ETV Bharat / state

त्यांचा जन्म होतो चौकात; जर भविष्यात आले गाडीच्या चाकात, तर बोला कोण जबाबदार ? - Amravati Wandering People - AMRAVATI WANDERING PEOPLE

Amravati Wandering People : अमरावती शहरातील भटक्या जमातीच्या लोकांमुळं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. रस्त्यावर थांबलेल्या वाहनचालकांनाही या मुलांकडून पैशांसाठी त्रास दिला जातो. अनेकदा ही मुलं दुचाकीला लटकवलेली पिशवी तसंच ऑटोरिक्षातील प्रवाशांचं सामान घेऊन पळ काढतात.

Amravati Wandering People
भटक्या जमातीच्या लोकांमुळं त्रास (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2024, 9:34 PM IST

Updated : Sep 21, 2024, 11:03 PM IST

अमरावती Amravati Wandering People : अमरावती शहरातील राजकमल चौक, जयस्तंभ चौक, गाडगे नगर, शेगाव नाका या सिग्नलवर दुचाकी किंवा चारचाकी कोणतंही वाहन उभं असताना दोन वर्षापासून ते सात वर्षे वयोगटातील लहान मुलं वाहन चालकांकडून एखादा रुपया मिळेल, या आशेनं उभी असतात. अनेकदा ही मुलं पैसे द्याच, असा हट्ट देखील करतात. चौकातच जन्मलेली ही मुलं गाडीच्या चाकाखाली आली तर जबाबदार कोण? प्रशासन खरोखरच अशा दुर्दैवी घटनेची वाट पाहत आहे का? रस्त्यावर भटकणाऱ्या आणि चौकात कायमस्वरूपी बसणाऱ्या अनेक कुटुंबातील नागरिकांच्या समस्यांवर काही तोडगा निघेल का? या भटक्या लोकांच्या अडचणी, समस्या आणि त्यांच्या भावना कोणी जाणून घेणार का? यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.

नेमकी परिस्थिती काय ? : 'स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती' हे अमरावती महापालिकेचं ब्रीदवाक्य आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून अमरावती महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील उड्डाणपुलाखाली भटक्या समाजातील अनेक कुटुंबांनी ठाण मांडलाय. महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोरील परिसराबरोबरच महत्त्वाचा राजकमल चौक, जयस्तंभ चौक, पंचवटी चौक, शेगाव नाका हा संपूर्ण परिसर म्हणजे भटक्या लोकांचं हक्काचं विश्व. शहरातील महिला महाविद्यालय आणि नेहरू मैदान ही त्यांची हक्काची ठिकाणं. महिला महाविद्यालय, नूतन कन्या शाळा, न्यू हायस्कूल मेन ही शैक्षणिक केंद्र देखील देखील या भटक्या जमातींनी वेढलीय. विद्यार्थ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत सर्वांनाच अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. ट्रॅफिक सिग्नलच्या वेळी रस्त्यावर थांबलेल्या वाहनचालकांनाही या मुलांकडून पैशांसाठी त्रास दिला जातो. अनेकदा ही मुलं दुचाकीला लटकवलेली पिशवी तसंच ऑटोरिक्षातील प्रवाशांचं सामान घेऊन पळ काढतात.

भटक्या जमातीच्या लोकांमुळं होतोय त्रास (ETV Bharat)

वाहनचालकांकडून करतात पैशांची मागणी : शहरातील मुख्य चौकातील उड्डाणपुलाखाली भटक्या जमातीची कुटुंबं दिवसभर ठाण मांडून बसतात. या कुटुंबातील लोक परिसरात फिरन खाद्यपदार्थ जमा करतात तर कधी-कधी उड्डाण पुलाखाली चुली करून मांस शिजवतात. भीक मागणं, दारू पिणं आणि एकमेकांशी वाद घालणं हाच या लोकांचा दिनक्रम. रात्रीच्या वेळी ही लोक राजकमल चौक, जयस्तंभ चौक लगतच्या रहिवासी भागात तसंच शहरातील विविध रस्त्यांवर भटकंती करून प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टिकच्या बाटल्या, लोखंड, टिन, टप्पर असं सर्व साहित्य गोळा करून विकतात. साहित्य विकून मिळणाऱ्या पैशातून ते आपल्या गरजा भागवतात. काही कुटुंबं रस्त्यावर फुगे वगैरे विकून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतात. हे विविध उद्योग हे सर्व लोक करत असले, तरी त्यांची मुलं चौकात वाहनचालकांकडून पैशांची मागणी करतात.

व्यावसायिकांना टेन्शन : महत्त्वाच्या चौकातील हॉटेलमध्ये येणाऱ्या लोकांकडे ही लोक आम्हाला पण काही खाऊ घाला, अशी थेट मागणी करतात. हॉटेल चालकांनाही दिवसभर या लोकांचा त्रास सहन कराना लागतो. चौकात असणार्‍या टीव्ही शोरूमसमोर या समाजातील मुलं आणि मोठे मंडळी ठाण मांडून जे काही सुरू असतं ते पाहण्याची मजा लुटतात. या मुलांमुळे आपल्या शोरूमचा रस्ता बंद होतो. कुणी ग्राहक येत नाही, यामुळे वैतागलेले व्यावसायिक दिवसातून 25 - 50 वेळा या मुलांना पिटाळून लावण्यासाठी मोठी कसरत करतात. भरधाव वाहतूक असणाऱ्या रस्त्यांवर ही मुलं चोर पोलीस, हात लावणी असे खेळ खेळतात. कधी-कधी भर चौकात क्रिकेटही खेळतात.

राजकीय आंदोलन, मोर्चे, मिरवणुकीत धमाल : शहरातील महत्त्वाचं चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजकमल चौकात अनेकदा विविध राजकीय पक्षांकडून आंदोलनं, निदर्शनं होत असतात. या काळात भटक्या जमातीतील अनेक स्त्री-पुरुष दारू पितात आणि मधात आनंद करतात. राजकीय आंदोलनासाठी तैनात असलेल्या पोलिसांना अनेकदा आंदोलकांपेक्षा या लोकांवरच बारीक नजर ठेवावी लागते. चौकातून निघणाऱ्या धार्मिक आणि सामाजिक मिरवणुकांमध्ये दारू पिऊन नाचणं धिंगाणा घालणं, पुरुषांसोबतच महिलांकडून देखील केलं जातं.

प्रशासनाची भूमिका काय : अमरावती शहरात भटक्या कुटुंबांची वाढती संख्या हा सर्वात गंभीर प्रश्न आहे. शहरात एखादा महत्त्वाचा कार्यक्रम असेल किंवा नवरात्रीसारखा मोठा सण असेल, तर प्रशासन या कुटुंबांना चौकातून उचलून राजकमल चौकाजवळील नेहरू मैदानात हलवायचे. ही कुटुंबं दोन ते चार दिवस नेहरू मैदानात मुक्कामी असली, तरी पुन्हा उड्डाणपुलाखाली येण्यास सुरुवात होते.

अधिकारी काय म्हणतात : महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं की, "ही समस्या अत्यंत गंभीर असल्यानं लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे. येत्या काही दिवसांत याबाबच बैठक घेतली जाणार. ही कुटुंबं कायमस्वरूपी कशी जातील, यावरही तोडगा काढला जाईल."

"शहरातील मुख्य चौकात राहणाऱ्या या कुटुंबांचा प्रश्न गंभीर आहे. महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीनं जो काही निर्णय घेतला जाईल, त्याची अंमलबजावणी आम्ही निश्चित करू," असं पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेडी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना स्पष्ट केलं.

भटक्या जमातीच्या कुटुंबाची नेमकी अडचण काय ? : "अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या भटक्या जमातीच्या कुटुंबाच्या समस्यांबाबत प्रशासन आणि नागरिकांनी कधीच सकारात्मकदृष्ट्या विचार केला नाही. आमच्या लोकांच्या समस्या समजून घेतल्यास आणि त्यांचं योग्य पुनर्वसन केल्यास समस्या वाटणाऱ्या या भटक्या जमातीमुळं बकाल दिसणारी शहराची परिस्थिती निश्चित सुधारेल," अशी भावना निरादार फासेपारधी विकास संस्थेचे सचिव विक्की हुंक्या पवार यांनी व्यक्त केली. "या लोकांना राजकमल चौक, गाडगे नगर या मुख्य भागातून हद्दपार करायचं असेल, तर त्यांचं योग्य ठिकाणी पुनर्वसन करून त्यांना काही रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत विचार करावा. या कुटुंबातील मुलांना प्राथमिक शिक्षणाची सुविधा मिळावी," अशी अपेक्षाही विकी हुंक्या पवार यांनी व्यक्त केली.

हेही वाचा

  1. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच होणार, उच्च न्यायालयाचे निर्देश - Mumbai University Senate Election
  2. "मंदिरांना देणगी देणं महत्त्वाचं की मुलांचं शिक्षण महत्त्वाचं", हायकोर्टाचे राज्य सरकारवर ताशेरे; जाणून घ्या काय आहे प्रकरण... - High Court Slam Government
  3. आंबेडकरांकडून तिसऱ्या आघाडीची घोषणा, यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाला मदत नाही - Prakash Ambedkar

Last Updated : Sep 21, 2024, 11:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.