ETV Bharat / state

Direct Pipeline : थेट पाईपलाईनवरून भाजपा खासदार धनंजय महाडिक अन् काँग्रेस आमदार सतेज पाटलांमध्ये वार-पलटवार - Kolhapur city Direct Pipeline

Kolhapur city Direct Pipeline : थेट पाईपलाईन योजनेवरून लोकसभेच्या तोंडावर काँग्रेस आमदार सतेज पाटील भाजपा खासदार धनंजय महाडिक यांच्यात चांगलीच टीका टिप्पणी सुरू आहे. महाडिक यांचा या योजनेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. तर, महाडिकांनी या योजनेला बदनाम करू नये असं म्हणत यामध्ये काहीही गैरव्यवहार दाखवून द्यावा असं आव्हान (Congress MLA Satej Patil) आमदार सतेज पाटलांनी दिलं आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 13, 2024, 11:05 PM IST

Updated : Mar 14, 2024, 12:07 PM IST

पत्रकार परिषद

कोल्हापूर Kolhapur city Direct Pipeline : काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या थेट पाईपलाईन योजनेवरून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील पुन्हा एकदा आमने-सामने आहेत. आज (MP Dhananj Mahadik ) खासदार महाडिक यांनी पाईपलाईन योजनेच्या प्रकल्पाची पाहणी केली. या योजनेत आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याची टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे याबाबत तक्रार करणार असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं. तर, पाईपलाईन योजनेचा विषय कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा आहे. मात्र, 12-13 वर्षानंतर खासदार महाडिक यांनी भेट दिली याचं मी स्वागत करतो. पाईपलाईन योजना किमान पूर्ण झाल्यावर ते गेले आणि त्यांनी कामाचं अवलोकन केलं हे महत्त्वाचं असा टोलाही त्यांनी लगावलाय. मात्र, यामध्ये कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. कोणतीही चौकशी करा काहीही निष्पन्न होणार नाही. ज्या रुईकर कॉलनी भागात खासदार राहतात त्या भागात (दि. 10 नोव्हेंबर) पासून थेट पाइपलाइनचं पाणी आहे. मग, योजनेवरून राजकारण करत थेट पाईपलाईन योजनेची बदनामी का करता, असा खडा सवाल काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला आहे.

'योजनेला बदनाम करण्याचं राजकारण खासदार महाडिकांनी करू नये' : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना गेल्या 13 वर्षांपासून सुरू होती. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुईखडी येथे हे पाणी पोहोचल्यानंतर आमदार पाटील यांनी या ठिकाणी आंघोळ केली होती, याचा संदर्भ देत खासदार महाडिकांनी आमदारांनी एकट्यानेच आंघोळ केल्याची टीका केली होती. मुळात थेट पाईपलाईन योजना ही पुईखडीपर्यंत पाणी आणण्याची योजना आहे. शहरातील अंतर्गत पाणीपुरवठ्यामध्ये होणारे अडथळे हे अमृत योजनेचा भाग आहेत. इतकं अज्ञान ही दोन टर्म खासदार म्हणून काम करत असलेल्या महाडिकांचं असू नये, याची कीव येते अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी खासदार महाडिक यांचा समाचार घेतला. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत सर्वे केला आहे. या सर्व्हेत थेट पाईपलाईन योजनेचे श्रेय माझ्याकडे जात असल्याने या योजनेला बदनाम करण्याचं राजकारण खासदार महाडिकांनी करू नये असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं.

'मग केंद्रातील भाजपा सरकारने निधी कसा दिला' : काळम्मावाडी धरणातून थेट कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या योजनेत 60 टक्के निधी केंद्र सरकारने दिला आहे. खासदार महाडिक यांना आताच योजना पूर्ण नसल्याची उपरती झाली. मात्र, योजनेचा 60 टक्के निधी देताना केंद्रातील भाजपा सरकारने याचा विचार केला नाही का? लोकांपर्यंत पाणी पोहोचलं नाही असं तुम्ही म्हणता मग अमृत योजनेचं काम राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या बंधूकडे आहे. अमृत योजनेच्या कामाचा आढावाही खासदारांनी तत्काळ घ्यावा असं आव्हान आमदार पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांना दिलं आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट पाईपलाईन योजनेवरून भाजपाचे खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.

हेही वाचा :

1 Union Minister Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हॅट्रिकसाठी सज्ज, भाजपाच्या दुसऱ्या यादीत 'यांना' संधी

2 Bharat Jodo Nyaya Yatra : राहुल गांधी यांचं मालेगावात जोरदार स्वागत! जाहीर सभेतून गांधींची मोदींवर जोरदार टीका

3 Satara Accident News : साताऱ्यातील व्यावसायिकाच्या विवाहित मुलीचा अमेरिकेतील भीषण अपघातात जागीच मृत्यू

Last Updated : Mar 14, 2024, 12:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.