ETV Bharat / state

'आम्ही ग्राऊंडवर काम करणारे कार्यकर्ते, ठाकरे यांना टीका करण्यापेक्षा दुसरे काही काम आहे का?'; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल - Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 : विदर्भातील जनतेनं तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून मोदी यांना गॅरंटी दिलेली आहे. रामटेक, यवतमाळ- वाशिम शिवसेना मोठ्या फरकानं आणि बहुमतानं जिंकेल. विदर्भात अतिशय उत्तम वातावरण असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) यांनी येथील विमानतळावर माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. मुख्यमंत्री आज (7 मार्च) रोजी विदर्भ दौऱ्यावर आहेत.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 7, 2024, 6:07 PM IST

मुख्यमंत्री

नागपूर Lok Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भ दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. "त्यांना दुसरं काही काम आहे का?" असा सवाल उपस्थित करत "फक्त घरात बसून ऊंटावरुन शेळ्या हाकता येत नाहीत. त्याला प्रत्यक्ष फिल्डवर जावं लागतं. त्यानुसार आम्ही काम करत आहोत. प्रत्येक नेत्यासह, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री हे ग्राउंड लेवलला काम करणारे कार्यकर्ते आहोत. ( Lok Sabha election) त्यामुळे त्यांनी दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहण्यापेक्षा स्वत:च्या घरात काय जळतंय ते पहावंठ असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना लगावला आहे.

'सर्व जागा महायुतीचे उमेदवार जिंकतील' : "अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद विदर्भामध्ये महायुतीला आहे. मी रामटेकचे उमेदवार राजू पारवे तसंच, नागपूरचे महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी यांचं नामांकन अर्ज भरण्यासाठी नागपूरला आलो होतो. विदर्भातील सर्व जागा महायुतीचे उमेदवार जिंकतील, असं चांगले वातावरण आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक चित्र लवकरच स्पष्ट होईल."

'आदित्य ठाकरेंना दुसरं काही काम आहे का?' : उमेदवारीबाबतचा घोळ दोन-तीन दिवसांमध्ये स्पष्ट होईल. दरम्यान, काल मुंबईत शिवसेना पदाधिकारी बैठकीत शिवसेनेनं अधिक जागा सोडू नये, अशी भावना व्यक्त केली होती. यासंदर्भात छेडले असता "निवडणूक काळात पदाधिकाऱ्यांच्या बैठका या सातत्यानं होतच असतात. पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही निवडणूक लढवत आहोत. आदित्य ठाकरे यांना टीका करण्यापेक्षा दुसरे काही काम आहे का?" असा टोला त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा :

1 एकनाथ खडसे करणार 'घरवापसी', खडसेंच्या स्वगृही परतण्याबाबत काय म्हणाले सत्ताधारी-विरोधक? - Eknath Khadse

2 युट्युब चॅनेलचे सबस्क्राईब वाढविण्याकरिता शिक्षकानं 'असे' केलं कृत्य, पत्नीसह तुरुंगात झाली रवानगी - YouTube Channel Monetize

3 निवडणूक आयोगाचा आयडी हॅक करुन आपच्या रॅलीचा अर्ज रद्द; 2 जणांना अटक तर एसडीएम निलंबित - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.