ETV Bharat / state

"रेशन दुकानात प्लास्टिकचा तांदूळ..."; तांदूळ दाखवत प्रणिती शिंदेंचा सरकारवर आरोप - Praniti Shinde On Plastic Rise - PRANITI SHINDE ON PLASTIC RISE

Praniti Shinde On Plastic Rise : राज्य सरकार प्लास्टिकचे तांदूळ वाटप करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केलाय. रेशन दुकानात गरिबांना धान्य मिळत नाहीये, असं म्हणत त्यांनी सरकारवर संताप व्यक्त केलाय.

Praniti Shinde On Plastic Rise
प्रणिती शिंदे यांचा आरोप (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2024, 5:03 PM IST

Updated : Sep 28, 2024, 5:16 PM IST

सोलापूर Praniti Shinde On Plastic Rise : विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात अळ्या आणि झुरळे आढळून आल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. ज्यावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका होत आहे. दरम्यान, काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात 'सॅम्पल' दाखवत सरकार प्लास्टिकचे तांदूळ वाटप करत असल्याचा आरोप केलाय.

रेशन दुकानात प्लास्टिक तांदूळ : पत्रकार परिषद घेत प्रणिती शिंदें यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलाय. "रेशन दुकानात नागरिकांना वेळेवर धान्य मिळत नाही, रेशन दुकानातील तांदूळ बनावट आहेत. गोरगरीब नागरिकांना सरकारकडून प्लास्टिकचा तांदूळ दिला जात आहे," असं सांगत प्रणिती शिंदेंनी भर पत्रकार परिषदेत प्लास्टिक तांदळाचे सॅम्पल दाखवले.

प्रणिती शिंदे यांचा आरोप (Source - ETV Bharat Reporter)

'लाडकी बहीण योजना' लाच स्वरूपात : 'लाडकी बहीण योजने'वरून प्रणिती शिंदे यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला."राज्य सरकार 'लाडकी बहीण योजने'च्या स्वरूपात लाच वाटप करत आहे. लाडक्या बहिणी नवऱ्याकडून पैसे घेऊन त्यांचं ऐकत नाही, तर महायुती सरकारचं काय ऐकणार?" असं प्रणिती शिंदे म्हणाल्या. राज्य सरकारविरोधात महाविकास आघाडी 1 ऑक्टोबर रोजी 'संग्राम मोर्चा' काढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

सरकारकडून जनतेची दिशाभूल : सोलापूर शहरातील होटगी रोड विमानतळावरून प्रणिती शिंदे यांनी सरकारवर संताप व्यक्त केला. "विधानसभा निवडणुकीपूर्वी विमानतळाचं उद्घाटन होत आहे. विमानतळ तर आधीपासूनच आहे. जनतेची दिशाभूल करत सरकार विमानतळाचं उद्घाटन करत आहे. सोलापूर शहरातील होटगी रोड विमानतळावर नाईट लँडिंगची व्यवस्था नाही, त्याबाबत विमान कंपन्यांशी बोललं जात नाही, केवळ दिशाभूल करण्याचं काम सरकार करत आहे," अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली.

हेही वाचा

  1. आमदार सुनील टिंगरे यांचा पोर्शे प्रकरणाशी संबंध नाही, सुनील तटकरेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर - Porsche Crash Case
  2. "जामनेरला मुक्कामी राहून, मला पाडून दाखवा", गिरीश महाजनांचं एकनाथ खडसेंना ओपन चॅलेंज - Girish Mahajan
  3. "...ही साधीसुधी माणसं नाही", पंतप्रधान मोदींनी गांधी कुटुंबावर केलेल्या टीकेला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर - Sharad Pawar

Last Updated : Sep 28, 2024, 5:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.