ETV Bharat / state

पुणे काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर; काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

Pune Congress Dispute : पुणे शहर काँग्रेस हे नेहमीच वेगवेगळ्या विषयांमुळं चर्चेत असतं. आता पुण्यातील विद्यार्थी काँग्रेसमधील गटबाजी समोर आलीय. हे प्रकरण इथपर्यंतच न थांबता चक्क पुणे शहर काँग्रेस भवनातच कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली.

youth brutally beaten
लाथाबुक्क्यांनी मारहाण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 5, 2024, 9:30 AM IST

Updated : Feb 5, 2024, 6:14 PM IST

पीडित प्रफुल पिसाळ हे अमीर शेख यांच्या कृत्याविषयी सांगताना

पुणे Pune Congress Dispute : शहरातील विद्यार्थी काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं. शहरातील कॅम्पस अध्यक्ष पदावरून विद्यार्थी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अभिजीत गोरे आणि विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांच्यात हा वाद झालाय. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलीय.

काँग्रेस भवनमध्ये मारहाण : पुणे शहर काँग्रेस कमेटीच्या ज्येष्ठ नेत्यांमधील अंतर्गत वाद हे आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. याचा फटका देखील शहर काँग्रेसला बसलेला आहे. आता ज्येष्ठांच्या बरोबर विद्यार्थी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. थेट काँग्रेस भवनमध्ये विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून विद्यार्थी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आलीय, असं तक्रारीत नमूद आहे.

तक्रार केली दाखल : पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात काँग्रेसच्या विद्यार्थी विंगचे शहर उपाध्यक्ष प्रफुल संभाजी पिसाळ यांनी याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार काँग्रेसचे विद्यार्थी विंगचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, भूषण रानभरे, युवराज नायडू, राज जाधव यांच्या विरोधात तक्रार दाखल केलीय.

पदावरून झाला वाद : तक्रारदार प्रफुल पिसाळ हे विद्यार्थी काँग्रेस संघटनेत 3 वर्षांपासून काम करत आहेत. सध्या ते जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. अभिजीत गोरे हे पुणे काँग्रेस विद्यार्थी विंगचे शहर अध्यक्ष तर अमीर शेख हे संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आहेत. अभिजीत गोरे यांना जिल्ह्यामधील संघटनेचे पदे वाटप/नियुक्त करण्याचा अधिकार आहेत. अभिजीत गोरे यांच्या ऐवजी प्रदेशाध्यक्ष अमिर शेख आणि कोथरूड विभागाचे माजी अध्यक्ष राज जाधव यांनी भारती विद्यापीठ कॅम्पस, कोथरुडचे अध्यक्षपद थोरात या विद्यार्थ्याला दिलं. यामुळं या पदावरून गोरे आणि शेख यांच्यात वाद झाला.

असा घडला प्रकार : तक्रारदार प्रफुल पिसाळ हे 3 फेब्रुवारीला काँग्रेस भवन येथे गेले होते. त्यावेळी तेथे अमीर शेख हे 30-40 कार्यकर्त्यांसह हजर होते. अमीर शेख हे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या केबीनमध्ये बसले होते. तेव्हा तक्रारदारांनी अमीर शेख यांना भेटून प्रकरण मिटवून घ्या असं सांगितलं होतं. तुम्ही वकीलपत्र घेऊन आलात का असं म्हणत शेख यांनी पिसाळ यांना शिवीगाळ केली.

काँग्रेस भवनच्या बाहेर तुम्ही गोरे यांना बोलवा, तुम्हाला सोडणार नाही. त्यांच्या घरी घेऊन चला असं शेख तक्रारदार पिसाळ यांना म्हणाले. तेव्हा मला घर माहिती नाही असं तक्रारदारानं सांगितलं. त्यावेळी तेथे हजर असलेले युवराज नायडू यांनी त्यांच्या हातातील कडे काढून पिसाळ यांच्या डोक्यात मारले. राज जाधव यांनीही पिसाळ यांच्या तोंडावर मारहाण केली. प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांनी लाथांनी छातीवर मारले तर भुषण रानभरे यांनी विटानं पिसाळ यांच्या पाठीवर मारले. तसंच धमकीही दिली, असं तक्रारीत म्हटलं आहे. यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह 4 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तर पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा -

  1. Satara Crime News : चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल
  2. VIDEO: ८५ वर्षीय कीर्तनकार चिकणकर यांची बायकोला लाथाबुक्क्यांनी मारहाण, सुनांची बघ्याची भूमिका, नातवाच्या आनंदाने उड्या
  3. वीजवापराची तपासणी करण्यासाठी माझ्या घरी का आलास म्हणत वायरमनला लाथाबुक्क्यांनी मारहाण

Last Updated : Feb 5, 2024, 6:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.