ETV Bharat / state

जलजीवन मिशनच्या योजनेत कोट्यवधीचा घोटाळा; भाजपाकडूनच पोलखोल करत थेट पंतप्रधानांकडे तक्रार - Jaljeevan Mission Scheme

Jaljeevan Mission Scheme: 'जलजीवन मिशन योजने'अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी आणि शहापूर तालुक्यातील मंजूर झालेल्या कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य रामनाथ पाटील यांनी केला आहे. (Scam in Water Supply Scheme) थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रवजा लेखी तक्रार पाठवून या संपूर्ण योजनेची एसआयटी, सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी (Water Supply Scheme in Thane) केली आहे.

Jaljeevan Mission scheme
जलजीवन मिशन योजना
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 21, 2024, 9:32 PM IST

ठाणे Jaljeevan Mission Scheme: 'हर घर नळ' योजनेद्वारे देशातील कोट्यवधी कुटुंबीयांना त्यांच्या घरामध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर 'जलजीवन मिशन योजना' राबविण्यात आली. (PM Narendra Modi) विशेष म्हणजे, ठाण्यात या योजनांचे भूमिपूजन भिवंडी लोकसभेचे खासदार तथा केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पार पडले होते. (BJP Leader Ramnath Patil) असे असताना त्यावर भाजपा पदाधिकारी यांनी आक्षेप घेतल्यानं भाजपा गोटात खळबळ उडाली आहे. भिवंडी तालुक्यातील सुमारे २०० गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाण्याची पाईप लाईन टाकणे, पाण्याची टाकी बांधणे, नवीन पाण्याची सम टाकी बांधणे आणि इतर सुविधांसाठी सुमारे 357 कोटी 48 लाख 35 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला (Minister of State Kapil Patil) असल्याचा दावा रामनाथ पाटील यांनी पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या निवेदनात केला आहे.

एसआयटी, सीबीआय चौकशीची मागणी: भिवंडीतील सुमारे 34 गावांमध्ये स्टेम प्राधिकरण तर 63 गावांमध्ये मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरून नळ जोडणी देऊन 97 गावांमध्ये पाण्याचा मुबलक पुरवठा नळाद्वारे होत आहे. या गावांमध्ये नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे; मात्र तरीही अधिकाऱ्यांनी टक्केवारीच्या लालसेपोटी ही योजना राबविली असून या गावांमध्ये राबविलेल्या योजनेत सुमारे 162 कोटी 52 लाख 55 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्यानं या सर्व प्रकरणांची एसआयटी आणि सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे निमंत्रित प्रदेश सदस्य तथा ठाणे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस रामनाथ पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

संबंधित यंत्रणेकडे तक्रार द्यायला हवी होती: भिवंडी तालुक्यासह संपूर्ण ठाणे जिल्हा ग्रामीण मधील 1 हजार 100 गावांमध्ये 1,600 कोटी रुपयांच्या जलजीवन मिशन अंतर्गत 'हर घर नळ' योजना राबविली जात आहे. त्या अनेक गावांमध्ये काम सुरू आहे. त्यापैकी बहुतांश कामांचे भूमिपूजन मी केले आहे; पण असे काही प्रकरण असेल तर त्याची माहिती द्यावी. त्याची दखल घेऊन चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना देऊ असं सांगत त्यांच्याकडे काही माहिती असेल तर त्यांनी पंतप्रधानांकडे तक्रार करण्याआधी संबंधित यंत्रणेकडे तक्रार द्यायला हवी होती. यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करीत असेल तर पुढं गेलं पाहिजे. तरी याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना माहिती देईल अशी प्रतिक्रिया केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे. एकंदरीतच या योजनेत झालेल्या कोट्यवधी घोटाळ्याच्या आरोपांमुळे भाजपामधील अंतर्गत कुरबुरी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा:

  1. मालदीवच्या राष्ट्रपतींचा पुन्हा भारतद्वेष, 'त्या' एका निर्णयानं निष्पाप 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
  2. राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' जमावानं अडवली, मोदी-मोदीच्या घोषणा, फ्लाइंग किसनं उत्तर
  3. सानियानंच शोएब मलिकपासून विभक्त होण्याची इच्छा व्यक्त केली? घटस्फोटाचं नेमकं कारण काय?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.