ETV Bharat / state

लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्यांना जोड्यानं मारा - मुख्यमंत्री - Majhi Ladki Bahin Yojana - MAJHI LADKI BAHIN YOJANA

Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आज पुण्यात शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाना साधलाय. लाडक्या बहिणीच्या हिताच्या आड कोणी आलं तर गाठ माझ्याशी आहे, असा वार त्यांनी विरोधकांवर केलाय.

Chief Minister Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 17, 2024, 7:49 PM IST

Updated : Aug 17, 2024, 8:20 PM IST

पुणे Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पुण्यात लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी माझ्या बहिणींशी संवाद साधून स्वातंत्र्यदिन साजरा केला. अनेक भगिनींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. सरकार स्थापन झाल्यापासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हे सरकार पडेल, असं विरोधक वारंवार सांगत आहेत. पण भगिनी आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादानं सरकार मजबूत झालय. माझ्या बहिणींच्या हिताच्या मार्गात कोणी येत असेल, तर व्यासपीठावर बसलेल्या भावांसोबत त्यांची गाठ आहे, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिलाय.

एकनाथ शिंदे, निलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासून विरोधक सरकारवर टीका करत आहेत. पैसे मिळणार नसल्यानं योजना बंद करणार असल्याचं ते सांगताय. अशा सावत्र कपटी भावांवर मात करुन आम्ही पुढं आलो आहोत. या योजनेत खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना जोडे मारायचं लक्षात ठेवा" - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

बहिणीच्या आशीर्वादानं सरकार मजबूत : "आज विरोधक आमच्यावर टीका करत आहेत. तसंच शिव्याशापही देत ​​आहेत. सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पडणार, असं सांगितलं जात होतं, पण माझ्या बहिणीच्या आशीर्वादानं हे सरकार मजबूत झालं. निवडणुका येतात जातात, सत्ता येते जाते मात्र नागरिकांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील पाहिजे", असं ते म्हणाले.

"लाडकी बहीण योजनेचा महिलांना खूप आनंद झाला आहे. महिलांचे अश्रू पुसायचं काम लाडक्या भावांनी केलंय. ही योजना आल्यापासून विरोधकांना कावीळ झालीय. त्यामुळं ते सरकारवर टीका करत आहेत. विरोधकांनी महिलांची फसवणूक केलीय. येत्या काळात त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल. - नीलम गोऱ्हे, उपसभापती विधान परिषद

पुढं तीन हजार देणार : "आम्ही तुम्हाला 1 हजार 500 रुपये देत आहोत. तुम्ही आम्हाला पुढं साथ दिली तर, तुम्हाला 3 हजार आमचं सरकार देऊ शकतं. हे सरकार तुमचं सरकार आहे. माझ्या लाडक्या भावांचंही आम्ही काम करतोय. माझ्या प्रिय बहिणीच्या आयुष्यातील आजचा दिवस खरोखरच सर्वोत्तम दिवस आहे. आज आपण आपल्या बांधवांचा आदर पाहिला आहे. सरकार चालवताना कसरत करावी लागते. राज्यात अनेक कामे सुरू आहेत", असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

आजचा दिवस सावित्रीच्या लेकींचा : यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आजचा दिवस खऱ्या अर्थानं सावित्रीच्या लेकींचा आहे. पुण्यातून या योजनेला सुरुवात होत आहे. परकीय आक्रमण झाल्यावर इथं सोन्याचा नांगर फिरवला होता. त्याच पुण्यात स्त्रियांची पहिली शाळा सुरू झाली. म्हणून आम्ही या योजनेची सुरवात पुण्यातून केली. आमचं सरकार देणारं सरकार असून वसुली करणारं सरकार नाही. आज तुमच्या सावत्र भावांच्या पोटात दुखू लागल्यानं त्यांनी न्यायालयात धाव घेतलीय. देशाचे पंतप्रधान विकसित भारताबद्दल बोलतात. राज्यात महायुतीनं महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत", असं फडणवीस म्हणाले.

महायुतीला मतदान करा : "मी 34 वर्षांपासून राजकीय जीवनात कार्यरत आहे. मी अनेक सरकारमध्ये काम केलय. राज्यातील महिलांचं सक्षमीकरण व्हावं, यापेक्षा आमच्या मनात दुसरी भावना नव्हती. अनेक योजना आणल्या त्याचा महिलांनाही लाभ झाला. आज विरोधक काहीही न करता टीका करत आहेत. राज्य सरकार सर्वांचा विचार करणार आहे. याविरोधात काही लोक न्यायालयात गेले. या योजनेबाबत सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, मात्र त्यावर सरकारनं पर्याय काढला. तुम्ही महायुतीला पाठिंबा देऊन मतदान करावं", असं अवाहन अजित पवार यांनी केलं.

1 कोटी 35 लाख महिलांची नोंदणी : यावेळी महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्व प्रिय भगिनींना दिलेल्या वचनाप्रमाणे या वचनपूर्ती सोहळ्याचं आयोजन करत आहोत. खऱ्या अर्थानं आपण दोन दिवसात रक्षाबंधन साजरे करणार आहोत. ही योजना कोणी यशस्वीपणं राबवली असेल, तर ती राज्यातील महिलांनी राबवलीय. या योजनेंतर्गत आम्ही आतापर्यंत 1 कोटी 8 लाख महिलांना पैसे दिले आहेत. आतापर्यंत 1 कोटी 35 लाख महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. आम्हाला ही योजना अडीच कोटी महिलांपर्यंत पोहोचवायची आहे, त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल". यावेळी लाडकी बहीण योजनेच्या पुस्तकाचं प्रकाशन देखील करण्यात आलं.

हे वचालंत का :

  1. 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' हायकोर्टाच्या दारात; याचिका दाखल, मंगळवारी होणार सुनावणी - CM Ladki Bahin Yojana
  2. तृतीयपंथीयांसाठी लाडकी बहीण योजना लागू करा; ॲड. यशोमती ठाकूर यांची मागणी - Yashomati Thakur demands
  3. मुख्यमंत्र्यांची 'लाडकी बहीण' व्हायचंय? 'असा' दाखल करा ऑनलाईन अर्ज - Ladki Bahin Yojana

Last Updated : Aug 17, 2024, 8:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.