ETV Bharat / state

'त्या' वादग्रस्त वक्तव्याचा महिला काँग्रेसकडून निषेध; तर मुनगंटीवारांनी दिलं 'हे' स्पष्टीकरण - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर जहरी टीका केली होती. त्याचे पडसाद मंगळवारी चंद्रपुरात उमटले. महिला काँग्रेसनं सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. यावर सुधीर मुनगंटीवार यांनीही पलटवार केला.

Lok Sabha Election 2024
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 10, 2024, 7:15 AM IST

Updated : Apr 11, 2024, 10:19 AM IST

चंद्रपूर Lok Sabha Election 2024 : काँग्रेसनं भावा-बहिणीला एका खाटेवर झोपवून अत्याचार केले, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. याविरोधात मंगळवारी शहरातील गांधी चौकात महिला काँग्रेसनं सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला. या वक्तव्यामुळे आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान महिला काँग्रेसच्या पदाधिकारी आक्रमक झाल्यानंतर भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

भावा-बहिणींच्या पवित्र नात्यावर असभ्य भाष्य : चंद्रपूर लोकसभेतील भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी चंद्रपुरात जाहीर सभा झाली. यावेळी जनतेला संबोधतांना चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा तोल सुटला. मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका करताना भाऊ-बहिणींच्या पवित्र नात्यावर असभ्य भाष्य केलं. याचे प्रतिसाद राज्यभर उमटत आहेत. मंगळवारी शहरातील गांधीं चौकात महिला काँग्रेसनं मुनगंटीवारांचा निषेध केला. "यापुढं बोलताना मुनगंटीवार यांनी खबरदारी घ्यावी," असा इशारा महिलांनी दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपुरात सभा : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ मोदी यांची सोमवारी चंद्रपुरात जाहीर सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उमेदवार अशोक नेते, आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांचं भाषण झालं. मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका करताना काँग्रेसवर खालच्या पातळीवर टीका केली. मुनगंटीवार यांच्या या भाषणाची क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ही क्लिप लोकांपर्यंत पोहोचल्यानं आता जिल्ह्यातून या भाषणाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात काँग्रेस आक्रमक : मुनगंटीवार यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेस आक्रमक झाली आहे. मंगळवारी चंद्रपूर शहरातील गांधी चौक येथे जिल्हा महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुनगंटीवार यांच्या वक्तव्याच्या जाहीर निषेध केला. "यापुढं बोलताना मुनगंटीवार यांनी खबरदारी खबरदारी घ्यावी," असा इशाराही दिला. या निषेध आंदोलनात संगीता अमृतकर, अश्विनी खोब्रागडे, शोभा वाघमारे, सुनंदा धोबे, सुनीता अग्रवाल, उषा धांडे, सकिना अन्सारी, विना खनके, चंदा वैरागडे आदी उपस्थित होत्या.

सुधीर मुनगंटीवारांनी दिलं स्पष्टीकरण : चंद्रपूरच्या सभेत लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या भाषणातील वक्तव्यावर त्यांना काँग्रेसचे हँडलर्स ट्रोल करत आहेत. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "आणीबाणीदरम्यान काँग्रेसने विरोधकांची माहिती काढण्यासाठी भावा-बहिणीवर अत्याचार केले. तो भाषणातील संदर्भ होता," असं त्यांनी स्पष्ट केलं. "लोकशाही पायदळी तुडवून- माध्यमांना कुलूपबंद करून- निरपराध नागरिकांना कारागृहात टाकल्यावर काँग्रेस लोकशाही रक्षणाची भाषा करते," असा टोलाही त्यांनी लगावला. "शीख दंगलीत निरपराध बांधवांना मारल्यावर हुकूमशाह कोण आहे, हे लक्षात येते," असंही ते म्हणाले.

हेही वाचा :

  1. मी देशासाठी लढतोय, 'देशी'साठी नाही; सुधीर मुनगंटीवारांची प्रतिभा धानोरकरांवर जोरदार टीका - Lok Sabha Election 2024
  2. मी देशासाठी लढतोय, 'देशी'साठी नाही; सुधीर मुनगंटीवारांची प्रतिभा धानोरकरांवर जोरदार टीका - Lok Sabha Election 2024
  3. वाघांच्या भूमीत पंतप्रधान मोदींचा आवाज, जाणून घ्या भाजपासाठी का महत्वाची आहे चंद्रपूर लोकसभा - Lok Sabha Election 2024

Last Updated : Apr 11, 2024, 10:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.