ETV Bharat / state

आई-वडिलांचा घटस्फोट; तरीही पूजा खेडकर नॉन क्रिमीलेअरसाठी अपात्र - सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार - Pooja Khedkar Case - POOJA KHEDKAR CASE

Pooja Khedkar Case : आई-वडिलांचा घटस्फोट झाला असला, तरी तरीही पूजा खेडकर नॉन क्रिमीलेअरसाठी अपात्र आहेत, असं सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं आता पूजा खेडकर यांच्या पालकांच्या वैवाहिक स्थितीवरच संशय व्यक्त करत चौकशीचा आदेश दिला आहे.

Pooja Khedkar Case
पूजा खेडकर (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 24, 2024, 3:18 PM IST

पुणे Pooja Khedkar Case : परिविक्षाधिन आयएएस अधिकारी असलेल्या पूजा खेडकर यांच्याबाबत अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. अलिकडंच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आई-वडिलांचा घटस्फोट झाला असल्यानं त्याआधारे मी आरक्षणाचा लाभ घेतला, असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्या आणखी वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. आई-वडिलांचा घटस्फोट झाला असला, तरी पूजा खेडकर यांची संपत्ती पाहता त्या घटस्फोटानंतरही नॉन क्रिमीलेअरसाठी अपात्र होतील, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी टिट्व करत दिली आहे.

आई-वडील विभक्त असले तरी पूजा खेडकर नॉन क्रिमीलेअरसाठी अपात्र : सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी लिहिलं की, पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर या 2003 पासून दिलीप खेडकरांपासून विभक्त झाल्या होत्या. जरी आई-वडिल विभक्त झाले होते तरीसुद्धा पूजा नॉन क्रिमीलेअरसाठी अपात्र होती. कारण तिच्याकडे 16,000 चौरस मीटर व्यावसायिक मालमत्ता (1995-2005), नॅशनल सोसायटीमध्ये 45 लाखांचा 9,000 चौरस फूट भूखंड आणि 2005 मध्ये 1.45 कोटींचा बंगला अशी मालमत्ता होती. तसेच सुरुवातीला एक डॉक्टर नंतर तिने एक शेतकरी म्हणून आपली ओळख दाखविली आहे. तिच्या आई-वडिलांच्या घटस्फोटाच्या सत्यतेबद्दल शंका कायम आहे. कारण लोकसभा निवडणुकीसाठी नुकत्याच दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ते अजूनही पती-पत्नी म्हणून लिहिल्याचं विजय कुंभार यांनी म्हटलं आहे.

तब्बल सहा वेळा मेडिकल टेस्टला गैरहजर
पुणे जिल्ह्यात परिविक्षाधिन अधिकारी राहिलेल्या पूजा खेडकर यांच्या बाबत एक-एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. सुरवातीला दिव्यांग असलेलं सर्टिफिकेट दाखवून यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर तब्बल सहावेळा मेडिकल टेस्टला गैरहजर आणि मग मोठी संपत्ती असताना नॉन क्रिमीलेअर दिलेलं प्रमाणपत्र अशी एका पाठोपाठ एक माहिती पुढे आली. प्रकरण पुढं आल्यानंतर पूजा खेडकर यांच्या विरोधात युपीएससीकडून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे तिच्या अडचणीत वाढ झाली. आयएएस पूजा खेडकर यांना आत्ता परीक्षा देण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. तसंच तुमची उमेदवारी रद्द का करू नये, याबाबत कारणे दाखवा नोटीस देखील त्यांना पाठवण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पूजा खेडकर यांना मंगळवारी २३ जुलैपर्यंत उत्तराखंडमधील मसुरी या ठिकाणी असलेल्या प्रशिक्षण केंद्रात चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. मात्र, त्या चौकशीसाठी पोहोचल्याच नाहीत. तसंच त्यांनी याबद्दल कोणतंही पत्र दिलेलं नाही. कालपासून खेडकर यांचा फोन नॉट रीचेबल असल्याचं सांगितलं जातं आहे.

हेही वाचा

  1. मनोरमा खेडकर यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ; वकिलांनी काय केला युक्तिवाद? - Manorama Khedkar
  2. पूजा खेडकर यांच्या बंगल्यात अज्ञात व्यक्तींचा शिरकाव; संशयास्पद हालचाली - Pooja Khedkar Case
  3. पूजा खेडकर प्रकरणात मोठी घडामोड : यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांचा राजीनामा - Manoj Soni Resigns

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.