ETV Bharat / state

त्यांना आताच आमदारकीची स्वप्ने, अजित पवार यांचा युगेंद्र पवारांवर हल्ला - Ajit Pawar In Baramati - AJIT PAWAR IN BARAMATI

Ajit Pawar On Yugendra Pawar : सुप्रिया सुळे यांच्या प्रचारसभेत बारामतीच्या संस्था शरद पवार यांनी उभ्या केल्या असं विधान युगेंद्र पवार यांनी केलं होतं. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. सगळं शरद पवारांनीच उभं केलं तर मग ३२ वर्षे मी काय केलं, असा प्रश्न अजित पवारांनी विचारलाय. सोबतच युगेंद्र पवारांना आतापासूनच आमदारकीची स्वप्नं पडू लागली असल्याचंही ते म्हणाले.

Ajit Pawar On Yugendra Pawar
अजित पवार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 20, 2024, 7:25 PM IST

बारामती (पुणे) Ajit Pawar On Yugendra Pawar : महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारसभेत बारामतीच्या संस्था शरद पवार यांनी उभ्या केल्या असं सांगणाऱ्या युगेंद्र पवार यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाचार घेतला. सगळे त्यांनीच उभे केले मग ३२ वर्षे मी काय करत होतो, असा सवाल अजित पवार यांनी केला. शिवाय त्यांना आतापासूनच आमदारकीची स्वप्ने पडू लागल्याचा टोला पवारांनी लगावला. युगेंद्र पवार यांचा नामोल्लेख न करता ते म्हणाले, मी खासदार झाल्यावर यांचा जन्म झाला आणि हे सांगताहेत की, बारामतीच्या सर्व संस्था शरद पवार यांनी उभ्या केला. मग आम्ही ३०-३२ वर्षे काय केलं, असा सवाल अजित पवार यांनी केला.

युगेंद्र पवार यांच्यावर खोटे बोलण्याचा आरोप : माळेगाव कारखाना शेंबेकर-जाधवराव या मंडळींनी उभा केला. छत्रपती कारखाना जाचकांनी उभा केला. सोमेश्वर कारखाना मुगुटराव काकडे यांनी उभा केला. बारामती नगरपरिषद १८६२ ला स्थापन झाली. खरेदी-विक्री संघ, मार्केट कमिटी, बारामती बॅंक पूर्वीपासूनच होती. कृषी विकास प्रतिष्ठान अप्पासाहेब पवार यांनी उभे केले. फक्त दूध संघ शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झाला. नंतर १९७२ ला त्यांनी विद्या प्रतिष्ठान स्थापन केले. तेथे १९९१ नंतर मी ट्रस्टी म्हणून गेल्यानंतर आणखी जमीन घेत विस्तार केला. तोवर संस्थेचा विस्तारही झाला नव्हता आणि आमचे चिरंजीव सांगतात की हे साहेबांनी केले, ते साहेबांनी केले. तुम्ही किती धडधडीत खोटे बोलता, तुमचा जन्मही त्यावेळी झाला नव्हता. मग जन्माच्या आधीच तुम्हाला कोणी काय केले, हे माहीत झाले का असा टोला त्यांनी लगावला.

मग मी काटेवाडीत शेती करू का : कुटुंबातील अनेक मुद्द्यांवर अजित पवार यांनी यावेळी माहिती दिली. १९८९ ला काही मंडळी शरद पवार यांच्याकडे गेली. त्यांनी मला लोकसभेची उमेदवारी द्या, असे सांगितले. त्यावर शरद पवार यांनी अजित पवार यांना उमेदवारी देतो आणि मी काटेवाडीत जाऊन शेती करतो, असं उत्तर दिलं. ही मंडळी गप्प थोबाडीत मारल्यासारखी माघारी आली. ती निवडणूक संभाजीराव काकडे विरुद्ध शंकरराव पाटील अशी झाली. आम्ही पाटील यांचं काम केलं अशी आठवण सांगितली. पुढे १९९१ ला सुप्रिया सुळे यांच्या लग्नावेळी काही उद्योगपतींनी तुमच्या कुटुंबातील कोणी तरी राजकारणात असू द्या असं शरद पवार यांना सांगितलं. त्यावेळी मी राजकारणात इच्छुक असल्याने मी पुढे आलो. बाकीचे उद्योग-व्यवसायात गेले. पण आता गेल्या दोन महिन्यांपासून ही मंडळी धंदा पाणी सोडून प्रचारात उतरली आहेत. सुरुवातीचा अपवाद वगळता ते कधी माझ्या प्रचारात दिसले नाहीत, असं अजित पवार म्हणाले.

शरद पवार यांचाच रोहित पवार यांना होता विरोध : आमदार रोहित पवार यांच्या राजकीय प्रवेशाला शरद पवार यांचाच विरोध होता, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. शरद पवार यांचा विरोध डावलून मी त्यांना जिल्हा परिषदेला आणि पुढे आमदारकीला संधी दिल्याचं अजित पवार म्हणाले. २०१७ साली राजेंद्र पवार माझ्याकडे आले आणि रोहितला जिल्हा परिषदेला संधी दे म्हणाले. मी शरद पवार यांना फोन केला. त्यांनी अजिबात जमणार नाही, रोहितने उद्योग व्यवसाय सांभाळावेत, असं त्यांनी सांगितलं. मी पुन्हा रात्री राजेंद्र पवार यांच्याकडे जात त्यांना कल्पना दिली. रोहित पवार त्यावेळी अपक्ष म्हणून अर्ज भरणार होते. त्यांचे सूचक-अनुमोदकही ठरले होते. मी शरद पवार यांचे न ऐकता परस्पर रोहित पवार यांचं तिकीट जाहीर केलं. त्यावर शरद पवार यांची बोलणी मला खावी लागली. पण ज्येष्ठ असल्याने त्यांचं बोलणं मी मनाला लावून घेतलं नाही, असं अजित पवार म्हणाले.

तर मताधिक्याने विजयी झालो असतो का : रोहित यांनी मला हडपसरमधून आमदारकी लढवायची आहे, मगरपट्टा भागात माझे सासरे सगळे सांभाळतील असं सांगितलं. एकाच जिल्ह्यात सगळे पवार म्हटल्यावर लोक काय म्हणतील? हडपसरला चेतन तुपेंना तिकीट द्यायचं आहे, असं मी त्यांना सांगत कर्जत-जामखेडचा पर्याय सुचवल्याचा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला. ते पुढे म्हणाले, कर्जत-जामखेडमधून मी उभे राहावे असं शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी दहा वर्षांपूर्वी सुचवलं होतं. सुनेत्रा पवार बारामतीत आणि मी कर्जत-जामखेडला जावे असं काकडे म्हणाले होते. पण मी त्या भानगडीत पडलो नाही, रोहितला तो मतदारसंघ दिला. आज ते माझ्यावर नाही नाही ती टीका करत आहेत. मी धमक्या देतो असं सांगत आहेत, अहो मी धमक्या दिल्या असत्या तर बारामतीकरांनी मला एवढ्या प्रचंड मताधिक्याने विजयी केलं असतं का, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.

हेही वाचा :

  1. 'राहुल गांधींना वायनाडमध्ये संकट वाटतंय, निवडणुकीपूर्वीच कॉंग्रेसनं मानली हार'; नांदेडमधून मोदींची टीका - PM Narendra Modi Rally
  2. "पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या सहमतीनं...", अजित पवार गटाचा मोठा खुलासा - NCP Press Conference
  3. अखेर ठरलं! शिवसेनेकडून छत्रपती संभाजीनगरातून संदीपान भुमरेंना उमेदवारी जाहीर - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.