वर्धा Couple Suicide in Wardha : वर्धा जिल्ह्यातील पारडी गावातील एका प्रेमीयुगलानं काही दिवसा आधी पलायन केलं होतं. आज त्या दोघांचेही मृतदेह आढळून आल्यानं एकच खडबळ उडालीय. या प्रेमीयुगलानं आत्महत्या का केली याचं कारण समोर आलेलं नाही.
पोलिसांत दिली होती तक्रार : वर्ध्यातील तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या पारडी येथील 22 वर्षीय मुलानं गावातीलच एका अल्पवयीन मुलीला 22 तारखेला फुस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकांनी तळेगांव पोलिसांत दिली होती. त्याआधी घरच्यांनी एक दिवस त्या मुलीचा शोध घेतला होता. तेव्हा मुलगी मिळून न आल्यामुळं मुलीच्या घरच्यांनी 23 तारखेला तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तळेगाव पोलीस हे दोघांचाही शोध घेत होते.
कुजलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह : पोलीस या प्रेमीयुगलाचा शोध घेत असताना आज दुपारच्या दरम्यान पारडी येथील पोलीस पाटलांनी तळेगाव पोलिसांना कुसुमदोडा शेत शिवार परिसरात दोन मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती दिली. माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी घटनास्थळी त्या मृतदेहांची तपासणी केली. यादरम्यान हे मृतदेह बेपत्ता असलेल्या प्रेमीयुगलांचे असल्याची खात्री झाली. मृतदेह अतिशय कुजलेल्या अवस्थेत असल्यानं जागेवरच शव विच्छेदन करण्यात आलं. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय पळणाटे करत आहेत.
आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट : या तरुण प्रेमीयुगलांनी आत्महत्या केल्यानं पारडी परिसरात एकच खळबळ उडालीय. यात 22 वर्षीय तरुणानं अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या कुटुंबीयांनी दाखल केली होती. यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलंय. मात्र या दोघांनी आत्महत्या का केली, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
हेही वाचा :
- 'मम्मी-पप्पा, मी जेईई करू शकत नाही, मला माफ करा'; परीक्षेच्या आधी कोटामध्ये 18 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या
- नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; आत्महत्या विरोधी रॉड न लावल्यानं होणार वसतिगृह चालकावर कारवाई
- 'तुझ्या मैत्रिणीशी माझे संबंध जुळवून दे' म्हणत चुलत्याचा पुतणीवर हल्ला, संशयिताची आत्महत्या