ETV Bharat / state

'धनुष्यबाण'वरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर सोडला 'बाण'; म्हणाले, रामाचा.... - CM Eknath Shinde

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 18, 2024, 8:31 AM IST

Updated : Aug 18, 2024, 12:03 PM IST

CM Eknath Shinde : विधानसभा निवडणूकीपूर्वी पुण्यातील हडपसर परिसरात प्रभू श्रीरामांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसंच विरोधकांना धारेवर धरलं.

CM Eknath Shinde
उद्धव ठाकरे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Pic Source : ETV Bharat File Photo)

पुणे CM Eknath Shinde : धनुष्यबाणावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. "प्रभू रामाच्या हातामध्ये काय आहे तर धनुष्यबाण आणि आता धनुष्यबाण कुणाकडं आहे? आपल्याकडं. जो नहीं राम का, वो नही काम का," असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली. पुण्यातील हडपसर येथील हांडेवाडी परिसरात शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद भानगिरी यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या श्रीरामाच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण (ETV Bharat Reporter)

पंतप्रधान मोदींनी स्वप्न पूर्ण केलं : "अयोध्यामध्ये राम मंदिर व्हावं, अशी तमाम राम भक्तांची इच्छा आणि स्वप्न होतं. तसंच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच देखील हेच स्वप्न होतं. बाळासाहेब म्हणायचे, 'मला एक दिवस पंतप्रधान करा, मी अयोध्येमध्ये राम मंदिर बांधतो आणि काश्मीरमधील 360 कलम हटवतो'. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येमध्ये राम मंदिर बांधत आपल्या सर्वांचं स्वप्न साकार केलं," असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं.

विरोधकांना इशारा : "काही लोकांना वाटायचं की मंदिर बनणार नाही. मंदिर वही बनायेंगे, तारीख नही बताएंगे असं म्हणत टिंगल उडवायचे. परंतु मंदिर बनलं आणि 360 कलम देखील रद्द करण्यात आलं. प्रभू श्रीराम आणि अयोध्या हा आपल्या अस्मितेचा विषय आहे. तसंच श्रद्धेचा देखील विषय आहे. काही लोकांनी त्याचा राजकीय विषय केला. त्यांना योग्य तो धडा शिकवायचा आहे," असा इशारा एकनाथ शिंदेंनी विरोधकांना दिला.

राज्यातील तरुणांकरिता अप्रेंडशिप आणि इंटर्नशिप : "'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा प्रारंभ पुण्यात झाला. रक्षाबंधनापूर्वी या योजनेच्या माध्यमातून एक कोटी चार लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. आज विरोधक म्हणत आहेत की, लाडकी बहीण झाली. मात्र, लाडक्या भावाचं काय? तर लाडक्या भावांना देखील या राज्यात पहिल्यांदा अप्रेंडशिप आणि इंटर्नशिप देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. तसंच ज्येष्ठ नागरिकांना देखील 'वयोश्री योजना' आणली असून त्यांच्या खात्यात देखील या योजनेअंतर्गत तीन हजार रुपये येणार आहेत," अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.

हेही वाचा

  1. गेल्या दोन वर्षात राज्यात शिंदेंचं इंजिन दुप्पट वेगानं धावलं; ठाकरेंपेक्षा दुप्पट फाईल्सचा निपटारा तर तिप्पट कामांना मंजुरी - Maharashtra CM Sign Files
  2. लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्यांना जोड्यानं मारा - मुख्यमंत्री - Majhi Ladki Bahin Yojana

Last Updated : Aug 18, 2024, 12:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.