेंद्र फडणवीसांसमोर मोठं आव्हान? - DEVENDRA FADNAVIS

तिन्ही पक्षांतील मिळून 232 आमदार आहेत आणि एकूण 43 मंत्रिपदं आहेत. त्यामुळं मंत्रिपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे. त्या इच्छुकांची मनधरणी करण्याचे फडणवीसांसमोर मोठं आव्हान आहे.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2024, 5:16 PM IST

मुंबई - महायुतीचा भव्यदिव्य असा शपथविधी सोहळा गुरुवारी (5 डिसेंबर) रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे पार पडलाय. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीय. एकीकडे आता शपथविधी पार पडला असताना दुसरीकडे मात्र आता मंत्रिमंडळ विस्ताराची लगबग सुरू आहे. दरम्यान, अनेकजण मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. सध्या तिन्ही पक्षांतील मिळून 232 आमदार आहेत आणि एकूण 43 मंत्रिपदं आहेत. त्यामुळं मंत्रिपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे. त्या इच्छुकांची मनधरणी करणे किंवा त्यांना शांत करणे हे सध्या देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मोठं आव्हान आहे.

वादग्रस्त आमदार मंत्रिपदापासून लांबच राहणार : शपथविधीच्या आधी शपथविधीवरून महायुतीत अनेक बैठका पार पडल्यात. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी दिल्लीला जाऊन अमित शाहांची भेट घेतलीय. त्यावेळी राज्यातून मंत्रिपदासाठी तसेच जे सतत वादग्रस्त वक्तव्य करतात आणि वादाच्या भोवऱ्यात सापडतात, अशा आमदारांचे दिल्लीत भाजपा पक्षश्रेष्ठींनी रिपोर्टकार्ड मागवले होते. यावेळी जे आमदार वादग्रस्त वक्तव्य करतात, अशा आमदारांना मंत्रिपदापासून लांब ठेवा किंवा अशा आमदारांना मंत्रिपद देऊ नका, असं दिल्लीतील भाजपा पक्षश्रेष्ठींनी राज्यातील भाजपा नेत्यांना कळविल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळं भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांतील अनेक वाचाळवीर आमदार आहेत. जे सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडतात, अशा आमदारांना यावेळी मंत्रिपदापासून लांबच राहावं लागणार आहे, असं दिसतंय.

232 आमदार आणि केवळ 43 मंत्रिपद : दुसरीकडे विधिमंडळाचे विशेष अधिवेशन शनिवारी 7, 8 आणि 9 डिसेंबर रोजी होतंय. यानंतर नागपूरमध्ये सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन होणार आहे. तत्पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगितले आहे. मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांकडून आपणाला अधिक मंत्रिपदं मिळावी, यासाठी रस्सीखेच सुरू आहे. आपल्या पक्षाला अधिक मंत्रिपदं मिळाली पाहिजेत, असं प्रत्येक पक्षाकडून सांगण्यात येतंय. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाला 18 ते 15 मंत्रिपदं, शिवसेनेला 8 ते 10 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 8 ते 6 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. तर आम्हाला मंत्रिमंडळात 10 मंत्रिपदं मिळाली पाहिजेत. कारण आमच्या आमदार 41च्यावर आहेत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. तर शिवसेना नेत्यांकडून महायुतीत आमचे आमदार संख्याबळानुसार दोन नंबरवर असल्यामुळं आम्हालाही जास्तीत जास्त मंत्रिपदं मिळाले पाहिजे, अशी वक्तव्य करण्यात येताहेत. दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तारात काही अनुभवी नेत्यांना किंवा यापूर्वी मंत्रिपद भूषविलेल्यांनादेखील डावलले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचं बोललं जातंय. मात्र महायुतीचे 232 आमदार असताना आणि केवळ 43 मंत्रिपदं असताना मंत्रिपदाची मान कुणाकुणाच्या गळ्यात पडणार आणि कोण-कोण इच्छुक नाराज होणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

तारेवरची कसरत करावी लागणार : महायुतीत सध्या तिन्ही पक्षांचे मिळून 232 विधानसभेतील आमदार आहेत, तर विधान परिषदेचे पकडून 280 च्यावर आमदार आहेत आणि मंत्रिपदं 43 आहेत. आता तीन मंत्रिपदांची शपथ घेतली गेलीय. उर्वरित 40 मंत्रिपदांमध्ये 280 आमदारांमध्ये वाटप करणे यासाठी महायुतीतील प्रमुख तीन नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे, असं राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना सांगितलंचय. जर रेशो काढायचा म्हटलं तर 280 आमदारांमागे आणि 40 मंत्रिपदानुसार 9 आमदारांमागे एक मंत्रिपद असं समीकरण असेल. दुसरी गोष्ट म्हणजे आगामी काळात होणाऱ्या पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून देखील मंत्रिपदाचं वाटप होऊ शकतं. कारण मुंबई महापालिका ही भाजपाला यावेळी काबीज करायची आहे. त्यामुळे मुंबईत आमदारांना मंत्रिपदाची दिलं जाऊ शकतात. विशेष म्हणजे जे वादग्रस्त आमदार आहेत. त्याच्यामध्ये शिवसेनेचे तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर यांना मंत्रिपद मिळू नये, अशी भाजपाची भूमिका असल्याचंही बोललं जातंय. त्यामुळं 280 आमदार आणि 40 मंत्रिपदं यांचे वाटप करताना देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मोठं आव्हान असून, ज्यांची ज्यांची मंत्रिपदासाठी भाऊगर्दी आहे, त्यांची मनधरणी करणे आणि त्यांना शांत करणे हेसुद्धा महायुतीतील प्रमुख नेत्यांसमोर आव्हान असल्याचंही जयंत माईणकर यांनी म्हटलंय.

महायुतीत मंत्रिपदासाठी कुणाच्या नावाची चर्चा...

भाजपा -
देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, राधाकृष्ण विखे-पाटील, पंकजा मुंडे, राहुल नार्वेकर, जयकुमार रावल, राणा जगजितसिंग पाटील, देवयानी फरांदे, राहुल कुल, शिवेंद्रराजे भोसले, अतुल सावे, माधुरी मिसाळ, अभिमन्यू पवार आणि सचिन कल्याणशेट्टी

शिवसेना -
एकनाथ शिंदे, उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, भरत गोगावले, दीपक केसरकर, प्रताप सरनाईक, तानाजी सावंत, राजेश क्षीरसागर आणि आशिष जयस्वाल

राष्ट्रवादी काँग्रेस -
अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धर्मरावबाबा आत्राम, धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, अनिल पाटील आणि आदिती तटकरे

हेही वाचा :

  1. विधानसभा अध्यक्षपद नको, तर कॅबिनेट मंत्रिपदासाठी नेत्यांची लॉबिंग
  2. अजित पवार यांना मोठा दिलासा : बेनामी संपत्ती जप्त प्रकरणात क्लीन चिट
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.