छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सभेत एक है तो सेफ है अस म्हणतात, या वाक्याचा तुम्ही सर्वांनी चुकीचा अर्थ घेतला. एक राहू सेफ राहू म्हणजे एकत्र राहणे, एकोप्याने राहणे असा आहे. हा गुन्हा आहे का?, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरात केला. याच दाढीनं त्यांची गाडी खड्ड्यात घातली अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. उद्धव ठाकरे संभाजीनगर दौऱ्यावर असताना त्यांचे जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह कार्यकर्त्यांना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रवेश देत त्यांना हादरा दिला. बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे लोक आमच्याकडं येत असल्याचं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
दरोडा टाकणारे हेच खरे दरोडेखोर : "दरोडेखोर कोण? विकास करणारे की विकासाचे मारेकरी? ज्यांनी अडीच वर्षात या महाराष्ट्रात फक्त दरोडाच टाकला. लोकांना अंधारात ढकललं, राज्याला दहा वर्षे मागं नेलं, सर्व विकासकाम बंद केले. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प, जलयुक्त शिवार, समृद्धी महामार्ग, मेट्रो हे सर्व प्रकल्प बंद केले. या लोकांनी कोविडमध्ये देखील कोविड सेंटरमध्ये खिचडीमध्ये, डेड बॉडीच्या बॅगमध्ये पैसे खाल्ले. त्यामुळे दरोडा टाकणारे ते आहेत. आम्ही अडीच वर्षात विकास केला, कल्याणकारी विकास योजना आणल्या. विकास आणि कल्याणकारी योजना याची सांगड घातली. त्यामुळे जनतेला माहीत आहे दरोडा कुणी टाकला," अशी असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केला.
पंतप्रधानांचं वक्तव्य चुकीच्या अर्थानं घेतलं : "पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सभेत 'एक है तो सेफ है' अस म्हणाले. या वाक्याचा तुम्ही सर्वांनी चुकीचा अर्थ घेतला. एक राहू सेफ राहू म्हणजे एकत्र राहणं, एकोप्यानं राहणं असा आहे. हा गुन्हा आहे का? ब्रिटिशांची तोडो फोडे राज करो तीच विचारसरणी आता काँग्रेसनं अंगीकारली आहे. तोडायचं फोडायचं आणि राज्य करायचं, तोडफोड करून सत्ता मिळवा हे काँग्रेस करत आहे. एक रहा सोबत रहा, एकत्र होऊन मतदान करा हे त्यांनी सांगितलं आहे, तुम्ही अर्थ वेगळा घेतला," असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.
उलेमा संघटनेची भूमिका वैयक्तिक : "उलेमा संघटनेनं उबाठा गटाला काही ठिकाणी पाठिंबा दिला. तर तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी कोणाला पाठिंबा द्यावा. पण फेक नरेटिव्ह पसरवून मुस्लीम लोकांना घाबरून महाविकास आघाडीनं प्रचार केला. संविधान बदलणार हे सर्व सांगून मुस्लीम आणि दलितांना महाविकास आघाडीनं फसवलं. संविधान बदलू शकत नाही, पण फेक नरेटीव्ह यांनी पसरवलं. पण आता फसलेले लोक देखील हुशार झाले. त्यांना माहिती आहे, आपण फसलो आहे. ख्रिश्चन, मुस्लीम आणि आदिवासी आदी सर्वच बहिणींना आम्ही पैसे देत आहे. त्यामुळे आमच्यासाठी सर्व समान आहेत," असं सांगत महाविकास आघाडी जातिवाद करत असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
किशनचंद तनवाणी शिंदे शिवसेनेत : मध्य विधानसभा मतदार संघात ठाकरे गटानं उमेदवारी दिलेले जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी ऐनवेळी उमेदवारी नाकारली. मतदार संघातील मतांचं विभाजन झाल्यास एमआयएम पक्षाला फायदा होईल. त्यामुळे उमेदवारीला नकार दिला असं तनवाणी यांनी सांगत त्यांचे मित्र प्रदीप जैस्वाल यांना पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर ठाकरे गटानं तातडीनं कारवाई करत तनवाणी यांचं जिल्हाध्यक्षपद काढलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्यात आले असताना किशनचंद तनवाणी यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
हेही वाचा :