ETV Bharat / state

"झारखंड सरकारकडून लाडकी बहीण योजनेची नक्कल", अजित पवारांचा इंडिया आघाडीला टोला - Majhi Ladki Bahin Yojana - MAJHI LADKI BAHIN YOJANA

Majhi Ladki Bahin Yojana : झारखंड सरकार माझी लाडकी बहीण योजनेची नक्कल (कॉपी) करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय. याबाबत त्यांनी एक्स मीडियावर पोस्ट केली आहे. दुसरीकडं शिवसेना शिंदे पक्षानंही लाडकी बहीण योजनेची नक्कल होत असल्याचा दाव करत इंडिया आघाडीवर टीका केली.

Ajit Pawar
अजित पवार, हेमंत सोरेन (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 4, 2024, 4:08 PM IST

Updated : Aug 4, 2024, 4:21 PM IST

मुंबई Majhi Ladki Bahin Yojana : राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्यानं राज्य सरकारनं माझी लाडकी बहीण योजना सुरू कल्याचा आरोप विरोधक करत आहेत. सध्या संपूर्ण राज्यात या योजनेची चर्चा सुरू आहे. दुसरीकडं याच योजनेतील विविध तरतुदींवरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका होताना दिसत आहे. या योजनेमुळं महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, याच योजनेवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. झारखंडमधील इंडिया आघाडीचं सरकार आमच्या योजनेची कॉपी करत असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे.

ज्योती वाघमारे यांची प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter)

काय म्हणाले अजित पवार? : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'X' सोशल मीडियावर पोस्ट करत विरोधकांवर टीका केली आहे. "झारखंडमधील इंडिया आघाडी सरकारनं लाडकी बहीण योजनेची नक्कल केल्याचं स्पष्ट झालंय. महसुलाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य भारतातील अव्वल राज्यांपैकी एक आहे. आम्ही ही योजना दीर्घकाळ राबवू. पण, झारखंडमध्ये ही योजना प्रभावीपणे कशी राबवायची यामुळं इंडिया आघाडी चिंतेत आहे."

  • विरोधकांमध्ये भीतीचं वातावरण : " महाविकास आघाडीचे सर्व नेते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर तुटून पडलेत. दुसरीकडं झारखंडमध्ये ही योजना राबवित आहे. याचा अर्थ या योजनेची गुणवत्ता किती आहे, हे आपण बघावं. विरोधकही या योजनेची कॉपी करत आहेत," असा टोला शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी विरोधकांना लगावला.

झारखंड काय आहे योजना ? : झारखंड सरकारनंही महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी योजना जाहीर केली आहे. या योजनेचं नाव 'झारखंड मुख्यमंत्री मंइयाँ सन्मान योजना' असं ठेवण्यात आलं आहे. योजनेद्वारे एकूण 50 लाख महिलांना दरमहा एक हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी झारखंड सरकारनं एक पोर्टलदेखील सुरू केले. योजनेचा लाभ मिळविण्याकरिता महिलांना पोर्टलवरून अर्ज करता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 21 ते 50 वर्षे वयोगटातील महिला पात्र असणार आहेत.

'हे' वाचलंत का :

  1. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना; नवी मुंबई महापालिका मुख्यालयात वॉर रुम - cm ladki bahin yojana
  2. 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' हायकोर्टाच्या दारात; याचिका दाखल, मंगळवारी होणार सुनावणी - CM Ladki Bahin Yojana
  3. लाडक्या बहिणींना विरोध करणारे सावत्र भाऊ- मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर सोडला बाण - Eknath Shinde Attack On Thackeray

Last Updated : Aug 4, 2024, 4:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.