मुंबई Repolling Mumbai West North Constituency : देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 'एनडीए'चं सरकार स्थापन झालय. राज्यात प्रचारादरम्यान महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात सामना रंगला होता. त्यानंतर राज्यात धक्कादायक निकाल लागला. निकालात मुंबईतील सर्वात चर्चेत राहिलेली जागा म्हणजे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात शिवसेनेचे रवींद्र वायकर विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्यात चुरशीची लढाई झाली.
मतमोजणीवर प्रश्नचिन्ह : मतमोजणीत केवळ 48 मतांनी अमोल कीर्तिकरांना पराभूत व्हावं लागलंय. त्यानंतर देखील पश्चिम लोकसभा मतदारसंघातील वाद काही थांबायला तयार नाही. मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप अमोल कीर्तिकर यांनी केला होता. आता मतमोजणीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत भरत शाह तसंच अरोरा सुरिंदर मोहन यांनी थेट पोलीसात तक्रार दाखल केली आहे. तसंच या मतदारसंघात पुन्हा फेर मतदान घेण्याची मागणी केली आहे.
केवळ 48 मतांनी रवींद्र वायकरांचा विजय : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील अतिशय चुरशीची लढत मुंबई पश्चिम उत्तर लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळाली. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. पश्चिम उत्तर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या दिवशी शेवटच्या फेरीपर्यंत दोन्ही उमेदवारांमध्ये रस्सीखेस पाहायला मिळाली. त्यावेळी 48 मतांनी रवींद्र वायकरांना विजयी घोषित करण्यात आलं. त्यामुळं मतमोजणीत हेराफेरी करण्यात आल्याची शंका अमोल कीर्तिकरांनी उपस्थित केली होती. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये पार पडली होती.
फेर मतदान घेण्याची मागणी : मतमोजणी केंद्रावर मोबाईल नेण्यास बंदी असताना रवींद्र वायकर यांच्या दोन कार्यकर्त्यांनी मोबाईलचा वापर केल्याचा आरोप झाल होता. त्यामुळं त्या दोन कार्यकर्त्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, आठ दिवस उलटून देखील पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाहीय, असं तक्रारदार भरत शाह यांनी म्हटलं आहे. हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह म्हणाले. 'शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांची मुलगी तसंच त्यांचा साला मतमोजणी केंद्रावर मोबाइल वापरत होते'. याविषयी 4 जून रोजी पोलिसांना कारवाई करण्याची मागणी केलीय. मात्र, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. आशा प्रकारामुळं लोकांचा विश्वास मतदान प्रक्रियेवर राहणार नाही. तसंच उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात फेर मतदान घेण्यात यावं, अशी मागणी देखील भरत शाह यांनी केली आहे. तसंच आपल्यासोबत या लढाईत जनाधार पार्टीचे उमेदवार अरोरा सुरिंदर मोहन देखील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
'हे' वाचलंत का :
- अजित पवारांना सोबत घेऊन भाजपानं आपली ब्रँड व्हॅल्यू कमी केली; संघाच्या मुखपत्रातून भाजपाला 'घरचा आहेर' - RSS Mouthpiece Criticize To BJP
- "बीडच्या बप्पाचा दादांना फोन"; शरद पवार गटाच्या खासदाराबाबत अमोल मिटकरींचा मोठा दावा - Amol Mitkari On Bajrang Sonawane
- चंद्राबाबू नायडूंनी घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ, पवन कल्याण उपमुख्यमंत्री - Chandrababu Naidu