ETV Bharat / state

बंद घरात आढळले तिघांचे कुजलेले मृतदेह: पत्र्याच्या पेटीत माय लेकीचा तर बाथरुममध्ये वडिलाचं आढळलं शव, नागरिक हादरले - Found 3 Dead Body In House

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2024, 12:08 PM IST

Found 3 Dead Body In House : पालघर जिल्ह्यातील नेहरोली इथं एका बंद घरात एकाच कुटुंबातील तिघांचे कुजलेले मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

Found 3 Dead Body In House
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

पालघर Found 3 Dead Body In House : एकाच कुटुंबातील तिघांचे कुजलेले मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना वाडा तालुक्यातील नेहरोली या गावात उघडकीस आली. तिघांचा खून करुन मारेकऱ्यांनी घराला बाहेरुन कुलूप लावलं असावं, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मारेकऱ्यांनी तिघांचा खून नेमका कशासाठी केला, याचा पोलीस शोध घेत आहेत. मुकुंद बेचलदास राठोड, कांचन मुकुंद राठोड आणि मुलगी संगीता मुकुंद राठोड असं मृतदेह आढळलेल्या तिघांची नावं आहेत. राठोड कुटुंब मूळचं गुजरात राज्यातील असून मागील 20 वर्षापासून ते नेहरोली इथं राहत होते. त्यांना दोन मुलं असून एक मुलगा वसई इथं तर दुसरा मुलगा गुजरामधील राजकोट इथं राहतो.

राठोड कुटुंब मूळचं गुजरातचं : मूळचे गुजरात इथले असलेले मुकुंद बेचरदास राठोड (वय 75), कांचन मुकुंद राठोड (वय 70) आणि मुलगी संगीता मुकुंद राठोड (वय 52) हे कुटुंबीय नेहरोली या गावात वीस वर्षांपासून राहत होते. मुलगी संगीता ही दिव्यांग होती. 18 ऑगस्टपासून हे कुटुंब संपर्काच्या बाहेर असल्यानं राजकोट इथं फॅब्रिकेशन व्यवसाय करत असलेला त्यांचा मुलगा सुहास शोध घेण्यासाठी नेहरोली इथं आला.

तिहेरी हत्येचा पोलिसांना संशय : घरी आल्यानंतर मुलानं कुलूप तोडलं असता, आई आणि तिच्या बहिणीचा मृतदेह बंद पेटीत तर वडिलांचा मृतदेह आढळून आला. जवळपास 12 दिवसांपासून संपर्काच्या बाहेर असलेल्या या कुटुंबांचा अशा पद्धतीनं मृतदेह आढळल्यानं ही तिहेरी हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पत्र्याच्या पेटीत दोन मृतदेह : वाडा पोलिसांनी घटनास्थळी भेट देताच, बाथरुमच्या दरवाजात वडिलांचा मृतदेह आढळला. घरात पत्र्याच्या पेटीमध्ये आई आणि मुलीचा मृतदेह आढळला. ही घटना होऊन बरेच दिवस झाल्यानं प्रेताला दुर्गंधी सुटली होती. एकूण परिस्थिती पाहून हे तिहेरी हत्याकांड असल्याची चर्चा परिसरात सुरू होती.

मुलानं तोडले कुलूप : नेहरोली इथल्या घराला बाहेरुन कुलूप असल्यानं कुटुंब आजारी तर नाही ना, या आशेनं आजूबाजूचे सर्व दवाखानं सुहास यांनी तपासून पाहिले. आपल्या कुटुंबाचा कुठंही शोध लागला नसल्यानं अखेर घरातील काही कागदपत्रं काढण्याच्या उद्देशानं मुलानं कुलूप तोडलं. या वेळी घरातील दृश्य बघून त्याच्या पायाखालची वाळू सरकली.

दुर्गंधी सुटू नये म्हणून मृतदेहावर टाकल्या जाड गाद्या : अनेक दिवसांपासून मृतदेह या ठिकाणी पडल्यानं ते कुजलेल्या अवस्थेत होते. मृतदेहांचा बाहेर वास येऊ नये, या उद्देशानं मृतदेहांवर जाड गाद्या टाकण्यात आल्या होत्या. या घटनेची वाडा पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या वाडा पोलीस घडलेल्या घटनेचा तपास करत आहेत.

हेही वाचा :

  1. पुण्यात तरुणीचा निर्घृण खून, हातपाय कापून धड फेकलं नदीपात्रात, नागरिक हादरले - Found Girls Body Parts In Pune
  2. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरात प्लास्टिक बॅगमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; हत्येचा संशय, परिसरात दहशत - Found Woman Dead Body
  3. दादर सुटकेस प्रकरणानंतर पुन्हा लगेज बॅगमध्ये आढळला मृतदेह, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू - Thane Crime News

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.