अमरावती Zero Shadow Day : अमरावती शहरात आज दुपारी बारा वाजून 14 मिनिटानंतर चिमुकल्यांनी शून्य सावली अनुभवली. महाराष्ट्र विज्ञान परिषदेच्या वतीनं अमरावती शहरातील भीम टेकडी परिसरात शून्य सावली दिनानिमित्त चिमुकल्यांसाठी खास मार्गदर्शन तसंच शून्य सावलीच्या अनुभवासाठी विशेष आयोजन करण्यात आलं.
वर्षातून दोन वेळा शून्य दिवस : 23.50° च्या पट्ट्यामध्ये जगात काही ठिकाणी शून्य सावली वर्षातून दोन वेळा शून्य दिवस अनुभवता येते, अशी माहिती मराठी विज्ञान परिषदेचे अमरावती जिल्हा प्रमुख प्रवीण गुल्हाने यांनी ई'टीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं. भारतात दिल्लीसह उत्तरेकडील शहर तसंच दक्षिणेकडील भागात असा अनुभव कधीही घेता येत नाही. सूर्याचा उत्तर तसंच दक्षिणायन असा मार्ग पृथ्वीच्या 23.50 अंश दक्षिण आणि उत्तरेकडं असतो. कर्कवृत्त आणि मकरवृत्त यादरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो. तेव्हा शून्य सावली दिवस अनुभवता योतो. आज अमरावतीत शून्य सावली दिवस चिमुकल्यांना अनुभवता आला. असाच शून्य सावली दिवस जूनमध्ये देखील अनुभवता येणार आहे. मात्र, ढगाळ वातावरण असल्यास या दिवसाचा अनुभव घेता येणार नाही, असं प्रवीण गुल्हानं म्हणाले.
महाराष्ट्रात तीन ते 31 मे दरम्यान खगोलीय अनुभव : शून्य सावली दिवस हा आगळावेगळा खगोलीय अनुभव महाराष्ट्रात तीन ते 31 मे दरम्यान अनुभवता येणार आहे. राज्यात सिंधुदुर्ग ते नंदुरबार जिल्ह्याच्या सीमा या दक्षिण आणि उत्तर सीमा आहेत. 15 ते 22 अक्षांश उत्तर दरम्यान जी शहरे येतात, तिथं तीन मे पासून 31 मे दरम्यान शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी येथे तीन मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता आलाय. तर, धुळे जिल्ह्यात 31 मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे. भारतात मध्य प्रदेशातील भोपाळ जवळ 23.50° वरून कर्कवृत्त गेलं आहे. त्यामुळं शून्य सावलीचा हा शेवटचा भूभाग आहे. भारतात 23.50 अंशाच्या पुढं दिल्ली, हिमाचल, काश्मीर अशा ठिकाणी कुठंही शून्य सावली दिवस अनुभवता येत नाही, असं देखील प्रवीण गुल्हानं यांनी सांगितलं.
हे वाचलंत का :