ETV Bharat / state

शिवरायांचा पुतळा दुर्घटना प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अखेर अटक, 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी - shivaji maharaj statue collapse

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या शिल्पकार जयदीप आपटेला अखेर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. त्याच्या अटकेनंतर धक्कादायक माहिती उघड होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. न्यायालयानं जयदीप आपटेला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

chhatrapati shivaji maharaj statue collapse case
जयदीप आपटेला अटक (Source- ETV Bharat Repoter/Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2024, 6:43 AM IST

Updated : Sep 5, 2024, 5:02 PM IST

ठाणे Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा 26 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेनंतर देशभरातच नव्हे तर जगभरातील समस्त शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा पुतळा साकारणाऱ्या शिल्पकार जयदीप आपटेला बुधवारी रात्री अटक करण्यात आली. जयदीप आपटे अंधाराचा फायदा घेऊन बायकोला भेटण्याकरिता आला होता. यावेळी बाजारपेठ पोलिसांनी त्याला राहत्या घरातून अटक केली आहे.

गेली काही दिवस शिल्पकार आपटेला अटक करण्यासाठी गृहविभाग आणि पोलिसांवर दबाव वाढत चालला होता. मालवण पोलिसांनी जयदीप आपटे विरोधात बुधवारी लूक आऊट नोटीस जारी केली होती. खासदार संजय राऊत यांनीही जयदीप आपटे वर्षा बंगल्यावर लपला असल्याची शक्यता व्यक्त करून गृहविभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले होते.

पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटे होता फरार- सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांनी प्रश्न उपस्थित करून सातत्यानं महायुती सरकारवर निशाणा साधला. राजकीय वातावरण तापले असतानाच पुतळा दुर्घटनेला जबाबदार असलेल्या जयदीप आपटे आणि डॉ. चेतन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील डॉ. चेतन पाटील याच्या अटकेनंतर जयदीप आपटे सातत्यानं पोलिसांना गुंगारा देत होतो. त्याला अटक करण्याकरिता पोलीस जंग जंग पछाडत होते. अखेर कल्याणमधून शिल्पकार आपटेला ताब्यात घेऊन अटक केली आहे.

नौदलानं सोपविली होती जबाबदारी-भारतीय नौदलानं राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याची उभारणी करुन घेतली होती. हा पुतळा उभारण्याचे कंत्राट कल्याणच्या जयदीप आपटेला देण्यात आले. नौदल दिनानिमित्त 4 डिसेंबर 2023 रोजी या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले. या पुतळ्याची देखरेख आणि निगा राखण्याची जबाबदारी नौदलाची होती. यासाठी नौदलानं मेसर्स आर्टीस्ट्री कंपनीला कंत्राट दिलं होतं. जयदीप आपटे हा कंपनीचा प्रोप्ररायटर असून डॉ. चेतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट आहे. शिल्पकाराची निवड, त्याचे डिझाईन ही सर्व प्रक्रिया नौदलाकडून करण्यात आली.

अवघ्या आठ महिन्यात कोसळला पुतळा- छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अचानक कोसळण्यानं महायुती सरकार टीकेचे धनी झाले. अशा स्थितीत जयदीप आपटे फरार असल्यानं राज्य सरकारची कोंडी झाली. जयदीप आपटे याला पुरेसा अनुभव नसताना शिवरायांचा ३५ फुटीचा पुतळा उभारण्याचं कंत्राट का देण्यात आलं? इतिहासात पुरावे नसतानाही शिवरायांच्या कपाळावर जखमेची खूण का दाखविण्यात आली? असे अनेक प्रश्न विरोधक, इतिहासकार आणि शिवप्रेमींनी उपस्थित केल्यानं जयदीप आपटे आणखीन चर्चेत आला. अवघ्या आठ महिन्यांत पुतळा कोसळल्या प्रकरणी ठेकेदार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट डॉ. चेतन पाटील यांच्या विरोधात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 109, 110, 125, 318 आणि 3 (5) अन्वये गुन्हा दाखल केला. पुतळा उभारणीसाठी महाराष्ट्र सरकारने नौदलाला 2 कोटी 36 लाख रूपये निधी दिला.

कशामुळे कामावर प्रश्नचिन्ह?सिंधुदुर्गमधील शिवरायांचा मोठा पुतळा बनवण्यासाठी साधारणत: 3 वर्षांचा कालावधी लागत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. मात्र, आपटेनं हा पुतळा अवघ्या सात महिन्यांत उभारून पूर्ण केला. गेल्या वर्षी जून महिन्यापासून कामाला सुरुवात झाल्यानंतर डिसेंबर 2023 पर्यंत या पुतळ्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती दस्तुरखुद्द जयदीप आपटे याने स्वत: एका मुलाखतीत दिली होती.यापूर्वी अशी भव्य शिल्पे बनवण्याचा जयदीपला विशेष अनुभव नसतानाही त्याला कंत्राट देण्यात आलं.

कोण आहे जयदीप आपटे ? कल्याण पश्चिमेकडील दूध नाका परिसरातील डॉ. गुप्ते चौकात असलेला बालाजी दर्शन इमारतीच्या बी विंगमधील 2 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये राहतो. आठव्या इयत्तेत शिकत असतानाच जयदीपनं कला क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे मूळ गाव कल्याण आहे. आपटेचे दहावीपर्यंतचे शिक्षण सुभेदार वाडा हायस्कूलमध्ये झाले. रहेजा स्कूल ऑफ आर्टमधून कमर्शियल आर्टची पदवी घेतल्यानंतर त्यानं जे जे स्कूल ऑफ आर्टमधून शिल्पकलेचा डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर त्याने मेसर्स आर्टीस्ट्री नावाने कंपनी स्थापन करून शिल्पे तयार करण्याची कामे सुरू केली. लंडनमधील यॉर्कशयरजवळ असणाऱ्या शहरात शीख सोल्जर्स असोसिएशन आहे. ब्रिटिशांतर्फे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात लढताना शीख बांधवांनी शौर्य दाखविले. जयदीप आपटेनं त्या पराक्रमी शीख सैनिकाचा सुमारे 7 फुटांचा ब्राँझचा पुतळादेखील यापूर्वी बनवला आहे. मात्र शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेनंतर जयदीप आपटेवर पोलीस कारवाई झाली आहे.

केंद्रीय माजी मंत्र्यांसह आमदारांनी केलं होतं कौतुकजयदीप आपटेच्या फेसबुक वॉलवरून मिळालेल्या माहितीनुसार शिल्पकार जयदीप आपटे याची तत्कालीन केंद्रित राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याणच्या दूधनाका येथील स्टुडिओत भेट घेतली. तसेच त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कार्याविषयी माहिती दिली. त्यानं कल्याणच्या खडकपाडा चौकातील सिंहाचे शिल्पही घडविले असून त्याने सिडनी आणि लंडनमध्येही पुतळे पाठविले आहेत. कल्याण शहराचे भूषण असल्याचे संबोधून जयदीप आपटे याचे कपिल पाटील यांनी 21 फेब्रुवारी रोजी त्यांच्या फेसबुक वॉलवर टाकलेल्या पोस्टच्या माध्यमातून कौतुक केले. तर आमदार नितेश राणे यांनीदेखील त्याचा सत्कार केला.

हेही वाचा-

  1. शिल्पकार जयदीप आपटे पोलिसांच्या हाती लागत नाही, मग गृहखाते काय करते? संजय राऊतांचा सवाल - Sanjay Raut News
  2. महाविकास आघाडी कधीच छत्रपती शिवरायांचा सन्मान करत नाही, देवेंद्र फडवणवीसांचा हल्लाबोल - Devendra Fadnavis On MVA Protest
  3. "फडणवीस यांना इतिहास समजलेला नाही, ते औरंगजेब फॅन क्लबचे..."- संजय राऊतांची खोचक टीका - Surat loot remark

Last Updated : Sep 5, 2024, 5:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.