ETV Bharat / state

"आर्थिक व्यवहार केलात तरच टेंडर मिळेल"; पालिकेतील अधिकाऱ्याकडून महिला बचत गटांकडे पैशाची मागणी - Mumbai Municipal Corporation - MUMBAI MUNICIPAL CORPORATION

Mumbai Municipal Corporation : शालेय पोषण आहार विभागात मुख्य लिपिक पदावर कार्यरत असलेले दारासिंग बमनावत हे महिला बचत गटांकडून पैसे मागत असल्याचा आरोप राम शतालवार आणि एस. एस. खान यांनी केला आहे. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडे रितसर लेखी तक्रार देखील त्यांनी केली आहे.

Mumbai Municipal Corporation
Mumbai Municipal Corporation (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 6, 2024, 12:56 PM IST

मुंबई Mumbai News : पोषण आहाराच्या विविध योजना शासनाकडून राबवल्या जात आहेत. मुलांना पोषण आहार देण्याचं काम बृहन्मुंबई महानगरपालिकेनं विविध महिला बचत गटांना देण्याचं ठरवलं असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे राबवल्या जात आहेत. मात्र पालिकेतील दारासिंग बमनावत हे अधिकारी महिला बचत गटांकडून पैशांची मागणी करत असल्याची गंभीर बाब अनेक तक्रारींवरून समोर आली आहे.

पैसे मागत असल्याचा आरोप : बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आपल्या परिक्षेत्रातील शाळांना पोषण आहार पुरवठा करण्याकरता मध्यवर्ती खरेदी खाते या विभागामार्फत निविदा अर्ज मागवण्यात आले आहेत. शालेय पोषण आहार विभागात पूर्व शिक्षणाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक आणि मुख्य लिपिक पदावर कार्यरत असलेले दारासिंग बमनावत हे महिला बचत गटांकडून निविदा प्रक्रियेत पैसे मागत असल्याचा आरोप राम शतालवार आणि एस. एस. खान यांनी केला आहे. याबाबत त्यांनी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडे रितसर लेखी तक्रार देखील केली आहे.

आर्थिक व्यवहार केलात तरच टेंडर मिळेल : गरीब होतकरू महिला संस्था आणि बचतगट यांनी निविदा अर्ज भरले आहेत. या सर्व महिलांना निविदा प्रक्रियेत निवड होईल, अशी अपेक्षा असताना दारासिंग बमनावत हे शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनात तसंच शालेय पोषण आहार विभागाच्या कार्यालयात बसून महिलांना आपल्या पदाचा गैरवापर करून पैशाची मागणी करत असल्याची तक्रार तक्रारदारांनी केली आहे. "तुम्ही माझ्याशी आर्थिक व्यवहार केलात तरच टेंडर मिळेल, अन्यथा मी टेंडर तुमच्या नावे पास करणार नाही. मी शालेय पोषण आहार विभागात नसलो तरीही सर्व कामकाज माझ्या सांगण्यावरच होणार आणि सर्वकाही मीच पाहतो." असं वक्तव्य करून दारासिंग बमनावत हे महिलांची पिळवणूक करत असल्याचा उल्लेख या पत्रात तक्रारदारांनी केला आहे. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी यापूर्वी देखील शिक्षण विभागाला प्राप्त झाल्याचं समजतं.

ठराविक संस्थांनाच काम देण्याचा आरोप : या संदर्भात आम्ही एस. एस. खान यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितलं, "महानगरपालिकेच्या चौकशी विभागानं दारासिंग बमनावत यांच्या बदलीची शिफारस केली होती. या अधिकाऱ्याची बदली होऊनही बमनावत हे बदली ठिकाणी रुजू झालेले नाहीत. इतकंच नाही तर त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी होऊनही त्यांनी शिक्षण अधिकारी दालनात बसून ठराविक संस्थांनाच काम देण्याचा घाट घातला आहे. त्यामुळं दारासिंग बमनावत यांची चौकशी करुन त्यांना शिक्षण विभागातून काढून इतर विभागात पाठवावं," अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. सोबतच बमनावत यांना निविदा प्रक्रियेपासून दूर ठेवल्यास महिलांना न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया राम शतालवार आणि एस. एस. खान यांनी दिली आहे.

या संदर्भात आम्ही शिक्षणाधिकारी तसंच महानगरपालिका उपायुक्त चंदा जाधव यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितलं, "या संदर्भातील तक्रार माझ्याकडे प्राप्त झाली आहे. मात्र कारवाई संदर्भातील तपशील सध्या माझ्याकडे नाहीत. सध्या आमचे सर्व कर्मचारी फिल्डवर आहेत. त्यामुळं सोमवार नंतरच आम्ही याबाबत माहिती देऊ शकतो."

हेही वाचा

  1. पुढील 24 तासांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी - Maharashtra Weather Forecast
  2. ज्ञानेश्वर खांडे मारहाण प्रकरणातील आरोपी कुंडलिक खांडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावर आज होणार सुनावणी - Judicial Custody To Kundlik Khande
  3. कसारा स्थानकाजवळ पंचवटी एक्स्प्रेसचं कपलिंग तुटलं, इंजिन डबे सोडून गेलं पुढं - Panchavati Express

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.