ETV Bharat / state

"शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना आंतरराष्ट्रीय पातळीवर मान खाली घालणारी"; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल - Chhatrapati Shivaji Maharaj Statue - CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ STATUE

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. या घटनेवरुन राज्यात खूप राजकारण झालं. आता हा विषय मुंबई उच्च न्यायालयात गेलाय. याबाबत एक याचिका दाखल करण्यात आली.

bombay hc Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse
मुंबई उच्च न्यायालय, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (Source : ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2024, 8:56 PM IST

Updated : Aug 29, 2024, 9:03 PM IST

मुंबई Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा 26 ऑगस्टला अचानक कोसळला. या दुर्घटनेमुळं आंतरराष्ट्रीय पातळीवर मान खाली घालावी लागण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा करत या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अभियंत्यांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.

पुतळा कोसळल्याचं राजकारण : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांसह असंख्य नेत्यांच्या उपस्थितीत डिसेंबर 2023 मध्ये उभारण्यात आलेला हा पुतळा अवघ्या 9 महिन्यांतच म्हणजे 26 ऑगस्टला कोसळला. त्यामुळं त्याला राज्य सरकार पूर्णतः जबाबदार आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आलाय. केतन तिरोडकर यांनी ही फौजदारी जनहित याचिका दाखल केली. हा पुतळा घाईघाईत उभारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं : शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यानं आपली कातडी बचावण्यासाठी या पुतळ्याच्या डिझाईनर व स्ट्रक्चरल कन्सल्टंट यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला. पुतळा उभारणाऱ्या नौदल अधिकाऱ्यांना, सा.बां.वि. चे अधिकारी व इतरांना त्यांनी यामधून वगळले. या वादग्रस्त व कातडीबचाव गुन्हा नोंदवण्याच्या प्रकाराबद्दल आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. मात्र, त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही, असा दावा तिरोडकर यांनी याचिकेत केला.

वाऱ्यांचा विचार न करता केलं काम : 'बेजबाबदार बांधकाम व्यावसायिक ज्याप्रमाणे अनधिकृत इमारती किंवा चाळी बांधतो' तसं पुतळा उभारणाऱ्या आपल्या अभियंत्यांमागे राज्य सरकार ढाल 'बनून' उभे राहण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही या याचिकेत करण्यात आलाय. जून 2023 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत पुतळा बनवण्यात आला. मालवण येथील प्रति तास 45 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा विचार न करता हे काम करण्यात आल्याचा आरोप तिरोडकर यांनी याचिकेत केला.

उपाययोजना केल्या नाहीत : मालवण येथील स्थानिक नागरिकांनी पुतळा उभारणीत वापरण्यात आलेले नट व बोल्ट गंजल्याच्या परिस्थितीबाबत ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती दिली होती. मात्र, त्यांनी त्यावर कोणतीही उपाययोजना न करता केवळ ही माहिती मेलद्वारे डिझाईनर व स्ट्रक्चरल कन्सल्टंट यांना पाठवली व आपली जबाबदारी पूर्ण झाल्याचा समज त्यांनी करुन घेतला, याकडे तिरोडकर यांनी याचिकेद्वारे लक्ष वेधलं. या जनहित याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -

  1. राजकोट किल्ला पुतळा दुर्घटना प्रकरणी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मागितली माफी, पण कुणाची? - CM Eknath Shinde Apology
  2. "...फडणवीसांना लाज वाटली पाहिजे" संजय राऊतांची खोचक टीका; म्हणाले, बाळासाहेब महाराष्ट्राचे बाप! - Fadnavis should be ashamed
  3. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण: मुख्यमंत्र्यांनी गठीत केली संयुक्त तांत्रिक समिती, नौदलाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश - Chhtrapati Shivaji Maharaj Statue

Last Updated : Aug 29, 2024, 9:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.