नागपूर Eknath Shinde Visit To Nagpur : राज्य शासनानं महिलांचं आर्थिक सक्षमीकरण आणि स्वावलंबीकरण, आत्मनिर्भर करण्याबरोबरच त्यांच्या सशक्तीकरणाला चालना देण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील लाभ जमा करण्यात आला आहे. लाडक्या बहिणींसाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महामेळाव्यासाठी नागपुरात येत आहेत. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रत्यक्ष रेशीमबाग इथल्या तयारीचा आढावा घेतलाय. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल, महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर आदी उपस्थित होते.
शहरातील वाहतूक मार्गात बदल; अधिसूचना जारी : रेशीमबाग मैदानावर "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' या कार्यकमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या अनुषंगानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' या कार्यक्रमाला नागपूर शहर तसेच जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महिला येण्याची शक्यता आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्यातील तहसील, नगरपरिषद, नगरपंचायत इथून मोठ्या प्रमाणात महिला सहभागी होणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील सर्व तहसील, नगरपालिका, नगर पंचायत तसेच नागपूर महानगरपालिका यांच्या हद्दीतून अनेक बस रेशीमबाग मैदान इथं नागपूर शहरातील विविध मार्गानं येणार आहेत.
रेशीमबाग परिसरात वाहनांना बंदी : गर्दीमुळे कुठलीही अप्रिय घटना घडू नये, म्हणून 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यकमाच्या कालावधित सर्व वाहनांना प्रवेश बंदी आणि वाहनं पार्किंगसाठी मनाई घालण्यात आली आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होवू नये, वाहतूक सुरळीत राहावी, सर्वं सामान्य जनतेच्या जीवितास धोका व गैरसोय होवू नये, म्हणून वाहतुकीवर निर्बंध घालण्यासाठी वाहतूक पोलीस उपआयुक्त शशिकांत सातव यांनी अधिसूचना जारी केली आहे.
या मार्गावर असेल वाहनास बंदी : सी पी अँड बेरार ते आवारी चौक ते क्रीडा चौकापर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहील. क्रीडा चौक ते आवारी चौक ते सी पी अँड बेरार कॉलेजपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रदेश बंदी राहील. अशोक चौक ते अप्सरा चौक ते भोला गणेश चौकापर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी राहील. भोला गणेश चौक ते अप्सरा चौक ते अशोक चौकापर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी राहील. अशोक चौक ते आवारी चौक ते सक्करदरा चौकापर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे. सक्करदरा चौक ते आवारी चौक ते अशोक चौकापर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी राहील. केशवद्वार ते गजानन महाराज चौक तसेच गजानन महाराज चौक ते केशवद्वारपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी राहील.
या मार्गावरील वाहतूक वळती : सी पी अँड बेरार कॉलेजकडून आवारी चौकाकडं येणारी वाहतूक ही राम कुलर चौक आणि झेंडा चौकाकडं जाणाऱ्या मार्गावर वळती करण्यात येत आहे. अशोक चौकाकडून भोला गणेश चौकाकडं जाणारी वाहतूक रामकुलर चौकाकडं जाणाऱ्या मार्गावर वळती करण्यात येत आहे. अशोक चौकाकडून सक्करदरा चौकाकडं जाणारी वाहतूक ही मेडिकल चौकाकडं जाणाऱ्या मार्गावर वळती करण्यात येत आहे. क्रीडा चौकाकडून अप्सरा चौकाकडं जाणारी वाहतूक ही तुकडोजी चौकाकडं आणि मेडीकल चौकाकडं जाणाऱ्या मार्गावर वळती करण्यात येत आहे. सक्करदरा चौकाकडून अशोक चौकाकडं जाणारी वाहतूक ही छोटा ताजबाग चौक व तिरंगा चौक यामार्गावर वळती करण्यात येत आहे. भोला गणेश चौकाकडून अशोक चौकाकडं जाणारी वाहतूक ही झेंडा चौक महाल व सक्करदरा चौक या मार्गावर वळती करण्यात येत आहे.
हेही वाचा :