ETV Bharat / state

विदेशातून आलेल्या प्रवाशानं 11 कोटींचं कोकेन लपविण्यासाठी लढवली अनोखी शक्क्ल; गुपित उघडताच डीआरआयनं घेतलं ताब्यात - Cocaine of 11 Crore Seized - COCAINE OF 11 CRORE SEIZED

Cocaine of 11 Crore Seized : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन एका आफ्रिकन ड्रग्ज तस्कराला अटक करण्यात आलीय. महसूल गुप्तचर संचालनालयानं या तस्कराच्या पोटातून कोकेनच्या 74 कॅप्सूल जप्त केल्या आहेत. त्याची किंमत 11 कोटी रुपये आहे. आठवडाभरातील ही दुसरी घटना असल्याचं सांगण्यात येतंय.

विदेशातून आलेल्या प्रवाशानं 11 कोटींचं कोकेन लपविण्यासाठी लढवली अनोखी शक्क्ल; गुपित उघडताच डीआरआयनं घेतलं ताब्यात

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 1, 2024, 10:04 AM IST

मुंबई Cocaine of 11 Crore Seized : सिएरा लिओन येथून मुंबईत आलेल्या प्रवाशानं पोटात लपवून ठेवलेलं 11 कोटींचं कोकेन महसूल गुप्त वार्ता संचालनालयाने (डीआरआय) जप्त केलं. जे. जे. च्या डॉक्टरांनी त्या प्रवाशाच्या पोटातून कोकेन असलेल्या कॅप्सूल बाहेर काढल्या.

सापळा रचून घेतलं ताब्यात : परदेशातून एक जण ड्रग घेऊन येणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे डीआरआयच्या पथकानं तीन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सापळा रचून एका प्रवाशाला ताब्यात घेतलं. या प्रवाशाची कसून चौकशी केल्यावर त्यानं पोटातून कोकेन आणल्याची डीआरआयला कबुली दिली. यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं. न्यायालयाच्या आदेशानंतर त्याला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जे.जे. रुगणालयातील डॉक्टरांनी त्याचा पोटाचा एक्सरे काढला. यात त्याच्या पोटात काही असल्याचं आढळून आलं.

पोटातून काढल्या 74 कोकेन कॅप्सूल : रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या प्रवाशाच्या पोटातून 74 कोकेनच्या कॅप्सूल बाहेर काढल्या. त्या कॅप्सूलमध्ये 1108 ग्रॅम कोकेन होतं. जप्त केलेल्या कोकेनची किंमत सुमारे 11 कोटी रुपये इतकी आहे. कोकेन तस्करीप्रकरणी त्या प्रवाशाविरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आलीय. तसंच त्याला कोकेन तस्करीच्या मोबदल्यात काही रक्कम मिळणार होती. त्या प्रवाशाला ते कोकेन कोणी दिलं? याचा तपास डीआरआयचं पथक करत आहे.

आठवडाभरातील दुसरी घटना : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोकेनसह पकडल्या गेलेल्या सिएरा लिओनियन नागरिकाचा सात दिवसांतील हा दुसरा प्रकार आहे. यापूर्वी 24 मार्च रोजी आफ्रिकन देशातील एका महिलेला 19.79 कोटी रुपयांच्या 1,979 ग्रॅम कोकेनसह अटक करण्यात आली होती. तिनं शूज, मॉइश्चरायझर आणि शॅम्पूच्या बाटल्या आणि अँटीपर्स्पिरंटमध्ये कोकेन लपवून आणलं होतं.

हेही वाचा :

  1. डीआरआयची मोठी कारवाई; शरीरात लपवून आणल्या कोकेनच्या 'इतक्या' कॅप्सूल, व्हेनेझुएलाच्या प्रवाशाला ठोकल्या बेड्या
  2. भारतीय वंशाच्या जोडप्याला ब्रिटनमध्ये 33 वर्षांची शिक्षा, कोकेन तस्करीकरिता सुरू केली होती कंपनी
  3. Lalit Patil Drugs Case : ललित पाटीलचे मराठवाडा कनेक्शन; कच्चा माल घेण्यासाठी पसरले जाळे, ससूनमधून पळाल्यावर थांबला संभाजीनगरात?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.